मसूर १ वाटी
हळद, तिखट, मीठ चवीप्रमाणे
चिंचेचा कोळ २ चमचे
लसूण ७-८ पाकळ्या
तेल ३ चमचे
कोथिंबीर एक मूठ
आयत्या वेळेस करावयाचा पदार्थ
जाड बुडाच्या भांड्यात मसूर घ्यावेत. मध्यम आचेवर कोरडे भाजावेत. त्यांचा रंग लाल ऐवजी वाळूच्या रंगाचा होईल इतपतच भाजावेत. आच बंद करून मसूर धूवून घ्यावेत.
आता त्यात मसूर बुडतील अन त्यावर थोडे वर येईल इतके पाणी घालून उकळवत ठेवावे. उकळी आली की दहा मिनिटं झाकण ठेऊन शिजवावे. भाजलेले असल्याने दहा मिनिटात मसूर शिजतात.
आता त्यात हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ टाका. चिरलेली किथिंबीर घाला. कोथिंबीर मात्र भरपूर हवी.
दुसरीकडे लहान कढईत तेल घ्या. त्यात लसणाच्या पाकळ्या चेचून घाला. लसूण खरपूस लाल झाला की ही फोडणी उकळत्या मसूरात घाला. झाकण ठेऊन २ मिनिटं उकळवा. तयार आहे मसूराचे खाट्टं..
हे खाट्टं तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागतं. आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात.
अख्ख्या मसुरांची आमटी आवडते
अख्ख्या मसुरांची आमटी आवडते म्हणजे हे ही आवडेल असं वाटतय. करुन बघेन ह्या पद्धतीने.
कवि +१
कवि +१
मसूर भिजवायचे, मोड आणायचे हे
मसूर भिजवायचे, मोड आणायचे हे काही नसल्याने खुप सोपा अन सुटसुटीत अन आयत्या वेळेस करता येणारा पदार्थ आहे हा
असंच मूगाचेही खाट्टं करतो आम्ही. फक्त शिजण्याचा वेळ जरा जास्ती. पण तेही मस्त लागतं. पौष्टिक, लसणाची खमंग फोडणी अन सढळहस्ते कोथिंबीर ही या खाट्ट्यांची खासियत.
असंच मूगाचेही खाट्टं करतो
असंच मूगाचेही खाट्टं करतो आम्ही. >> आम्ही त्याला मेदगं म्हणतो
मस्त लागतं
छान आहे.मसुर भाजल्याने चव
छान आहे.मसुर भाजल्याने चव वेगळी येईल..
वॉव! अवल मस्तच रेसिपी. नेहमी
वॉव! अवल मस्तच रेसिपी. नेहमी मसूराची उसळ करून खातो, हे काहीतरी वेगळं जरा.
छान आहेच.. आमच्याकडे
छान आहेच..
आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात.>>>> हे काय आवडलं नाय..
>>आमच्याकडे नॉनव्हेज केल्या
>>आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात.
काल तुमच्याकडे सोड्याची खिचडी होती ते ठाऊक आहे बरं आम्हाला
(अवांतर -- होपफुली पचली असेल :P)
वेक्स, तुला आणि शागंला मी
वेक्स, तुला आणि शागंला मी 'सोड्याच्या खिचडीची' लिंक देणार होते. तुमच्या दोघांच्या आवडीचा विषय आहे ना.
आरती, छान रेसिपी आहे, पण नाव मात्रं आवडलं नाही. खाट्टं? आणि वर्षाचं मेदगं? मसुराची उसळ आम्हाला आवडते, पण अशी नावं सांगितली तर घरचे खायचे नाहीत.

आमच्याकडे नॉनव्हेज केल्या
आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात. >>> काय लॉजिक? काही स्पेसिफिक कारण आहे का? मला फारच उत्सुकता !
>> काय लॉजिक? काही स्पेसिफिक
>> काय लॉजिक? काही स्पेसिफिक कारण आहे का? >>>>> मला वाटतं नॉनव्हेजच जड जेवण झाल्यावर हे पचायला हलकं जात असेल अन कमी वेळात होतं म्हणुन असेल..
अरे व्वा!!! मस्त रेसिपी आहे.
अरे व्वा!!! मस्त रेसिपी आहे. झटपट होणारी आणि चविष्ट.
मसूर सीकेप्यांच्या विशेष आवडीचे असतात काय? एक मैत्रिण आठवड्यातून तीनदा तरी डब्यात आणते. अगदी चविष्ट आणि विशेष म्हणजे ती कधीच भिजत घालत नाही असं म्हणते. त्याचं गुपीत आज कळलं
मि मसुर कांदा आणि टोमेटो
मि मसुर कांदा आणि टोमेटो कापेपर्यंत भिजवते आणि कुकर मध्ये कांदा आणि टोमेटो,ल्सुन व इतर मसाले टाकुन तिन ते चार शिट्या घेते

