'हेल्दी ओट मफिन्स' - ब्रेकफास्ट ऑन द गो (फोटोसह)

Submitted by लाजो on 18 June, 2012 - 20:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हे लोफ / मफिन्स लो कॅलरी, लो फॅट, हाय फायबर इ इ असे बहुगुणी आहेत Happy

BOM08.JPGकोरडे जिन्नस:

दीड कप कणिक,
एक कप रोल्ड ओट्स *
दीड टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून बेकिंग सोडा
३/४ कप ब्राऊन शुगर,
चिमुटभर मिठ (ऐच्छिक)
दालचिनी पावडर / वॅनिला इसेन्स - स्वादानुसार

ओले जिन्नस:

३/४ कप लो फॅट कनोला स्प्रेड / तेल
१ अंडे,
३/४ कप ते १ कप दूध / बटरमिल्क^^

इतर जिन्नस:

२ टेबलस्पून मध

--

पुढिलपैकी काहिही आवडेल ते - (ऐच्छिक)

३/४ कप पिकलेले केळे मॅश करुन / कुकिंग अॅपल / पेअर / अन्य फळं / सुकामेवा
पिकान्स / अक्रोड तुकडे
-----------

प्रमाण तक्ते

क्रमवार पाककृती: 

BOM05.JPGलोफ / मफिन्स :

१. सर्वप्रथम ओव्हन १८० डिग्री सें ला तापत ठेवा. मफिन पॅन्स / लोफ पॅन्स ना ऑईल स्प्रे मारुन कणकेने डस्ट करुन घ्या. किंवा पेपर कप्स घालुन तयार ठेवा.

२. एका बोल मधे सर्व कोरडे जिन्नस एकत्र करुन घ्या. यातच ड्रायफ्रुट्स / अक्रोड इ इ घालणार असाल तर मिसळा (व्हॅनिला इसेन्स वापरणार असाल तर तो वगळा).

३. दुसर्‍या मोठ्या बोल मधे ओले जिन्नस एकत्र करुन घ्या. (यात व्हॅनिला इसेन्स घाला).

४. आता ओल्या मिश्रणामधे हळु हळु कोरडे मिश्रण घाला. एकीकडे लाकडी चमच्याने / स्पॅट्युलाने मिश्रण हलकेच ढवळत रहा. असे सर्व कोरडे मिश्रण ओल्या मिश्रणात मिक्स्स करा. जास्त ढवळु नका.

५. ओले + कोरडे मिश्रण तयार झाले की यात मॅश्ड केळे / कुकिंग अॅपलचे तुकडे / पेअरचे तुकडे इ इ आपल्या आवडीप्रमाणे घाला आणि हलकेच ढवळून घ्या.

BOM01.JPG

६. तयार मफिन / लोफ पॅन्स मधे मिश्रण ओतुन २०-२५ मिनीटे बेक करा.

BOM02.JPGहनी सिरप:

७. एका छोट्या बोलमधे मध आणि २ चमचे उकळते पाणी मिक्स करा.

८. लोव्ज / मफिन्स गरम असतानाच त्यांना टूथपिक ने वर भोके पाडा आणि त्यावर हे हनी सिरप चमच्याने पसरा.

बनाना + हनी + दालचिनी लोव्ज

BOM04.JPGसफरचंद + अक्रोड मफिन्स

BOM07.JPG

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात ८ मिनी लोव्ज किंवा १२ स्टँडर्ड साईजचे मफिन्स होतात
अधिक टिपा: 

१. मुळ रेसिपी मधे सेल्फ रेसिंग फ्लार, साधी साखर, बटर, बटरमिल्क वापरले आहे.

२. * रोल्ड ओट्स (ओटमिल) पटकन शिजतात. जर साधे ओट्स असतिल तर ते कोमट दूधात थोडावेळ भिजत घाला.

३. ^ मी आमंड मिल्क वापरले आहे. फुलक्रिम / स्किम्ड / लो फॅट / सोया कुठल्याही प्रकारचे दूध चालेल.

४. साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता. मी केळे घातले आहे म्हणून साखर कमी घेतली आहे. आणि फर्मली पॅक्ड ब्राऊन शुगर (बारीक आणि मऊ असते) वापरली आहे. मुळ रेसिपी मधे १ कप साखर वापरली आहे.

५. अर्ध्या मिश्रणात मी मॅश्ड केळे घालुन थोडे लोव्ज बनवले आणि उरलेल्यात सफरचंदाचे तुकडे घालुन थोडे मफिन्स बनवले आहेत.

