भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर बंदी
निवडणूक प्रक्रियेत केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याचा आक्षेप घेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ( आयओसी ) भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर ( आयओए ) निलंबनाची कारवाई केली असून आता संघटनेच्या आंतरराष्ट्रीय सहभागावरच बंदी आली आहे ! या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी ' आयओसी ' च्या दोन पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेला कारवाईची माहिती दिली . ' आयओसी ' ने दिलेल्या दणक्यामुळे भारतीय क्रीडाजगताला जबरदस्त धक्का बसला असून ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील भारतीय खेळाडूंच्या सहभागावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे .
भारतीय ऑलिम्पिक समितीच्या निवडणुकीत क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टाने दिला होता . मात्र , केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यास ' आयओसी ' ने नकार दिला होता . ऑलिम्पिकची नियमावली वापरायची की , सरकारची मार्गदर्शक तत्त्वे यावरून भारतीय ऑलिम्पिक समितीची कोंडी झाली . अखेर ' आयओसी ' च्या कारवाईला तोंड देण्याची वेळ ओढवली . क्रीडा मार्गदर्शक तत्त्वे वापरण्याची सक्ती करू नका , अशी विनंती गेले दोन वर्षे केंद्र सरकारला करूनही काही निष्पन्न झाले नाही , अशी प्रतिक्रिया आयओएचे हंगामी अध्यक्ष विजय मल्होत्रा यांनी दिली . निलंबनाच्या कारवाईबाबतचे कोणतेही अधिकृत पत्र मिळालेले नसल्याचे आयओएच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे . मात्र , क्रीडामंत्री जितेंद्रसिंग यांनी हा दुर्दैवी निर्णय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली .
आजची निवडणूक निरर्थक
भारतीय ऑलिम्पिक समिती बंदीविरोधात क्रीडा लवादाकडे आव्हान देऊ शकते . पण या निर्णयामुळे आज , बुधवारी होणारी भारतीय ऑलिम्पिक समितीची निवडणूकच निरर्थक ठरणार आहे . राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचारप्रकरणी ११ महिने तुरुंगवास भोगलेले ललित भानोत यांची सरचिटणीसपदी आणि अध्यक्षपदी अभयसिंह चौताला यांची बिनविरोध निवड झाली आहे .
निधीही आटणार !
या बंदीमुळे ' आयओसी ' कडून मिळणारा निधीही आटणार आहे . शिवाय , भारतीय ऑलिम्पिक समितीच्या पदाधिकाऱ्यांना ऑलिम्पिकच्या बैठकांना उपस्थित राहता येणार नाही . भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक क्रीडाप्रकारांमध्ये भारतीय ध्वजाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होता येणार नाही . पण , ऑलिम्पिक ध्वजाखाली ते स्पर्धांत भाग घेऊ शकतील . अशी बंदी घालण्यात आलेली भारतीय ऑलिम्पिक संघटना ही पहिलीच संघटना नाही . दक्षिण आफ्रिकेलाही बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते . कुवेतवरही सरकारी हस्तक्षेपामुळे बंदी घालण्यात आली होती .
अश्या आंतरराष्ट्रीय घटनेमुळे जगात भारताची लाज काढली आहे !!
जाणकारांनी आपली अमुल्य मते मांडावीत !!
>> अश्या परिस्थितीत
>> अश्या परिस्थितीत खेळाडूंच्या खर्चाची तरतुद कशी करता येते?
मला वाटते ऑलिम्पिक समिती मदत करत असेल. गरीब देशांमधल्या खेळाडूंना पुढे येण्यासाठी राष्ट्रसंघाच्या (यूएन) मदतीने ही समिती असे करत असणार.
काही महत्वाच्या
काही महत्वाच्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया !!
Jitendra Singh, Union Sports Minister:
We had written to IOC but did not get a reply. It is unfortunate but more unfortunate for the athletes.
Tarlochan Singh, vice-president of IOA, to NDTV:
It's a most unfortunate decision taken by IOC. This fight is not of today. Last year, IOC wrote a letter to our Prime Minister, to our Sports Minister that if you carry on with the sports code, they will withdraw recognition from the federation. On our effort, the bill which was being introduced, the cabinet did not approve it. The whole fight which has happened today is because of the sports code.
We have ammended our constitution at our Ranchi meeting as per the directive of IOC. When we sent the ammended constitution, the IOC has given approval in writing.
वरील दोन प्रतिक्रीया.... काही खेद नाही. काही वाईट झाल्याची जाणिवच नाही !!
MC Mary Kom, Olympic medalist, to NDTV:
Passion won't be the same when competing without the Indian flag. The matter should be resolved quickly as we will not be mentally free in every tournament. If we stress then we won't be able to concentrate.
Baichung Bhutia, former football captain, to NDTV:
Even IOC has an age and tenure limit. I do not see IOC not agreeing to the sports code being implimented here. I feel IOA has completely mis-guided everyone here and not implimented the sports code to their constitution. They had ample time to do it - two years to do it. We are in the mess today because of them.
Abhinav Bindra, Olympic medalist, on Twitter:
"Bye Bye IOA, hope to see u again soon, hopefully cleaner!"
अभिनव बिंद्रा ची प्रतिक्रीया .... फारच बोलकी .... अगदी मनापासुन !!
http://sports.ndtv.com/othersports/othersports/item/200237-reactions-to-...
