माझे काय चुकले????????

Submitted by अतरंगी on 6 December, 2012 - 07:55

मी सध्या एस एल आर वर फोटो कसे काढायला शिकतो आहे. वेगवेगळे फक्शंन्स कसे वापरायचे ट्रायल आणि एरर करुन बघतो आहे.

स्वयंपाकाच्या बीबी वर माझे काय चुकले असा धागा आहे. जिथे करायला गेलेले प्रयोग फसले तर त्यात काय चुकले हे विचारता येते.
प्रकाश चित्रण करताना पण असे खूप वेळा होते ( माझे). पाहिजे तो ईफेक्ट तरी येत नाही, ब्राईटनेस तरी चुकते किंवा दुसरेच काही. तर मी फोटो काढताना काय चूक केली हे कळावे म्हणून हा धागा.

हा मी काढलेला फोटो.
manual mode, speed: 1/40, ap: F32, ISO 1000, Focal length 55 mm, White balance Auto, Active D light Auto,

हवा तसा आला नाही. किंवा अजुन चांगला कसा काढता आला असता?
DSC_1852.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतरंगी, माझ्या अत्यंत तोकड्या ज्ञानावर अवलंबून एक गोष्ट विचारू का? तुमच्या प्रकाशचित्रात सूर्य लक्ष्याच्या मागे आहे. पार्श्वतेजामुळे प्रचि ठीक येत नाही. मुद्दाम सूर्योदयाची वेळ निवडली आहे का? तसं नसल्यास उन डोक्यावर असतांना काढलेला बर वाटेल.
आ.न.,
-गा.पै.

फोकसपण हललाय, शार्प नाहीये पिक्चर.

जी गोष्ट मुख्य विषय आहे ती सेन्टरला असायला हवी, पण झाडांनी केलेली तिरकी ओळ छान वाटत्येय. सूर्य तिच्या कुठल्याही एका कोपर्‍यात शोभला असता.

मला खरेतर झाडांच्या मागून उगवणारा सुर्य आणि त्यातून येणारी सुर्याची किरणे असा फोटो काढायचा होता.....
( beginner's level ला खूप जास्त होतय का ? Happy )

असे अनेक फोटोज आहेत जे कुठे ना कुठे गंडले. एका नंतर एक विचारायचे आहेत.

जरूर विचारा.
फोटोग्राफी-माकाचु असं नांव करा धाग्याचं. सगळ्याच नवख्यांना शिकायला मिळेल.
(माकाचु म्ह्टलं की स्वयंपाक धागे आठवतात इथे) Wink

बहुदा आयएसओ जास्ती झाला का? त्या मुळे उगवत्या सुर्याचा इफेकट येउ शकला नाही असे वाटतेय. फोटोशॅाप मध्ये एक्सपोजर वर प्रयोग करुन बघा. तुमचे तुम्हाला कळुन जाईल Happy

असं काही नाही अतरंगी. सावलीने खूप छान लेखमाला लिहिलीये या विषयावर. कांदापोहे, मार्को पोलो, शैलजा, जिप्स्या, बित्तुबंगा एकसे एक भारी तरीही साधी आणि मदतखोर Light 1 मंडळी आहेत माबोवर...
( कोणाचं नाव राहिलं असेल तर वरचाच दिवा घ्या रे मित्र मैत्रिणींनो)

बिन्धास्त पुछो.

केपी (कांदापोहे) आणि बित्तुभाय मला एकदा म्हणाले होते की फोटो काढण्यासाठी हवे ते कॅमेराची पूर्ण समज, फ्रेमिंगची पूर्वकल्पना, प्रकाश वापरायची जाणीव आणि अथक प्रयत्न.

मी शिकाऊ मोडमध्येच आहे. त्यामुळे मेलवरुन थोडं फार अजून शेअर करु शकेन नक्की.

सध्या हे बघा http://www.maayboli.com/node/24484 कदाचित तुम्हाला असलच काहि अभिप्रेत असेल

मला खरेतर झाडांच्या मागून उगवणारा सुर्य आणि त्यातून येणारी सुर्याची किरणे असा फोटो काढायचा होता..... >> हा अतिशय ट्रिकी प्रकार आहे. सूर्य अशा शॉट्स मधे थेट इमेजमधे नसेल (कमीत कमी मधे नसेल) तर अधिक प्रभावी ठरते. metering करताना direct sunlight न करता केलेत तर थोडी मदत होउ शकेल. जर खूपच under expose होत असेल तर depth of field वाढवा नि शटर स्पीड कमी करा म्हणजे अधिक लाईट capture होईल नि डिटेल्स वाढतील (तुम्हाला तसे करायचे आहे असे दिसतेय). अर्थात ट्रायपॉड लागू शकेल.

composition साठी वर कोणी तरी म्हटलय तसे सूर्य एका कोपर्‍यात नि किरणे तिरकी आलेली अधिक ठासून दिसतील पण त्यासाठी तुम्हाला त्या झाडीमधे जावे लागले असते. नाराळाच्या झाडांची आउटलाईन दिसेल असा Silhouette Photo मिळ्वायचा प्रयत्न नाही केलात का ?

सॉरी अवलताईंच नाव राहिलं.

http://www.maayboli.com/node/9327

ह्या धाग्यावरचं त्यांचं काम कसं विसरता येईल.

सावलीचं काम http://www.maayboli.com/user/26562/created

http://www.maayboli.com/node/19105

अतरंगी,
तुम्हाला सिलहाऊट प्रकारचा फोटो ( म्हणजे झाडं एकदम गडद आणि आकाशात सूर्योदयाचे रंग इ. ) काढायचा आहे असे समजुन लिहीते.