BOM06.JPG

६. हनी सिरप घातले नाही तरी चालेल. त्याऐवजी केरॅमल / चॉकलेट टॉपिंग घालता येइल. पण मग ते लो कॅल नाही होणार Proud

७. असा एक लोफ 'ब्रेकफास्ट ऑन द गो' साठी बेस्ट Happy त्याबरोबर इन्स्युलेटेड कॅरीकप (थर्मॉस) मधे दूध घेतले तर आणखिनच उत्तम Happy

८. हेच मफिन्स दुपारच्या नाश्त्याला करायचे असतिल तर साखर, फळे न घालता किसलेले गाजर / कॅप्सिकम / कॉर्न आणि आलं लसुण पेस्ट / गरम मसाला / जिरे-मिरे / ओवा / इटालिअन हर्ब्ज, दूधाऐवजी बटरमिल्क आणि चविला मिठ घालुन सेवरी टाईप्स करता येतिल. यात आवडीप्रमाणे थोडे चिझ देखिल घालता येइल Happy सॉस बरोबर गरमागरम छान लागतिल Happy

माहितीचा स्रोत: 
मुळ बनाना ओट मफिन रेसिपी आणि त्यात मी केलेले पौष्टिक बदल
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिहू, छान दिसतायत मफिन्स Happy आवर्जुन केले म्हनून सांगितले आणि इथे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद गं Happy

पौर्णिमा तुझेही खुप धन्यवाद Happy

नंदिनी, लोफ / मफिन पॅन नसले तरी ओव्हनप्रुफ काचेचे बोल्स, वाट्या , केक चे गोल भांडे यातही करता येतिल..

मला खजुर पावडर भेट मिळालीय. तिनेक आठवड्यापुर्वी बनाना लोफ बनवताना साखरेच्या जागी ती वापरली. लोफ वरुन थोडाफार फुलला, तळाला थोडे पिठ न फुलता घट्ट बसुन होते. मला वाटते खजुर पावडर नीट मिस्क झाली नसणार आणि त्यामुळे ती खाली बसली असणार.

मागे खजुर लोफ बनवताना खजुर नीट तुकडे करुन न घेतल्याने असाच जड होत लोफच्या तळाशी बसला होता. वरच्या बाजुने फुललेला आणि खालच्या बाजुने सांदणासारखा बसलेला खजुर लोफ माझ्या वाट्याला आलेला.. Happy

उद्या वरचा हेल्दी लोफ खजुर पावडर वापरुन करायचा प्रयत्न करुन पाहते . आय होप माय गँबल पेज.. (विश मी लक मैत्रिणींनो Happy )

साधना,

खजुर पावडर डायरेक्ट घालायच्या ऐवजी आधी थोड्या कोमट दुधात विरघळुन घे म्हणजे मग नीट मिक्स होइल Happy

खजुन लोफ मधे खजुराचे तुकडे घालताना ते आधी मैद्यात घोळवुन घ्यायचे आणि मग बॅटर मधे मिक्स करायचे मग नाही बसत ते खाली जाऊन Happy

नंदिनी, लोफ / मफिन पॅन नसले तरी ओव्हनप्रुफ काचेचे बोल्स, वाट्या , केक चे गोल भांडे यातही करता येतिल..
>> वोक्के. करके देखेंगा.

मस्त झाले लाजो हे मफिन्स... लेक आणि नवरा आवडीने खात आहेत Happy
मी सफरचंद वापरली यात.... (अ‍ॅपल पिकिंग ची कृपा)
लेकीची फर्माईश सजावट म्हणून ट्रूटी-फ्रूटी टाकलेत वर.... अरे हो आणि ते क्वेकर फ्लेवर्ड ओट्स वापरून चांगले झालेत.. बरेच दिवस पडुन होती पाकिटं ती वापरात आली थँक्यू Happy हे बघ फोटो....

rsz_1rsz_img_0058.jpgrsz_11rsz_img_0059.jpg

खजुर पावडर वापरुन लोफ केला आणि संपलाही. खजुर पावडर कोमट दुधात घालुन ठेवलेली तरी मला तळाला लोफ ब-यापैकी ओला वाटला. लेकीने 'मस्त वाटतेय पिठासारखे खायला' म्हणत खाल्ला पण मला तरी अजुन थोडा कोरडा झाला असता तर बरे झाले असते असे वाटले. यापुढे उरलेली खजुर पावडर शि-यात्/हलव्यात वापरुन संपवणार. कुठल्याही लोफमध्ये वापरणार नाही.

मागे एकदा तेलाच्या जागी शेंगदाणा तेल वापरलेले. तयार लोफला तेलाचा कच्चट वास येत होता. मग मुद्दाम लोफ करण्यासाठी सनफ्लॉवर आणले. पण एकदा लोफसाठी वापरुन झाल्यानंतर परत लोफ केलेच नाही. शेवटी ते तेल सैपाकाला वापरले. काल परत तेल आणायचा कंटाळा केला. शेंगदाणा तेल थोडे गरम केले आणि मग थंड करुन वापरले. एवढा काही वास आला नाही. आता ऑऑ ची एक बाटली आणुन ठेवायला हवी. ते वापरुन्केलेले लोफ सगळ्यात छान लागलेले.

वा, मस्तच दिसत आहेत सगळ्यांचे मफिन्स. साधना, माझ्याकडे पण बरीच खारीक पावडर पडून आहे आणि तू इथे एवढं लिहूनही मला प्रयोग करायची खुमखुमी आलीय Wink

काल परत तेल आणायचा कंटाळा केला.>> केकसाठी तेलच वापरायचे असा अट्टहास का? लोणी-तूप वापरूनही चव मस्त लागते.