लोकहो, सरकारने मुद्दामहून
लोकहो,
सरकारने मुद्दामहून औदासिन्य दाखवले आहे. नाहीतर इतर वेळेस सरकारी लोक बरोब्बर धावपळ करतात. कदाचित संयुक्त राष्ट्रसंघास भारतीय खेळाडू प्रायोजित करता यावेत अशीही चाल असू शकते. यात भारतीय सरकार सामील आहेच (कोण धेंडे आहेत ते मी सांगत बसत नाही).
ऑलिंपिक संघटनेने महाराष्ट्र, गुजरात, इत्यादि राज्यांना स्वतंत्र संघ उतरवायची परवानगी दिल्यास माझ्या मनात धोक्याच्या शेकडो घंटा वाजतील.
आ.न.,
-गा.पै.
आत्ताची ताजी बातमी...
आत्ताची ताजी बातमी... तिरंदाजी संघटनेने निवडणूक प्रक्रियेत घोळ घातला म्हणून भारत सरकारने तिरंदाजी संघटनेची मान्यता रद्द केली
याच नांवाचा इतरत्र वाचनात
याच नांवाचा इतरत्र वाचनात आलेला एक धागा. सहभागी सदस्यांच्या अॅटिट्यूड व अभ्यासाच्या खोलीच्या दृष्टीने विचार करता रोचक ठरावा..
आपल्याकडे आधी टोपीत तुरा स्टाईल शीर्षक दिले गेले, अन नंतर सुरुवातीचे लोक गायबले. धागा काढण्याचा उद्देश एका महत्वाच्या विषयास वाचा फोडून साधकबाधक चर्चा घडवून आणणे, जेणेकरून आपणा सर्वांनाच काही नव्या इनसाईट्स मिळतील असा असावा, हे तिथे दिसते.
ईब्लिस <<<<<<<<याच नांवाचा
ईब्लिस
<<<<<<<<याच नांवाचा इतरत्र वाचनात आलेला एक धागा. सहभागी सदस्यांच्या अॅटिट्यूड व अभ्यासाच्या खोलीच्या दृष्टीने विचार करता रोचक ठरावा..
आपल्याकडे आधी टोपीत तुरा स्टाईल शीर्षक दिले गेले, अन नंतर सुरुवातीचे लोक गायबले. धागा काढण्याचा उद्देश एका महत्वाच्या विषयास वाचा फोडून साधकबाधक चर्चा घडवून आणणे, जेणेकरून आपणा सर्वांनाच काही नव्या इनसाईट्स मिळतील असा असावा, हे तिथे दिसते. >>>>>>>>
तिथे काहीही दिसत असेल हो पण ईथे मायबोलीवर कोठल्या धाग्यावर साधक बाधक चर्चा झालीय?
कींवा होऊ शकते ? रोचक ठरणे तर दुरच राहीले !!
तुम्ही दिलेल्या धाग्याच्या दुव्यावर हे दिसत आहे
पान हरवलेलं दिसतंय....
त्या पोस्ट मध्ये टायपो झालाय.
त्या पोस्ट मध्ये टायपो झालाय. URL नीट बघितला तर सहज दिसून येईल. ही लिंक आहे: http://www.aisiakshare.com/node/1428
भारतीय ऑलिंपिक संघटनेची
भारतीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता रद्द करण्याची आंतराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची कृती अन्याय्य : बिझिनेस स्टँडर्ड
Indeed, the IOA’s elections to which the IOC objects were ordered by the Delhi High Court, and they were mandated to follow the government’s new Sports Code. The IOC feels the Sports Code is an unjust imposition, a government meddling where it has no right to under the Olympic charter. And what is this new Sports Code, dating to the era of the effective Ajay Maken at the sports ministry, and now agreed to by most of India’s sporting bodies? It requires presidents of sporting associations to limit themselves to three terms; and secretaries cannot hold more than two consecutive terms. There is also an age limit. This essential move to clean up India’s sporting administration is seen by the IOC as an end to autonomy — but the fact that Mr Chautala is president, and it used to be another member of Parliament, Suresh Kalmadi, didn’t worry it. Meanwhile, across the world, national Olympic committees are run by political appointees — most famously by Saddam Hussein’s son Uday. And does the IOC wish Indians to believe that, say, China’s Olympic Committee – run by its sports minister, Peng Liu – is “autonomous”? This unreasonable attempt by the IOC to stop even a small step towards cleaner sports administration in India by quoting the ideals of “shamateurism” – to protect the cronyist culture of which it is very much a part – should be resisted
@दिनेशदा | 6 December, 2012 -
@दिनेशदा | 6 December, 2012 - 12:20नवीन
प्रायोजक आहेत कि. टाटा सारख्या कंपन्या, नक्कीच पुढे येतील. <<
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?
टाटांनी कामगारांसाठी जो पैसा वापरणे शक्य आहे, तो पैसा त्यांच्यासाठी खर्च न करता खेळाळूंकडॅ वळवायचा म्हणा की!
म्हणजे खेळाडूंची फिकिर करण्याची जबाबदारी भारतीय ऑलिंपिक समितीची नाही तर! तिचा सारा पैसा पदाधिकारी [राजकीय नेते] मंडळीसाठी राखीव समजायचा. नाही का?
छान!
टाटा जी, तुमचे खांदे आणखी मजबूत करीत राहा. अजून कसली कसली ओझी तुम्ही वहावीत याच्या अपेक्षा वाढत जाणार आहेत!
Pages