ISO 1000 >> सूर्य फ्रेममधे असताना इतका जास्त आयएसओ ठेवायची जरुरी नाही.

ap: F32 >> अपेर्चर सुद्धा इतके छोटे नको. अशा लँडस्केपसाठी फ/११, फ/१६ वगैरे ठिक आहे

महत्वाचा मुद्दा म्हणजे - तुमचा फोटो खालच्या झाडं असलेल्या भागासाठी एक्स्पोज झाला आहे. तिथे गडद सावली आहे. त्यामुळे आकाश पुर्ण पांढर - ओव्हरएक्स्पोज - झालं आहे. आकाशासाठी एक्पोज केलंत तर सिलहाऊट प्रकारचा फोटो येऊ शकतो.

असामी, नाराळाच्या झाडांची आउटलाईन दिसेल असा Silhouette Photo मिळ्वायचा प्रयत्न नाही केलात का ?>>>>>>>
हा एक प्रयत्न केला थोडाफार जमला यालाच Silhouette Photo म्हणतात का?.DSC_1858_1.jpg

हो असाच. जर आउट्लाईन sharp असेल तर हे फोटो अधिक उठावदार होतात. वरच्या फोटोमधे थोडे क्रॉप करून पहा. जर त्यात subject वेगळा असेल तर subject ची Silhouette बाकीच्या पार्श्वभूमीपेक्षा separate राहील ह्याची काळजी घेत जा.

अतरंगी - बरोबरे याला Silhouette Photography म्हणतात.

composition आवडल मला....झाडांच्या मागून उगवणारा सुर्य!! यात झाडांच्या मागून येणारी प्रकाशकिरणे आली असती तर फोटो आजून सुंदर झाला असता.

- तुम्ही high ISO (१०००) ने फोटो काढाला आहे त्यामुळे आकाश पांढरं आलाय...थोडक्यात जास्त expose झालाय फोटो
- blur आहे - speed: 1/40 आहे त्यामुळे tripodची तितकी गरज नाही ... कदाचित वारा असल्याने कॅमेरा हलला असेल....सवईने हात स्थिर होईल
- Aparature F32- खूपच जास्त आहे...हा फोटो F8-F12 ने काढला असता तर कदाचित जास्त sharp आला असता.
- Exposure(E)-१/-२ आणि white balance ६०००d जर का ठेवल असत तर लाल-भगव आकाश आला असत.

पुढिल फोटोग्राफीसाठी शुभेछा !!

मला एक शका आहे.
समजा कोणाचे तरी पोट्रेट काढायचे आहे. ती व्यक्ती सावली मधे आहे पण मागे सुर्यप्रकाश आहे तर कसा काढावा जेणेकरुन त्या व्यक्तिचा चेहरा काळा येणार नाही आणि बॅकग्राउंड पण जास्त ब्राईट येणार नाही?

हा एक गंडलेला फोटो. चेहरा झाला थोडा फार पाहिजे तसा एक्स्पोज पण बॅकग्राऊंड फार ब्राईट आले आहे.
पोट्रेट मोड मधे ईथे फोटो काढला कि फ्लॅश येतो आणि चांगला येत नाही फोटो. हा फोटो मॅन्युअल मोड मधे काढलेला आहे. माझे असे अनेक फोटो या कारणाने चुकले.
काय केले म्हणजे असे फोटो व्यवस्थित येतिल

DSC_5502_1.JPG

सावलीत असलेला चेहरा आणि भरपूर प्रकाश असलेली बॅकग्राऊंड दोन्ही बरोबर एक्स्पोज करण्याकरता रिफ्लेक्टर्स वापरावेत. रिफ्लेक्टर्स घरी पण बनवता येतात. एका पुठ्ठ्यावर अल्युमिनीअम फॉइल अथवा प्लेन पांढरा कागद चिकटवून घ्यावा (सहसा दोन रिफ्लेक्टर्स लागतात).

मग रिफ्लेक्टर्स प्रकाशात ठेऊन त्याचा परावर्तीत प्रकाश चेहर्‍यावर पडेल अशा कोनातून ठेवावेत. थेट उन्हात ठेवणार असाल तर अल्युमिनीअम फॉइल शक्यतो वापरू नये. त्याचा प्रकाश अनैसर्गिक वाटतो (पण तो ग्लो इफेक्ट करता उपयोगी पडतो)

सहलीला जाताना हे रिफ्लेक्टर्स वापरणे कटकटीचे ठरू शकते. अशा वेळेस तिथलीच एखादी पांढरी अथवा फिकट रंगाची वस्तू शोधून त्याचा रिफ्लेक्टर्स म्हणून वापर करू शकता. पण ह्याला जरा जास्त सराव लागेल.

अशा वेळी कॅमेराचा बिल्टइन फ्लॅश न वापरता वेगळा फ्लॅश वापरता येणे शक्य असेल तर वापरावा..असा फ्लॅशचा लाईट बाऊन्स होऊन ऑब्जेटवर येत असल्यामुळे तो बिल्टइन फ्लॅशइतका हार्श वाटत नाही. एक्पोजर एक पॉइंट डाऊन ठेऊन मग हा फ्लॅश वापरला तर दोन्ही व्यवस्थित येईल असे वाटते...

त्याचबरोबर कॉम्पोझीशनकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे..कॉम्पोझिशन चांगले असेल तर एखादा तांत्रिक मुद्दा नजरेआड होऊ शकतो...
या छायाचित्रात तुमच्या मित्राचा हात कापला गेला आहे तसेच अर्धवटच फ्रेममध्ये आला आहे...थोड्या वेगळ्या अँगलने हे टाळता आले असते...