खजूर पावडर दुधात थोडी भिजत घालून नंतर ब्लेंड केली की मस्त खजूर मिल्कशेक तयार होते. नाहीतर ती लाडवातही घालता येईल.

अगो, खारीक पावडर लाडवात घाल.

अगं साधना खजूर पावडर म्हणाली म्हणून तिच्यासाठी खजूर पावडरीचा उल्लेख केला, तू खारीक पावडर म्हणालीस म्हणून तुझ्यासाठी खारीक पावडर म्हटलं Proud

मग तुझ्या म्हणण्यानुसार खारकेची पावडर होईल आणि खजूराचे गंध (!) (चूर्ण म्हणवत नाहीये!) Biggrin

बर बास. त्यापेक्षा मफिन्स करा! Happy

सही !
मानुषी >>>लाजो "द बेकिन्ग क्वीन ऑफ माबो"! <<< +१००
सर्वांचेच मस्त झालेत.

आज केले लाजो हे मफिन्स. मी तेलाऐवजी तूप वापरले. मस्त चव आली. मी एका अंड्याऐवजी दोन अंडी वापरली म्हणून असेल पण रंग मात्र जरा फिक्कट आलाय आणि थोडे कोरडे वाटले मला. पुढच्यावेळेला दूध थोडं जास्त घालेन.

केकसाठी तेलच वापरायचे असा अट्टहास का? लोणी-तूप वापरूनही चव मस्त लागते.

अगं तसे तर चांगले होतातच नो डाऊट. पण माझ्याकडे तुपाचा जास्त साठा नसतो आणि हेल्दी करायचे म्हटले की लोणी वापरायला जीवावर येते. अर्थात केक बनवायचा असेल तर मग मी बहुतेक लोणीच वापरते. तेल कधी वापरले नाही अजुन. (प्रयोग करुन पाहायला हवा) केकमध्ये पोत कसा येतोय हेही महत्वाचे असते. लोफमध्ये एवढा फरक पडत नाही.

खजूर पावडर आणि खारीक पावडर मधे आधी २-३ चमचे कणीक मिसळून बघा. म्हणजे ती नीट पसरेल. मफिन्स्मधे चॉकोलेट चिप्स घालताना असेच केल्याने ते तळाशी बसत नाहीत.

पूनमच्या टीपेप्रमाणे अंड्याऐवजी एक कप दही घालून ओटस् लोफ केला. मस्त फुगला वगैरे, पण १८० डिग्रीला ३० मिनिटे भाजूनही मधे ओला राहिला. मग पुन्हा २०० डिग्रीला १५ मिनिटं भाजला Uhoh तेव्हा छान झाला. माझी बेपा बहुतेक नविन आणायला हवी आहे. लोफची चव आवडली. छान हलकाही झाला.
दीड कप मापाने भरपूर झालाय. डब्यात तुकडे भरून ठेवलेत. काल छान लागत होते, पण आज जरा दमट/ किंचीत ओलसर लागताहेत. का असावे असे?

माझा असा अंदाज(च) आहे फक्त की कणकेचा केक/लोफ वगैरे केले की नंतर ते ओलसरच राहते, कारण हाच अनुभव बनाना ब्रेडचाही आहे. मैद्याचे केक/ मफिन्स केले की कोरडे होतात आणि राहतात.

मंजूडी, दह्यामुळे सुद्धा असू शकेल कदाचित. दह्यात पाणी जास्त असेल तर नेक्स्ट टाईम थोडा वेळकअपड्यात बांधुन थोडे पाणी निथळून घेऊन ट्राय करुन बघ.

मैद्या ऐवजी कणिक वापरली तर इतका फरक जाणवणार नाही मला वाटते.

अंडे घातले तर ते बाईंडिंगचे काम करते त्यामुळे अंडे घातलेले केक जास्त टिकतात आणि बीनाअंड्याचे त्यामानाने कमी असा माझा कयास आहे.

ज्यांनी ज्यांनी हे मफिन्स करुन बघितले आणि इथे कळवले त्या सर्वांना बिग थँक्यु Happy

लाजो,
फारच उत्तम रेसिपी! गेले काही दिवस ब्रेकफास्ट चे वेगळे पर्याय शोधत होते. तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि मग नको ते (unhealthy) खाल्ले जाते. नवर्‍याला ओट्स फारसे प्रिय नाहीत, पण असे काही केले की खातो!! छोटे बाळ आहे ते पण नंतर वेगवेगळे मागेलच. त्यासाठी सध्या trials चालू आहेत. बेकिंग क्षेत्रात (आणि माबोवर पण) मी तशी नवीनच. त्या मानानी हा पहिला प्रयत्न बरा झाला. मी केलेले बदल:
१. रोल्ड ओट्स नव्ह्ते, त्यामुळे ओट ब्रान + कणिक असे केले.
२. गाजर, भोपळी मिर्ची, पातीचा कांदा असे घातले.

माझा मसाला थोडा जास्त वाटतोय. ( २.५ teaspoon + crushed red pepper). तो कमी घालीन पुढच्या वेळी.

एक विचारायचे आहे की यात तेल कमी चालेल का?

Pages