बासमती तांदूळ, धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून
कांदा
लसूण
आलं
हिरव्या मिरच्या
कोथींबीर
नारळाचं दूध/canned coconut milk
टोमॅटो
मटार दाणे
कसूरी मेथी
लवंग
दालचीनी
थोडी हळद
मीठ
आवडत असल्यास काजू
पुलाव शिजवण्यासाठी लागेल तसं पाणी
नारळाचं दूध घरी करायचं असेल तर तांदळाच्या दुप्पट पाणी मोजून ठेवावं .. आणि तेच पाणी वापरावं म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही .. canned वापरायचं असेल तर शक्यतो मोजून घ्यावं .. थोडक्यात संपूर्ण रेसिपी मध्ये वापरल्या जाणार्या पाण्याचं प्रमाण तांदळाच्या दुप्पट हवं हे ध्यानात ठेवावं ..
तर सगळ्यात आधी, कांदा, लसूण आणि आलं वाटून घ्यावं .. थोडा कांदा बारीक चिरून घ्यावा ..
ह्याननंतर अजून एक वाटण लागेल ते म्हणजे कोथींबीर, मिरच्या, चिमूटभर हळद, लवंग आणि दालचीनी ..
ही दोन्ही वाटणं तयार ठेवावीत ..
तेल गरम करून त्यात अख्ख्या लवंगा आणि दालचीनी परतून घ्यावी .. त्यात चिरलेला कांदा घालून परतावा .. मग त्यात कांदा, आलं आणि लसूण वाटण घालून व्यवस्थित परतून घ्यावं .. Next, चिरलेला टोमॅटो घालावा .. परतणं चालूच ठेवावं .. हे सगळं मिश्रण छान परतून झालं, अगदी तेल सुटेपर्यंत की मग त्यात मटार दाणे, कोथींबीरीचं वाटण, नारळाचं दूध, गरज असल्यास जास्तीचं पाणी, मीठ, कसूरी मेथी आणि तांदूळ घालून एकजीव करून उकळी आणावी .. ह्याननंतर मग झाकून ठेवून, पुलाव शिजवावा ..
आवडत असेल तर काजू तेलात fry करून वरून घालता येतील serve करताना .. मला नेवैद्य दाखवून मेथी पुलाव चा आनंद घ्यावा .. :p
ह्या रेसिपीत, कांदा दोन प्रकारे लागतो, एकदा वाटणासाठी आणि मग नुसताच चिरून तेलात परतण्यासाठी .. तसंच लवंग, दालचीनी ही, वाटणात आणि मग अख्खी तेलात परतावी ..
ह्या पुलाव बरोबर कांदा, टोमॅटो किंवा आवडीप्रमाणे आणखी कशाचंही दह्यातलं रायतं serve करावं .. दह्यातलं रायतं हे छान complement आहे, पुलाव मसालेदार असल्यामुळे ..
कसूरी मेथी
कसूरी मेथी नसेल तर मेथीची पानं घातली बारिक चिरून तर चालेल का?
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
तांदूळ न
तांदूळ न घालताच पुलाव कसा होणार? ते कधी घालायचे ते लिहिलंच नाहीये.
.
पाककृती छान आहे. मी करून बघेन आणि मग इथे प्रमाण टाकायचा प्रयत्न करेन. पण एकूण साहित्यावरून वाटतंय की साधारण मेथी मटर मलईची चव असते तशी चव लागेल का पुलावाची??
.
पूनम, मेथीची पानं धुवून कडकडीत उन्हात वाळव. हातानेच चुरता येतील इतकी वाळव म्हणजे झाली कसूरी मेथी तयार. आणि आत्ता पावसाळ्यात ऊन पडत नसेल मेथी धुतल्यावर पंख्याखाली सुकव किंवा कोरड्या किचन नॅपकिन वर ठेव. कोरडी झाली ती नुसतीच कडल्यात कुरकुरीत होईपर्यंत परत.....
मस्त लागतो
मस्त लागतो हा पुलाव ! फक्त पाण्याचा अंदाज बरोबर हवा कारण नारळाचं दूध पण असतं ना.
मंजू , मेथी मलई मटर सारखी नाही, कारण हा जरा जास्त मसालेदार होतो, आणि गोडसर पण नसतो.
कसूरी मेथी + मेथीची पानं असं पण छान लागतं गं पूनम.
सशल, दह्यातलं रायतं अजून कशाचं करता येईल याबरोबर, कांदा/टोमॅटो/बटाटा सोडून ?
मेथी
मेथी कडकडीत करण्यासाठी, मी धुवुन कागदावर पसरवुन वाळवते आणि कोरडी झाल्यावर कागदातच बांधुन फ्रिज म्ध्ये ठेवते. दोन-चार दिवसातच अगदी कडकडीत होते. अशिच कोथीबिर आणि पुदिना पण वाळवते. मग कधी दह्यात, डोस्याच्या पिठात, भजात वापरते. कोथीबीर आणि पुदिना दह्यात मिस्क केला की खुप छान दिसते आणि लागतेही.
कसुरी मेथी आणि आपण वापरतो ती मेथी वेगळी असे मी कुठेतरी वाचलेले.... जाणकारांनी माहिती द्यावी.
एक प्रश्न - तांदुळ कधी घालावेत?? जेव्हा नारळाचे दुध वगैरे घालुन उकळवतो तेव्हाच घालुन सगळे एकत्र शिजवावे??
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
सगळे घालून
सगळे घालून झाले व तेल सुटले की शेवटी तांदूळ घालायचे.
पुदीना दह्यात मिक्स करताना आधी वाळवून कुस्करूनच घ्यायचा का ? अजून काय घालायचे त्यात ?
