दिलेल्या प्रमाणानुसार साहित्य घेतले तर हे नमकीन काजु खूपच खुसखुशीत होतात.तेलकट होत नाहीत.त्यासाठीचे साहित्य :-
१ वाटी मैदा.
१ वाटी बारीक रवा.
पाऊण वाटी कडकडीत तेलाचे मोहन.
पाऊण कप दूध-कोंबट
१/२ चमचा मीठ.
१ सपाट चमचा ओवा.
तळायला तेल.[साधारण दिड वाटी ]
१/२ चमचा मिरेपुड.
एक लहान टिणाचे झाकण.इथे मी रुह्-आफ्जाच्या बाटलीचे झाकण वापरले आहे.
मैदा,रवा,मीठ व ओवा एकत्र करावा.
त्यात कडकडीत तेलाचे मोहन घालुन चमच्याने मिश्रण छान एकत्र करावे.
मोहन घातल्यावर हे मिश्रण असे दिसेल.
आता दुध घालुन पिठ भिजवुन घ्यावे.
[दुध लागेल तसे थोडे-थोडे घालत भिजवावे.]
पिठ भिजवले आहे.प्रमाणासाठी वापरलेली वाटी,चमचा व कप व भिजवलेला पिठाचा गोळा---
साधारण १५ ते २० मिनिटे पिठाचा गोळा झाकुन ठेवावा.
त्यानंतर एकुण गोळ्याचे ३ भाग करुन घ्यावे.
प्रत्येक गोळा वळुन घ्यावा.
आलु-पराठ्याइतका जाड लाटावा.
टिणाच्या झाकणाने त्याचे काजु च्या आकाराचे भाग करुन घ्यावे.
हे साधारण असे दिसेल.
असे सर्व "काजु"करुन घ्यावे.
या तळुन झालेल्या प्रत्येक घाण्यावर थोडीशी मिरेपुड पसरवा.
गरम काजुवर मिरेपुड टाकली कि ती काजुवर चिकटेल..
ओव्याऐवजी जिरे किंवा शहाजिरे घालता येईल..
थंड झाले कि काजु डब्यात भरा.
खुसखुशीत काजु तयार आहेत.
तेल एकदा तापवुन गॅस कमी करुन हे काजु तळायचे आहेत.
दिलेल्या प्रमाणानुसार साहित्य घेतले तर काहीच चुकणार नाही.
झाकणाची ट्रीक एकदा जमली कि काजु भराभर होतात.
सुलेखा , मस्त रेसीपी..पण फोटो
सुलेखा , मस्त रेसीपी..पण फोटो दिसत नाहित
तयार रेसिपिचा फोटो टाका
तयार रेसिपिचा फोटो टाका
तळलेल्या काजूंची वाट बघतोय.
तळलेल्या काजूंची वाट बघतोय. मी एका गुजराती कुकरी-शोमध्ये पाहिलेल्या आणि फॉलो केलेल्या रेसिपीप्रमाणे नुसत्या मैद्याच्याच पोळ्या लाटून , एका पोळीवर कॉर्नफ्लोरचा साठा चिरोट्यांसारखा लावून, त्यावर दुसरी पोळी दामटून बसवून, मग काजू कापायचे होते.
आता तुमच्या कृतीने करून पाहीन.
वा मस्त पोट भरले
वा मस्त
पोट भरले
काजू शंकरपाळ्यांची रेसिपी
काजू शंकरपाळ्यांची रेसिपी इथेही आहे- http://www.maayboli.com/node/20987 त्यात साटं वापरलं आहे.
छान रेसिपी. मिरेपुड घालायला
छान रेसिपी.
मिरेपुड घालायला विसरलीस तु
idea avaDalee. nehameechya
idea avaDalee. nehameechya akarapeksha vegaLe!
सस्मित्.नाही ,मिरेपुड टाकायला
सस्मित्.नाही ,मिरेपुड टाकायला विसरले नाही.
त्या २-३ ओळी तेलात तळणं.मिरेपुड घालण वगेरे मला अवलोकन मधे दिसतातेत पण संपादन मधे गायब आहेत्..खुप वेळा प्रयत्न केलां. नव्या ओळी अॅड पण होत नाहीत. तयार काजु फोटो चे ही तसेच झाले..
