- २ वाट्या तिसर्यांची साफ केलेली मासटं. (तिसर्यांच्या शिंपल्यांच्या आतमधे जो खाण्याचा भाग असतो, त्याला मासटं म्हणतात.)
- १ छोटा कांदा - बारीक चिरुन
- १ वाटी खवलेले खोबरे
- २ लसूण पाकळ्या
- २ ओल्या मिरच्या
- २ टेस्पू खोबरेल तेल
- मसाला - ४ मिर्या, अर्धा चमचा धणे, १ चमचा चिंचेचा घट्ट कोळ, ३-४ सुक्या मिरच्या, पाव चमचा हळद.
- चवीप्रमाणे मीठ
१. तिसर्या स्वच्छ करुन आतील मासटं काढून घ्यावीत.
२. कांदा बारीक चिरुन घ्यावा.
३. वर दिलेला मसाला थोडे पाणी घालून खसखशीत वाटून घ्यावा. खूप पाणी घालायचे नाही.
४. गॅसवर लंगडी ठेवून त्यात खोबरेल तेल घालून, गरम झाल्यावर त्यात चिरलेल्या ओल्या मिरच्या व कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावे.
५. कांदा व्यवस्थित शिजल्यावर त्यावर मासटं व वाटण घालून, किंचित पाणी घालून सगळे एकजीव करावे. खूप पाणी घालायचे नाही, सुकेच ठेवायचे आहे. ह्यासाठी लंगडीवर झाकणी ठेवून त्यात पाणी घालावे व मंद विस्तवावर ५ ते ७ मिनिटे शिजवावे.
६. चवीनुसार मीठ घालावे.
७. पाच ते सात मिनिटांत मासटं शिजतात.
गॅसवरुन उतरल्यावर सजावटीसाठी वरुन चिरलेली कोथिंबीर पेरता येईल.
तिसर्या मूळच्याच खारट असतात, त्यामुळे चव पाहून मीठ बेताने घालावे.
तिसर्या साफ करताना एकतर मासटं ठेवून दोन्ही शिंपल्या टाकून देता येतात, वा एक शिंपली मासट्यासकट ठेवता येते.
छान. ही कोशींबीर पद्धत
छान.
ही कोशींबीर पद्धत गोव्याची खासियत आहे का?
मागे हायवे गोमांतकमध्ये पहिल्यांदा नाव वाचले.
वाव. मस्त आहे रेसिपी.
वाव. मस्त आहे रेसिपी. वाचतानाच तोंपासु झाले
शैलजा, फोटो मस्ट आहे
शैलजा, फोटो मस्ट आहे
तिसर्या काय असतं?
तिसर्या काय असतं?
>>शैलजा, फोटो मस्ट आहे>>>
>>शैलजा, फोटो मस्ट आहे>>> अगदी अगदी
शैलजा, कधी येऊ खायला.
शैलजा, कधी येऊ खायला.
स्वाती, थोड्याफार फरकाने(
स्वाती, थोड्याफार फरकाने( मसाला) सगळीकडे बनते.

इन्ना, कधीही ये
रिया, गूगल कर तिसर्या असं.
नंदिनी, रविवारी फोटो टाकते नक्की.
साधना
प्रि, तु चालु पड या
प्रि, तु चालु पड या धाग्यावरुन. तुझ्यासाठी नाहीच्चे.
कारण नंतर काय आहे कळलं कि किंकाळ्या मारायला लागतेस. 
बर मने कळ्ल मला
बर मने

कळ्ल मला
तोंपासु
तोंपासु
यम्मी
यम्मी
वॉव. यम्मी.
वॉव. यम्मी.
तोपांसु,,, फोटो प्लीज्च
तोपांसु,,, फोटो प्लीज्च
स्सस्स! मस्त आहे पाकृ!
स्सस्स! मस्त आहे पाकृ!
तोंपासु
तोंपासु
मस्त रेसिपी योग्य लोकांना
मस्त रेसिपी योग्य लोकांना दाखवण्यात येईल.
तोंपासु
तोंपासु
सही . रविवारी चक्कर टाकते गं
सही .
रविवारी चक्कर टाकते गं
तोंपासु एकदम. आता तिसर्या
तोंपासु एकदम.
आता तिसर्या शोधायला चायनाटाउन ला जावे लागेल.
फोटो न टाकल्याबद्दल सहर्ष
फोटो न टाकल्याबद्दल सहर्ष हार्दीक निषेध!
तिसर्या साफ करताना एकतर
तिसर्या साफ करताना एकतर मासटं ठेवून दोन्ही शिंपल्या टाकून देता येतात, वा एक शिंपली मासट्यासकट ठेवता येते.>> तिसर्या साफ कशा करतात.?
अवल, ये नक्की डॅफो, निकाल
अवल, ये नक्की

डॅफो, निकाल कळव
शोनू, तुला चायनाटाऊनला खुबे ( काळ्या रंगाच्या तिसर्या) मिळतील! अधिक चविष्ट!
पाटील, एकतर कुकरमधे ठेवून एक १० एक मिनिटे उकडल्यात की शिंपल्यांची तोंडे मोकळी होतील, मग त्यातून मासटं काढून घ्यायची आणि शिंपल्या टाकून द्यायच्या.
दोन शिंपल्यांच्या मधे जी चीर असते, ती विळीवर धरुन, चीर उघडूनही साफ करता येतात, पण त्याला सवय लागते.
इब्लिसभौ
सगळ्यांना थ्यांक्यू!! रविवारी तिसर्या मिळाल्या तर बनवून फोटो टाकते.
मस्त रेसिपी! चिंचेच्या
मस्त रेसिपी! चिंचेच्या कोळाऐवजी कोकम चालतील का?
मासटं (माष्टं) शब्द वाचूनच
मासटं (माष्टं) शब्द वाचूनच खल्लास झाले.
आयटे, डीप फ्रीझरमध्ये ठेवल्या
आयटे, डीप फ्रीझरमध्ये ठेवल्या तरी आपोआप उलतात का ?
बादवे काल स्वहस्ते चिंबोर्या साफ केल्या....
हो उलतात बाब्या. >>स्वहस्ते
हो उलतात बाब्या.
>>स्वहस्ते चिंबोर्या साफ केल्या.... >> वा, वा! पैल्यांदाच केल्यास का?
भारीच कातिल प्रकार
भारीच कातिल प्रकार
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
पहिल्यांदा नाही, अकदा आजीकडून
पहिल्यांदा नाही, अकदा आजीकडून शिकलो तेव्हा आणि आता ४ ५ वर्षांनंतर. ठाण्याला मासेमार्केटात सकाळी ६ ते ७ फक्त खेकडे, तिसर्या, लॉब्स्टर मंडळीच मिळतात, बाकी मंडळी त्यानंतर.
सहीये. लॉबस्टर घेऊन ये.
सहीये. लॉबस्टर घेऊन ये. सोप्पे आहेत करायला
Pages