पुण्या-मुंबईतून अमेरिकेत खाद्यपदार्थ कसे पाठवावेत?

Submitted by हायझेनबर्ग on 3 November, 2012 - 12:41

पुण्या-मुंबईतून अमेरिकेत तयार खाद्यपदार्थ पाठवण्यासाठी कुरिअर सेवा पुरवणार्‍या खात्रीलायक कंपन्यांची माहिती हवी आहे.
कुणाला एखाद्या कंपनीचा चांगला अनुभव आहे का?.
त्यांच्या चार्जेस वगैरे बद्दल काही कल्पना आहे का?
पार्सल पोहोचण्यासाठी साधारण किती दिवस लागतात?
खाद्यपदार्थ ई. गोष्टी पाठवण्यासाठीचे काही नियम आहेत का?
पॅकिंग मटेरियल वगैरे कुठलं चांगलं?
पॅकिंग कसं करावं ज्याने खाद्यपदार्थ प्रवासात जास्त दिवस टिकतील?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परतोनि पाहे ग्रूपमध्ये अमेरिकेतुन पुण्या-मुंबईस खाद्य पदार्थ पाठवले पाहिजेत Wink

खाद्यपदार्थ किंवा झीपलॉक्स वगैरे का? Proud
मी जपानमध्ये असतानाचा ब्लू डार्टचा अनुभव चांगला आहे. नॉर्मल ग्रोसरी जसं की पोहे, साबुदाणा वगैरे मागवला आहे तेव्हा. खार्द्यपदार्थांमध्ये चिवडा, काजूकतली वगैरे पाठवायला हरकत नाही पण लाडू वगैरे असल्यास डब्यातून पाठवायला सांगावेत. सगळीच पॅकेट्स बबल रॅप केल्यास उत्तम.

चमन, अंधेरी-पार्ला एरियात एक चांगली कुरियर सेवा आहे जी आम्ही बरेचदा वापरतो. ही त्यांची वेबसाईट
एक किलो सामान पाठवले तर रेट जास्त पडतो ( ८५० / ९०० रुपये बहुतेक ) पण जर सहा किलो वा त्यापेक्षा जास्त सामान पाठवायचे असेल तर आत्ताआत्तापर्यंत ३५० रुपये प्रतिकिलो असा रेट होता. चार दिवसांपूर्वीच बहिणीला अमेरिकेत पार्सल पोचले आहे. ताजा रेट खात्री करुन सांगते Happy

त्यांचा माणूस बॉक्स घेऊन घरी येतो आणि आपल्यासमोर सामान व्यवस्थित पॅक करतो. खाद्यपदार्थ, कपडे, पुस्तके, भांडी जातात. औषधे नेत नाहीत. एकदा मला अंजली कंपनीची विळी हवी होती ( चॉपिंगबोर्डलाच सुरी जोडलेली ) तर त्यांनी पाठवू दिली आणि व्यवस्थित पोचलीही. सामान कमीतकमी दोन दिवसात आणि जास्तीतजास्त सहा दिवसात पोचले आहे आत्तापर्यंत ( सहा दिवस रश सीझन असताना लागले होते. अगदी दिवाळीच्या दिवसांत पाठवले तेव्हा.) त्यांचे कुरियर पुढे डीएचएल किंवा तत्सम मोठ्या कंपनीतर्फे येते. ट्रॅकिंग नंबर मिळतो.

आम्ही बरेचदा कोरडा खाऊ ( फरसाण, सुक्या खोबर्‍याच्या करंज्या, चकल्या, शंकरपाळे, केळ्याचे वेफर्स वगैरे ), तयार अनारसे पीठ, मोदकपिठी, पुरणपोळ्या, गूळपोळ्या, काजूकतली, खराब न होणारे लाडू ( बेसन, मूग, डिंक वगैरे ), मसाले, भाजणी असं बरंच कायकाय मागवलं आहे. भारतातून बाहेर पडलं की बरेचदा ते थंड हवेतूनच येतं त्यामुळे सगळे पदार्थ भरपूर टिकतात आणि पुरवून पुरवून खाता येतात Happy आई प्लॅस्टिकचे हलके, थ्रो अवे टाईप डबे आणते आणि सगळे खाद्यपदार्थ त्यातून पाठवते म्हणजे पदार्थ मोडत नाहीत. साईडने कपडे, पुस्तके म्हणजे त्यांचे कुशनिंग मिळते. तीही प्लॅस्टिकच्या पिशव्यातून पॅक करते.

दादरच्या रानडे रोडवरील गोडबोले स्टोअर्स तसेच पणशीकर वगैरे अन्यही विक्रेत्यांनी हँपर्स पाठवायची सोय केलीय..तुम्ही बनवलेल्या वस्तूही ते पाठवायची सोय करतात असे ऐकले.

जल्लोश डॉट कॉम, चितळे बंधू मिठाईवाले.
http://www.jallosh.com/
आणखीही सर्व्हिसेस आहेत. चौकशी केल्यास अनेक सापडाव्यात.
माझे एक नातेवाईक व त्यांचे मित्रमंडळ मिळून दर दिवाळीत त्यांच्या अमेरिकेतील मुलांना फराळाचे पदार्थ पिंपरीहून पाठवतात. कमीतकमी सहा किलो पाठवावे लागतात असे समजले. दोनेक वर्षांपूर्वी ६०० रुपये प्रतिकिलो दर होता असे आठवते तरी नक्की पैसे किती पडले जरा चौकशी करून बघावे लागेल.