नेट चा प्रॉब्लेम असावा बहुतेक..
भरत, साटा लावुन केले तर तेलकट
भरत, साटा लावुन केले तर तेलकट होतील्.या पद्धतीने खुट्खुटीत व खस्ता होतात.
भरत--तयार का.शं.चा फोटो आता दिसतोय ना ?
ख.चि.--करुन पहाणार ना ? कि प्र.चि पाहुनच पोट भरले..
तयार का.शं.चा फोटो आता दिसतोय
तयार का.शं.चा फोटो आता दिसतोय ना ?
>>>
तळल्यानंतरचे काजु सिदत नाहीयेत. काजु चे आकार कापून स्टीलच्या ताटलीत ठेवलेत्ते दिसतायत
वा, मस्तच तळलेल्या काजूंचा
वा, मस्तच
तळलेल्या काजूंचा फोटो दिसत नाहीये.
वा मस्त रेसिपी सुलेखा.
वा मस्त रेसिपी सुलेखा.
तळलेल्याचा फोटो दिसत नाहीए.
तळलेल्याचा फोटो दिसत नाहीए. ताटात रांगेने बसलेत ते तळून घ्यायला तयार आहेत असे वाटतेय!
..साटा लावून केलेले तेलकट दिसत नाहीत, पण पोटात गेल्यावर प्रताप दाखवतात. घशाशी जळजळ.इ. त्यातून मी केलेले पूर्ण मैद्याचे होते.
भारी दिसताएत ते काजू. कधी
भारी दिसताएत ते काजू. कधी उत्साह आलाच तर करुन बघेन
दिसले दिसले. मस्त आहेत.
दिसले दिसले. मस्त आहेत.
भरत,इतक्या प्रयत्नानंतर आता
भरत,इतक्या प्रयत्नानंतर आता काजु फोटो दिसत आहे.मी या फोटोची आधीची जागा बदलली.एक ओळ वर फोटो टाकला आणि शेवटी जिरे-शहाजिरे ची ओळ लिहीली.[ही ओळ मी या आधी "अधिक टिपां"मधे लिहीणार होते.]त्यामुळे जमले एकदाचे..
हे काजु "प्रताप"दाखवत नाही .रवा वापरल्याने खुटखुटीत होतात.तळताना तेल बेतशीर लागते.हाताला कोरडे लागतात.
तळलेले काजू कसले तोंपासु
तळलेले काजू कसले तोंपासु खुसखुशीत दिसतायंत
साटं लावून करण्यापेक्षा ही कृती आवडली.
छानच दिसताहेत "काजू" !
छानच दिसताहेत "काजू" !
शेवटल्या फोटोतले काजू उचलून
शेवटल्या फोटोतले काजू उचलून तोंदात टाकावेसे वाटतात.
मस्तं पाककृती. पेशन्सचं काम आहे.
मस्त आहेत "चंद्रिका".
मस्त आहेत "चंद्रिका".
मस्त !! करायलाच हवेत
मस्त !! करायलाच हवेत

चंद्रिका वरुन एक आठ्वण झाली.. धन्स लोला
मस्त! या दिवाळीला हेच करेन
मस्त! या दिवाळीला हेच करेन
तुमच्या माळवी खासियती मी
तुमच्या माळवी खासियती मी आवर्जुन वाचत असते. काजुची पाकृ आवडली.
मस्त!झाकणाने आकार कापायची
मस्त!झाकणाने आकार कापायची कल्पना आवडली.
मस्त दिसताहेत काजू !
मस्त दिसताहेत काजू !
मी कालच करुन पाहिले. छान झाले
मी कालच करुन पाहिले.
छान झाले आहेत.:)
फक्त जिरे घातले आहेत.
सुलेखा, मी आत्ताच करून
सुलेखा, मी आत्ताच करून बघितले. मस्त झालेत. फक्त मी मैद्याऐवजी कणीक वापरली. आणि माझे काजू न होता चंद्रकला(!) झाल्या. सगळ्यांना खूप आवडल्या. खूप खूप धन्यवाद इतकी मस्त रेसिपी शेअर केल्याबद्दल!
मी केलेल्या चंद्रकलांचा फोटू.....
शांकली, मस्त दिसत आहेत
शांकली, मस्त दिसत आहेत चंद्रकला