मटन कबाब

Submitted by अनिश्का. on 20 December, 2012 - 00:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मटन कबाब (पहिला प्रयत्न आहे . काही चुक झाली तर साम्भाळुन घ्या)
१. मटन खीमा पाव किलो
२. अन्डी २ (फेटुन)
३. ब्रेड क्रम्ब
४. लसुण १० - १५ पाकळ्या
५. आले १ इन्च
६. गरम मसाला
७. नेहेमिचा मसाला ( मी मालवणी मसाला वापरते)
८. कोथिम्बिर १ छोटी जुडी
९. फोडणी साठी व तळण्यासाठी तेल
१०. कान्दे २ बारिक चीरुन

क्रमवार पाककृती: 

क्रुती:-

प्रथम खीमा स्वच्छ धुवुन घ्यावा.
अता त्यात २ डाव तेल घालुन गरम करावे.
तेल चान्गले गरम झाले की त्यात आले व लसुण पेस्ट घालुन घ्यावी.
ते फ्राय झाले कि लगेच खीमा टाकवा व तो फ्राय कराव.
त्यात तीन चमचे मालवणी मसाला व दिड चमचा गरम मसाला घालावा.
खीमा छान फ्राय झाला पाहिजे. सधारण पणे १५ ते २० मिनिट फ्राय करावा. (मध्यम आचेवर)
खीमा फ्राय होत आला कि त्याला कडेने तेल सुटु लागेल.
मग त्यात कोथिम्बिर घालावी.
आणि त्यात शिजण्या इतपत पाणी घालावे. अता त्यावर झाकण ठेवुन द्यावे.
१५ मिनिटानि झाकण काढुन पहावे. खीमा शिजलेला असेल.
शिजला नसेल तर पुन्हा १० मिन. झाकण ठेवुन शिजु द्यावे. (पाणी राहता कामा नये)
आता खीमा शिजल्यावर थन्ड होउ द्यावा... एका लहान टोपात अन्डे फेटुन घ्यावे
खीमा मिक्सर मधून काढुन घ्यावा. खीमा पेस्ट मधे चिरलेला कान्दा टाकावा.
व त्याचे छान गोळे बनवुन त्याला सुन्दर आकार द्यावा.
हे कबाब आधी फेट्लेल्या अन्ड्यात डीप करून मग ब्रेड क्रम्ब मधे घोळवावेत.
आणी गरम गरम तेलात डीप फ्राय करावेत. ( वरील प्रमणात १५ तरी कबाब होतात.)
गरम गरम कबाब सॉस व पुदीन चटणी बरोबर खावेत.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचून मस्त वाटले, जमल्यास चित्रही टाका.

(आधी वाटायचे की मटनच्या मोठ्या पिसेसचे कबाब करतात)

धन्यवाद बेफिकीर - तुमचे लिखाण, कथा वचल्या आहेत. खुप मस्त आहेत. मी तर फॅन आहे तुमची....

धन्यवाद बेफिकीर - तुमचे लिखाण, कथा वचल्या आहेत. खुप मस्त आहेत. मी तर फॅन आहे तुमची..<<<

हे इथे लिहिलेत म्हणून वाचलात.

srushti - धन्यवाद...पहिलाच प्रयत्न होता हा.... आता confidence आला आहे. पण फोटो टाकायला जमत नाहि आहे.. माहित नाही कसे करायचे.

छान रेसिपी.
फोटो टाका जमल्यास.
मी खीमा वाटत नाही. फेटलेल्या अंड्यात घोळवत नाही. गार झाल्यावर वास येतो अंड्याचा. त्यापेक्षा नुसत्या ब्रेडक्रम्स मधे घोळवुन शॅलोफ्राय करते.

हे इथे लिहिलेत म्हणून वाचलात.>>>>>>>>>>> बेफी फॅक्ल बद्दल सांगु का??? Happy

@ सस्मित = हा हा हा हा......बेफिकीर बद्दल असे का लिहीले आहे??? मला कळत नाही आहे. मी नवीन आहे ना. आणि आत्ता जे सुचवले आहे तुम्हि ते मी करुन बघीन पुढ्च्या वेळी.

सूंदर रेसिपी आहे, मला आतापर्येंत माहित नव्हती,कबाब माझाही आवडता पदार्थ आहे,
सीख कबाबची माहिती असल्यास प्रकाशित करावी, मी नक्की ट्राय करेन.

(मांजरीचे मटण मी खात नाही मला माझ्या टॉमीसाठी कबाब करायचाय म्हणून विचारल_)

मांजरीचे मटण मी खात नाही मला माझ्या टॉमीसाठी कबाब करायचाय म्हणून विचारल>>>>>>>>>>>>>>> हो नक्की टॉमी आवडीने खाइल... Happy सीख कबाब ची रेसिपी नक्की पोस्टीन.........:)