१. (Twinkle twinkle little star , how I wonder what you are
Up above the world so high, like a diamond in the sky)
चम्मक चम्मक चांदणी,
तू दिसतेस माहिताय कशी?
आभाळाच्या खाणीमधला
लख लख हिराच जशी
२. (Humpty dumpty sat on a wall, humpty dumpty had a great fall
All the king's horses and all the king's men, couldn't put humpty dumpty together again)
गोल-मटोल मिस्टर गोळे बसले फळीवर
फळी जराशी हलली तर पडले फरशीवर
गोल-मटोल मिस्टर गोळे होउन गेले चप्पट
नकाच उठवु त्याना तुम्ही, हात होतिल चिक्कट
३. (Mary had a little lamb its fleece was white like snow
Everywhere that Mary went, the lamb was sure to go)
बनुताईंची होती एक गोरीचिट्टी मेंढी
बर्फासारखी पांढरीफेक लोकरीची गुंडी
बनुताई जातिल जेथे, जाई ही मेंढी
शाळेत जाऊन बसायला बाक पण धुंडी
४. (Johny Johny, Yes Papa? .. Eating sugar? No papa
Telling lies? .. No papa... Open your mouth ....Ha Ha Ha!!)
बनुताई, बनुताई, "काय गं आई?"
साखर खातेस ना? खरं कीनई?
"नाहि ग, खोटं मी कशाला सांगू?"
मं उघड तुझी मूठ नि दाखव मला बघू.
(नकट्या किंवा अपर्या नाकाच्या, छोट्या दोन वेण्यांना रंगीत रिबिनी बांधलेल्या अशा तीन चार वर्षांच्या बनुताईंचं एखादं छानसं चित्र शोधतोय. मदत कराल?)
दुसरी
दुसरी आवडली.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
मस्त. अगदी
मस्त. अगदी माझ्या मनातली बनुताई साकारलीत. धन्यवाद.
.............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)