फ्रिजमध्य
फ्रिजमध्ये ठेऊन दिला की पाने कडकडीत होतात. ती तशीच ठेउन द्यायची. वापरताना हवी तेवढी पाने घेउन टाकताना हातानी चुरडुन टाकायची इतकी कडकडीत होतात की मस्त बारिक पुड होते.. दह्यात खुपच सुंदर दिसते.
एकदा असेच एका मोठ्या (म्हणजे महागड्या ) हॉटेलात गेलेलो. तिथे एका पराठ्याबरोबर कर्ड विथ हर्ब्स होते. मागवले. पाहते तर तेच... कर्ड विथ कुस्करलेला पुदिना आणि कोथींबिर.......इतके हसलो आम्ही.....
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
अश्विनी,
अश्विनी, ह्या पुलावाबरोबर रशियन सॅलड छान लागेल. मी आत्ताच लिहिलंय बघ इथे.
अगं page not found
अगं page not found येतंय.
ही ही ही ..
ही ही ही .. तांदळाचं राहूनच गेलं .. एडिट करते ..
नारळाच्या दुधाऐवजी कोकोनट
नारळाच्या दुधाऐवजी कोकोनट मिल्क पावडर वापरुन दुध बनवलं तर बरं लागेल का? घरात आहे. आज बनवता येईल.
अल्पना, मी इतर भाताच्या
अल्पना, मी इतर भाताच्या रेसिपीमधे कोमट पाण्यात मॅगीची कोकोनट मिल्क पावडर मिसळून वापरली आहे . चांगली लागते चव.
मी असा पुलाव कॉर्नचे दाणे
मी असा पुलाव कॉर्नचे दाणे टाकुन करते.
आता मटार टाकुन करुन बघेन
ताजी मेथी (आणि तांदूळ) घालून
ताजी मेथी (आणि तांदूळ) घालून पुलाव केला. छान लागतो ताज्या मेथीनेही.
सोबत ' Trader Joe' चे sea salt and pepper chips (तांदळाचे असतात, पापडासारखे लागतात.) आणि सोलकढी.
वा वा! फोटो झकास एकदम!
वा वा! फोटो झकास एकदम!
लोलाच्या मेपुचा फोटो
लोलाच्या मेपुचा फोटो मस्त!!
मी जेव्हा जेव्हा केलाय तेव्हा तेव्हा ताजी मेथीच घातली आहे आणि नो नारळाचं दूध
आमच्या घरी एकदम हिट्ट झालाय हा पुलाव... मसालेदार लागतो, पण त्याबरोबर नेहमीच दहीवडे केले आहेत, त्यामुळे एकदमच हिट्ट!!
मी कसुरी मेथी अन मॅगीची
मी कसुरी मेथी अन मॅगीची कोकोनट मिल्क पावडर घालून केला हा पुलाव. सगळ्यांनी आवडीने खाल्ला. डब्यात सुद्धा नेला मुलांनी एक दिवस.
अरे वा मेधा .. पुलाव
अरे वा मेधा .. पुलाव आवडल्य्यचे कळवल्याबद्दल आभार ..
सशल, येत्या शनिवारॉ करायचा
सशल, येत्या शनिवारॉ करायचा विचार आहे. वर जे कोथिंबिरीचं वाटण आहे त्यात घालायची लवंग, दालचिनी कच्चीच घालायची की जरा तेलात परतून?
सायो, कच्चीच घालायची ..
सायो, कच्चीच घालायची ..
ताजी मेथी + कसुरी मेथी +
ताजी मेथी + कसुरी मेथी + मॅगीच्या कोकोनट पावडरने नारळाचं दुध घालून काल केला. खूप आवडला घरात.
मेथी आणि ना.दु. च परमाण काय
मेथी आणि ना.दु. च परमाण काय घेतलस अल्पना?
सशल, खुप धन्यावाद ! परवा ह्या
सशल, खुप धन्यावाद !
परवा ह्या पद्ध्तीने पुलाव केला होता. मस्तच झालेला.
मी एक वाटी तांदळासाठी एक वाटी
मी एक वाटी तांदळासाठी एक वाटी चिरलेली मेथी, १/२ वाटी नारळाचं दुध घेतलं होतं. (आमच्याकडे नारळाचं दुध घातलेला पदार्थ आवडेल की नाही याची शंका होती. पुढच्यावेळी नारळाचं दुध अजून थोडं जास्त घेईन)
ओके.. आणि मग कसुरी मेथी किती
ओके..
आणि मग कसुरी मेथी किती घेतली?
पुलाव अर्धवट शिजल्यावर बचकाभर
पुलाव अर्धवट शिजल्यावर बचकाभर कसुरी मेथी टाकली होती.
ओके.. धन्यवाद..
ओके.. धन्यवाद..
काल केला होता मेपु... ताजी
काल केला होता मेपु... ताजी मेथी घालून.. अप्रतिम झाला होता
रेसिपीबद्दल धन्स सशल
या पध्दतीने केलेला मेथी पुलाव
या पध्दतीने केलेला मेथी पुलाव फार आवडतो.
आज बागेतली ताजी मेथी तोडून लगेहाथ हा पुलाव केला आणि यावेळी आठवणीने फोटो काढला. सशल, रेसिपीकरीता थॅन्क्यु
मीपु, सुरेख दिसतेय प्लेट आणि
मीपु, सुरेख दिसतेय प्लेट आणि मेथी पुलाव. तडक उठून यावं काय?
वॉव पुणेकर मस्त.
वॉव पुणेकर मस्त.
सशल मस्त रेसीपी. आताच करते!
Pages