चांगले शिजते आणि आयत्या वेळेवर पटकन होणारि कृति
पण नाव मात्रं आवडलं नाही.
पण नाव मात्रं आवडलं नाही. खाट्टं? आणि वर्षाचं मेदगं? >>> माझ्या साबा पाठारे प्रभू आहेत. त्यांच्या पदार्थांची नावे पण अशीच असतात - भूजणं, खडखडलं, आटलं, गोडं
मस्त आहे ही पाकृ. नक्की करुन
मस्त आहे ही पाकृ. नक्की करुन बघणार.
चवळी भाजून उसळ नेहेमी करतात आमच्याकडे पण हेच लॉजिक मसूर आणि मुगाला लावता येईल हे सुचलं नव्हतं
छान आहे हा प्रकार. मसूर आहेत
छान आहे हा प्रकार. मसूर आहेत माझ्याकडे. करुन बघता येईल.
चिमुरी बरोब्बर अरे वा अमृता
चिमुरी बरोब्बर


अरे वा अमृता हाही प्रकार छान लागेल
नताशा
मूग भाजून अशी आयत्या वेळेला
मूग भाजून अशी आयत्या वेळेला उसळ बर्याचदा करते. मसूराची कधी केली नव्हती. प्रेशर पॅनला लावलं तर अगदी तीन चार मिनिटामधे शिजतील ना?
नको, प्रेशर पॅन मध्ये त्याचं
नको, प्रेशर पॅन मध्ये त्याचं पिठलं होईल
अगं असही केवळ १० मिनिटात होतं 
व्वा! हे बरे आहे. मसूर पटकन
व्वा! हे बरे आहे. मसूर पटकन शिजत नाहीत, आणी कुकरमध्ये शिजवले तर गाळ होतात, त्यापेक्षा हे भाजुन घेण्याची आयडीया मस्तच. धन्यवाद अवल.
मसूर प्रचंड आवडतात आम्च्याकडे
मसूर प्रचंड आवडतात आम्च्याकडे सगळ्यांनाच. तेव्हा हे नक्की करून बघणार उद्याच.
कित्ती कित्ती दिवसानंतर मेदगं
कित्ती कित्ती दिवसानंतर मेदगं हा शब्द ऐकला. हे असे शब्द हरवून गेले आहेत भाषेतून. आमच्याकडे घट्ट गोळ्याला मेदगं म्हणतात. म्हणजे दह्यातील गोळा असला की मेदगं. भरीत मधला गोळा असला की मेदगं.
माहेरी आईच्या हातची मसूरीची
माहेरी आईच्या हातची मसूरीची आमटी/उसळ कधी आवडली नाही.
आता साबा मात्र फक्क्ड बनवतात. पण मसूरीच्या उसळीचा बेत २ दिवस अगोदर पासून ठरवतो
ही आयत्या वेळेची सांगून बघते त्यांना
मस्त!
मस्त!
एक मैत्रिण आठवड्यातून तीनदा
एक मैत्रिण आठवड्यातून तीनदा तरी डब्यात आणते.>>म्हणजे तिच्याकडे उरलेले ४ दिवस नॉनव्हेज असणार हेच ते गुपित
मस्तं पाककृती. मसूर म्हंटले
मस्तं पाककृती. मसूर म्हंटले की खिचडी किंवा तळल्यामसाल्याची आमटी होते. हे करून बघायला हवं.
अख्ख्या मसुरांची आमटी आवडते
अख्ख्या मसुरांची आमटी आवडते म्हणजे हे ही आवडेल असं वाटतय >>> +१
झक्कास ... करणार लवकरच.
झक्कास ... करणार लवकरच.
आsssssssजच करणार. किती सोप्पी
आsssssssजच करणार.
किती सोप्पी कृती आहे....
अख्ख्या मसुरांची आमटी आवडते
अख्ख्या मसुरांची आमटी आवडते म्हणजे हे ही आवडेल असं वाटतय >>> +१०
अख्ख्या मसुरांचा फ्राईड राईस पण मस्त लागतो........
हे तर फारच छान्....
Pages