अगो +१
मला पण बाबा विचारत होते की पाठवू का फराळाचं म्हणून. कंपनीचं नाव मी विसरले पण सर्व काही अगो म्हणते तसच.

अगो +१
मला पण बाबा विचारत होते की पाठवू का फराळाचं म्हणून. कंपनीचं नाव मी विसरले पण सर्व काही अगो म्हणते तसच.

माझ्या भावाने गेल्यावेळेला आम्हाला दादरच्या पणशीकरकडून दिवाळीचा फराळ पाठवला होता... वेळेवर आला पण खास नव्हता.. खोक्याचे वजन जास्त होतं... सुमा फुड्स कसे आहे?

सुमा फूड्सच्या पदार्थांची चव चांगली असते पण दोन वर्षांपूर्वी मी मोतीचूराचे लाडू ऑर्डर केले होते ते सगळे फुटून चुरा स्वरुपात आले होते. कारण साध्या तकलादू प्लॅस्टिकच्या पॅकमध्ये घालून वरुन रबरबँडने बंद करायचा प्रयत्न केला होता.

गोडबोले पाठवतात .. काही फराळ बरा असतो , काही खवट(असे दोनदा झालेय) पण तेच सर्व पँकीग वगैरे करून पाठवतात.
खोबर्‍याच्या करंज्या खवट.. दोन्ही वेळेला होते. बाकी बरे होते.

'युनिक एअर एक्‍स्प्रेस' ने आम्ही आतापर्यंत तीन-चारदा अमेरिकेत फराळ/ खाऊ पाठवला आहे. सर्व खाऊ न मोडता/ खराब न होता सुरक्षित, वेळेत व व्यवस्थित पोचला. बर्‍याचदा खाऊ पाठवताना नीट पॅक केला जात नाही त्यामुळे प्रश्न येऊ शकतो. टपर-वेअरच्या डब्यांमधून पाठवलात तर सुरक्षित पोहोचतो. ही त्यांची वेबसाईट :
http://www.uniqueairexpress.com/default.aspx
मुंबई-पुण्यातही ऑफिसेस आहेत.

Zampi, dhanyavaad. godbole storesbaddal feedback havach hota karaN parwach tyanchee jahirat baghun faraLache magavave ka asa vichar kela hota.

Punyat Patankar Khauwale hi pathavtat. Mi
madhe chaukashi karat astana kalale. 3999 madhe diwali cha faral.
Ajun mahiti kalalyas post karen.

अगो, ३७५/- रु. एका किलोला, आणि किमान ६ किलो खाऊ पाठवायला लागतो, हे गेल्या खेपेस (दिवाळीच्या दरम्यान) होते. + १२ % व्हॅट.
कमीत कमी ५ वर्किंग डेज लागतात डिलीव्हरीसाठी.

गर्दीच्या दिवसांत १० वर्किंग डेज होऊ शकतात. (आम्ही अगोदर किंवा नंतर खाऊ पाठवल्यामुळे हा प्रश्न आला नाही)
कमी खाऊही पाठवू शकता, पण घरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार ते तितके किफायतशीर नाही.

पुण्यातील ऑफिसचा पत्ता :

130, Siddhivinayak Apartments, Behind Shaniwar Police Chowkey, Near Karve Mangal Karyalaya, Shaniwar Peth, Pune ,Maharashtra 411030, India
020 6720 0000

* मी अगोदर दिलेला साईटचा पत्ता चुकीचा होता, आताच त्यांचे विशेष पत्रक घरी आलेले पाहिले. त्यावरचा संकेतस्थळाचा पत्ता http://uniqueairexpress.com/Home.aspx असा आहे.

सर्वांना माहिती शेअरिंगसाठी खूप खूप धन्यवाद.
युनिक एअर एक्स्प्रेसची सेवा चांगली आहे आणि तीच वापरावी असा निष्कर्ष मी सध्यापुरता काढला आहे. अजून एखादी चांगली सेवा कळाल्यास ईथे लिहिनच.
ईतरही बर्‍याच जणांना ह्या माहितीचा ऊपयोग होईल.
पुनश्च धन्यवाद.

ह्या माहितीमध्ये किंवा सर्विस प्रोवायडर्स मध्ये काही नवीन अ‍ॅडिशन झाली आहे का ?

सध्याचा रेट ५०० प्रति किलो असा आहे. यात बॉक्स आणि पॅकिंगचे वजन धरलेले असते. कुरीयरवाले घरी येतात, सगळी लिस्ट करतात आणि आपल्यासमोर वजन करून दाखवतात.

बरं उशीर झाला आहे पण विचरतो. मला बेन्गलोर मध्ये एका व्तक्तीला ऑनलाईन फराळ पाठवायचा आहे.
पैसे पेपल वा क्रेडिट कार्ड ने देऊ शकेन... कुणाला अनुभव ....

विकु,
amazon india .. काही भागात दुपारी १ वाजेपर्येन्त ऑर्ड्रर दिली तर रात्री पर्यन्त सामान घरी येते.

मी १ day option मध्ये पुस्तके , apple case, ४० इन्च TV मागवला होता . अनुभव चांगला अहे. मिठाई नाही मागवली कधी.

DHL ने सध्या १० kg साठी ६६०० चा रेट सांगितला. तर अजुन एक garudavega आहे , त्यानी ५९०० चा सांगितला. ८ दिवसापर्यंत पार्सल पोहोचेल. दोन्ही रेट्स पुणे ते कॅलिफॉर्निया साठी आहेत.

Pages