OTG बद्दल माहीती

Submitted by चिन्नु on 22 November, 2012 - 09:42

भारतात OTG घ्यावयाचा असल्यास कुठला चांगला आहे, याची माहीती हवी आहे. किंमत, अनुभव, मॉडेल अशी सर्व माहीती हवी आहे.
धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या धाग्यात मा.वे., इतर भांडी, कूकर, क्लिनींग लिक्वीड अशी विविधता असल्याने, OTG साठी हा धागा काढला.
त्या धाग्यावर कुणी बजाजचा आणला असे वाचले. काही अनुभव शेअर कराल का प्लीज?

चिन्नू, माझ्या आईकडे मॉर्फी रिचर्ड्सचा ओटीजी आहे. घेऊन पाच सहा वर्षे झाली असतील. त्यामधे मी केक, कूकीज, ब्रेड, वा तत्सम पदार्थ बर्‍याचदा केलेले. मला तरी तो वापरायला चांगला वाटला होता. आतापर्यंत कधी दुरूस्ती वगैरे आली नाही.

नंदु, grilling चांगले होते का?Power saver आहे का? त्याच्याबरोबर काही भांडी वगेरे काही मिळालं का? वॉरंटी आहे का?
थँक यु गं.

काल मी पौर्णिमा याच्या पदधतीने केक केला पण ओवनमध्ये ठेवला १५ मिनीटांनी फुगला एवढा की मला वाटले आता बाहेर येईल आणि नंतर काय झाले काय माहित धपकन खाली बसला एवढा कि जेवढे सारण होते तेवढा झाला Sad आणि त्या साच्यामध्ये काढायला गेले तेव्हा तुकडे पडले असे का झाले असेल Uhoh माझ्याकडचा ओटिजी मोरफि रिचर्ड या कंपनिचा आहे

@अविगा : जर केक १५ मिनीटात फुगला व मग बसला म्हणजे ओवन temp कमी असायला हवे होते. प्रत्येक ओवनमधे फरक असतो. पुढल्या खेपेस temp १०-२० डीग्री कमी ठेऊन बघ.

चेन्नु : माझ्याकडे बजाजचा OTG आहे जो मी गेले ४ वर्ष केक, कुकीज, ब्रेड करीता वापरते. छान होते सगळे. पण Grilling एवढे केले नाही कधी.

माझ्या जुन्या ओवनने १३ वर्षआंच्या सर्विसनंतर राम म्हटला. नविन ओटीजीच घ्यायचाय, मावे नको. आकारानेही थोडा मोठा हवा (आधीच्यात केक फुगल्यावर वरच्या कॉइलला चिकटायला जायचा इतका लहान होता तो).

मी मॉर्फी रिचर्ड्स आणि बजाजचे ओटीजी पाहिले ४० लि. आणि त्यापुढचे. दोन्ही सारखेच वाटताहेत, किंमत पण सारखीच.

मॉ.री. चे रिव्हुज वाचले आणि नेटवरचे रिव्हु वाचुन जशी धडकी भरते तशीच भरली. Happy

इथले रिव्हुज मात्र दोधांनाही चांगले म्हणताहेत. पण तरीही दोघांत कुठला जास्त बरा पडेल वापरायला?

हो ते वाचले मी नेटवर.. आणि रिव्युजमध्ये बजाजच्या सर्विसिंगलाही शिव्या घातलेल्या Happy

रच्याकने, वरचा उषाचा हॅलोजन ओवन इंटरेस्टींग वाटला. कोणी वापरलाय का इथे?

साधना, अगदी हेच विचारायला आलेय. मी पण आत्ताच बघून आलेय आणि खुपच इंप्रेस झालेय. कोणाला हॅलोजन ओवन विषयी माहिती असेल तर प्लिजच सांगा.

ओटीजी ओवनमध्ये वांग कस आणी किती वेळ भाजाव?कोणी सांगु शकेल का?
ओवनमध्ये वांग फुटण्याची शक्यता कीती असते? तापमान आणि सेटिंग कसे ठेवायचे तेही सांगा.

मी मॉर्फीचा घेतला अवन शेवटी.. दिसायला मस्त, आता वापरायला कसा ते कळेलच. सध्या तरी मस्त वाटतोय.

अविगा, गॅसवर भाजताना आपण जसे काट्याने टोचे देतो तसेच अवनमध्ये ठेवतानाही द्या. म्हणजे फुटणार नाही. मी अवनमध्ये एकदाच भाजलेले, बघत राहायचे आणि फिरवत बसायचे, १७०-१९० सी पर्यंत टेम्प चालेल असे मला तरी वाटते. मी परत अवनात भाजले नाही कारण त्या भरताला गॅसवर भाजलेल्या भरताची चव आली नाही Sad

मी पण आत्ताच बघून आलेय आणि खुपच इंप्रेस झालेय

कुठे बघायला मिळाला, मी नेटवर पत्ता बघुन नव्या मुंबईत फोन केला तर त्यानी ५ वर्षांपुर्वीच एजेन्सी बंद केली म्हणुन सांगितले. मला आवडलेला पण आत शिजवायची जागा कमी वाटली. मी अवनमध्ये जास्तकरुन केक कुकिज वगैरेच करते, याच्यात केल्या तर खुप बॅचेस कराव्या लागलीत असे वाटले म्हणुन मग हॅलोजनवर काट मारली.

साधना ,
>> माझ्या जुन्या ओवनने १३ वर्षआंच्या सर्विसनंतर राम म्हटला. नविन ओटीजीच घ्यायचाय, मावे नको. >>

तुम्हाला मावे का नको होता ? ओवन च का घ्यायचा होता ? काही सांगू शकाल का ? फरकाचे मुद्दे नेमके काय आहेत ?

माशा, मी ओवनमध्ये केक, कुकीज, पाव इ. गोष्टी करते ज्याच्यात भाजणे ही क्रिया अपेक्षित आहे. या क्रियेसाठी मला मावेपेक्षा ओवन योग्य वाटतो. लोक मावेतही हे सगळे करतात पण ओवन नो-खिटखिट वाटतो. मावेच्या प्रकियेबद्दल बरेच उलटेसुलटे वाचलेय, त्यामुळेही मावे नको वाटला.

शिवाय मावे जेवढ्यात आला अस्ता त्याच किंमतीत मला मावेच्या दुप्पट आकाराचा ओवन मिळाला. कुकीज करताना छोट्या छोट्या बॅचेस करुन कंटाळलेले मी.

साधारण १००-१२० वर तापमान ठेवुन, मधुन मधुन रवा, खोबरे वरखाली करुन बघा. ओटिजी मध्ये कोणी हा प्रयोग केल्याचे ऐकले नाही, पण तुम्ही करुन पहा आणि इथे लिहा काय झाले ते Happy

धन्यवाद साधना ,
तुम्ही सांगितल्या प्रमाणे करुन पाहिले, १०० ला १० मि. असे दोनदा केले व्यवस्तित भाजले गेले.