तुरीच्या दाण्यांची आमटी

Submitted by स्वप्ना_राज on 1 December, 2012 - 08:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाजलेले सुकं खोबरं, तेल, हिंग, लसूण, हिरवी मिरची, तुरीचे दाणे, डाळ्या, गूळ, आमसुलं (कोकमं), जिरे, मीठ, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

सुकं खोबरं कोरडं भाजून त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्या.

तेल तापवून त्यात हिंग, लसणाचे तुकडे, बारीक चिरून हिरवी मिरची, तुरीचे दाणे (न उकडता) घाला आणि परता. Bowl मध्ये काढून घ्या. त्यात डाळ्या, गूळ, सुक्या खोबर्‍याची पूड, भिजवलेली आमसुलं घाला. हे सगळं मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या.

तेल तापवून त्यात जिरे, हिंग, बारीक चिरून हिरवी मिरची, १५-२० तुरीचे दाणे, वाटण घाला. परता. मीठ आणि गरम पाणी घाला. एक उकळी काढा. वरून कोथिंबीर आणि हवे असल्यास सुकं खोबरं घालून सर्व्ह करा.

माहितीचा स्रोत: 
आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, मार्च २०१० मधला एक एपिसोड
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही यास तुरीचे आळण म्हणतो, फक्त यात आमसुलं वापरत नाही..
@ दिनेशदा, आमच्या शेतात तुरी चांगल्याच बहरल्यात. या खायला.. Happy

हो नक्कीच सारीका,, पण तसेही तूमच्याकडे कुठल्याच पदार्थात सहसा काही आंबट घालत नाहीत, हो ना ?
कोल्हापूरकडे पण सहसा नसतेच.

दिनेशदा तुमची वाट बघेन.
इकडे सहसा भाजीत गुळ किंवा साखर आमसुलं फारसं वापरत नाहीत, आमसुले तर इकडे खुप लोकांना माहीतही नाही. दाक्षिणात्यांची संख्या जास्त असल्याने चिंचेचा वापर सढळहस्ते असतो..
इकडे बर्‍याच पदार्थात दही घालण्याची पध्दत आहे, खासकरून कोणताही झुनका असो त्यात दही घालतातच.

स्वप्ने.. तू आशी सुग्रणही हायेस ते माहित नव्हतं बर्का...

मस्तये रेस्पी.. Happy

दिनेश दा... तुम्हीही तुरीतत्सम दाणे लौकरच शोधून काढाल नक्कीच... Happy

आमच्याकडे सगळ्या दाण्यांना फेजाँव म्हणतात. रोज तेच खातो आम्ही. तूरीच काय तूरीची डाळ पण नाही मिळत आमच्याकडे..आता येताना आणायला पाहिजे.

वर्षा, सुगरण वगैरे नाही ग बाई पण मधूनमधून नवं काहीतरी ट्राय करत असते. हे जमलं म्हणून इथे रेसिपी टाकली. Happy प्रिति, नक्की करून बघ. भातासोबत मस्त लागते.

तुरीचे दाणे कसे दिसतात ह्याचा फोटो टाकणार का स्वप्ना? >>
गुगल कराना तूर म्हणुन लगेच मिळेल, नसेल सापडल तर इथे बघा. हा. का. ना. का.

थॅन्क्स प्रिया. माझ्याकडे फ्रोझन तूर आणि कडधान्यासारखे भिजत घालावे लागणारे तूर दोन्ही आहेत म्हणून फोटो हवा होता.

http://a-perfect-bite.blogspot.in/2011_11_01_archive.html
इथल्या उंधियोच्या रेसेपीमध्ये आहे फोटो तुरीच्या दाण्यांचा.

सायो, तुला फ्रोझन वापरावे लागतिल या रेसेपीला.

साती, तुमच्या भागात येळ अमावस्या असते ना? त्यावेळच्या भाजीमध्ये पण घालतात तुरीचे दाणे. आता तुरीच्या शेंगा मिळायला लागल्या असतिल तुमच्या गावात. मीठ घालून उकडल्या की मस्त लागतात त्या. Happy

तुझ्या गावात तुला तुरीचे दाणे मिळतील. कोकणात मिळत नाहीत.>>>>>>>>> कोण म्हणत?? मुबलक मिळतात कोकणात सुध्धा. आमच्याकडे तुरी. पावटा, उडीद ठोकतात (उगवतात)

सस्मित, मला तरी गेल्या २५ वर्षात रत्नागिरीमधे कधी तुरीचे दाणे विकत मिळाले नाहीत. तुम्हाला कुठे मिळत असतील तेमाहित असल्यास अवश्य सांगा. आम्ही तिथून आणत जाऊ.

लिहायचे राहिले,
आज मी अशी आमटी टिनमधले मटार वापरुन केली. टिनमधले मटार म्हणजे ताजे नसतातच. भिजवून शिजवलेले कडधान्यच असते ते. पण तरी छान लागली.

डाळ्या नव्हत्या, पण टिनमधलेच पाणी वापरल्याने दाटपणा आला. थोडीफार तुरीचीच चव आली.

सायो, फोडणीत घालायचे दाणे सोडून बाकी सगळे वाटणात घालायचे. मी जवळजवळ १ वाटी घेतले होते. तुरीचे दाणे उंधियोच्या रेसिपीत दाखवलेत तेच.

निगेटिव्ह फिडबॅक द्यावा की नाही ह्यावर विचार करुन शेवटी लिहायचं ठरवलं कारण माझी करण्यात काही चूक झाली असेल तर कळेल.
काल ही आमटी करुन पाहिली. भाजलेलं सुकं खोबरं, लसूण, मिरच्या वगैरे असूनही अजिबात खमंगपणा आला नाही. खरंतर आमटीला प्रॉमिनंट अशी कोणतीच चव वाटली नाही. काय चुकलं असावं?