- २ वाट्या तिसर्यांची साफ केलेली मासटं. (तिसर्यांच्या शिंपल्यांच्या आतमधे जो खाण्याचा भाग असतो, त्याला मासटं म्हणतात.)
- १ छोटा कांदा - बारीक चिरुन
- १ वाटी खवलेले खोबरे
- २ लसूण पाकळ्या
- २ ओल्या मिरच्या
- २ टेस्पू खोबरेल तेल
- मसाला - ४ मिर्या, अर्धा चमचा धणे, १ चमचा चिंचेचा घट्ट कोळ, ३-४ सुक्या मिरच्या, पाव चमचा हळद.
- चवीप्रमाणे मीठ
१. तिसर्या स्वच्छ करुन आतील मासटं काढून घ्यावीत.
२. कांदा बारीक चिरुन घ्यावा.
३. वर दिलेला मसाला थोडे पाणी घालून खसखशीत वाटून घ्यावा. खूप पाणी घालायचे नाही.
४. गॅसवर लंगडी ठेवून त्यात खोबरेल तेल घालून, गरम झाल्यावर त्यात चिरलेल्या ओल्या मिरच्या व कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावे.
५. कांदा व्यवस्थित शिजल्यावर त्यावर मासटं व वाटण घालून, किंचित पाणी घालून सगळे एकजीव करावे. खूप पाणी घालायचे नाही, सुकेच ठेवायचे आहे. ह्यासाठी लंगडीवर झाकणी ठेवून त्यात पाणी घालावे व मंद विस्तवावर ५ ते ७ मिनिटे शिजवावे.
६. चवीनुसार मीठ घालावे.
७. पाच ते सात मिनिटांत मासटं शिजतात.
गॅसवरुन उतरल्यावर सजावटीसाठी वरुन चिरलेली कोथिंबीर पेरता येईल.
तिसर्या मूळच्याच खारट असतात, त्यामुळे चव पाहून मीठ बेताने घालावे.
तिसर्या साफ करताना एकतर मासटं ठेवून दोन्ही शिंपल्या टाकून देता येतात, वा एक शिंपली मासट्यासकट ठेवता येते.
खरचं ? सहसा माहिती असणारा
खरचं ? सहसा माहिती असणारा प्रकार नव्हे तो.
मला तिसर्या, चिंबोर्या हे
मला तिसर्या, चिंबोर्या हे प्रकार एकदा खाऊन पहायचे आहेत.
ये आत्ता घरी लले. खिलवतो
ये आत्ता घरी लले. खिलवतो तुला.
बाब्या, मला पण बोलाव
बाब्या, मला पण बोलाव स.कु.स्.प हाजिर हो जाएंगे
@तोषा, तुझ्या घरी खाल्लेला तो हाच प्रकार काय?
टेम्प्टेशन होतेय करुन बघायचे
बाब्या ४ ५ मधे एक रेघ मार की
बाब्या ४ ५ मधे एक रेघ मार की रे ते ४५ वर्षांनतर असं वाटतय वाचताना
तोषा, तुझ्या घरी खाल्लेला तो
तोषा, तुझ्या घरी खाल्लेला तो हाच प्रकार काय? >>> बाकी, त्या गटगचा झाईर णिशेद करायचा राहिलाच आहे
(No subject)
ऑ ?
ऑ ?
छान प्रकार! तिसर्या कुकरमधे
छान प्रकार! तिसर्या कुकरमधे उकडल्या तर चालतील हे वाचून बरे वाटले कारण मला त्या विळिवर चिरून कधिच उघडता येत नाहित.
Pages