तांदळाचे पीठ, मसूराचे पीठ, हरबरा डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ, बारीक रवा प्रत्येकी दोन मोठे चमचे
१ मोठा चमचा तेल
३-४ पालकाची पाने बारीक चिरुन
१ मोठा चमचा कोथिंबीर बारीक चिरुन
गाजराचा बोटभर तुकडा बारीक किसुन
मसाल्याच्या डब्यात असतो तो अर्धा चमचा हळद आणि तिखट
चिमुटभर ओवा
चवीनुसार मीठ
१ कोबीचे पान, २ टोमॅटोच्या चकत्या, २ व्हीट अथवा व्हाईट ब्रेड, १ चीझ स्लाइस.
३-४ थेंब तेल नंतर धिरडी घालायला.
सर्व पीठे, ओवा, पालक, कोथिंबीर, गाजर, मीठ एकत्र करुन १ चमचा तेल व पाणी घालुन भज्याच्या पीठापेक्षा थोडे पातळ भिजवावे.
३-४ थेंब तेल नॉनस्टिक तव्यावर घालुन तवा गरम करावा. १ मोठा डाव पीठ घालुन फुलक्याच्या आकाराची धिरडी करावीत. तेल फक्त पहिले धिरडे करताना घालावे. नंतर प्रत्येक धिरड्याला फक्त पाणी शिंपडावे.
धिरडे जरा कोमट झाल्यावर चार तुकडे करावेत. ब्रेड आवडीप्रमाणे भाजुन घ्यावा. इलेक्ट्रिक टोस्टर असेल तर तेल्/तुप्/बटर न घालता छान टोस्ट होतो. ब्रेडवर कोबीचे पान, टोमॅटोची चकती लावावी. मग ब्रेडच्या प्रत्येक कडेला एक असे धिरड्याचे चतकोर तुकडे लावावेत म्हणजे खाताना प्रत्येक घासाला सारखीच चव येते. वरुन चीझ स्लाइस आणि दुसरा ब्रेड लावले की सँडवीच तयार.
१० मिनिटात चार जणांचा पौष्टिक नाष्टा तयार होतो. पीठ आधी भिजवुन ठेवायची गरज नाही. भिजवल्याबरोबर धिरडी घातली तरी छान जाळीदार होतात.
ओव्याची छान चव येते आणि दोन्-दोन डाळीची पीठे असली तरी पोटास त्रास नाही (लहान मुलांना). कोबीऐवजी लेट्युस घेतला तरी चालतो. पण कोबीच्या a substance in cabbage inhibits the conversion of sugar and other carbohydrates into fat ह्या गुणधर्मामुळे मी कोबीच घेते.
कुठल्याही फळाच्या एक पेलाभर रसाबरोबर हे खाल्ल्यास चांगलाच पौष्टिक नाष्टा होतो.
म्म्म्म्म..
म्म्म्म्म.. तों. पा. सु! सही दिस्तय सँडवीच. ए यात कांदा पण झकास लागतो बरं. कच्चा कांदा कापून टोमॅटोबरोबर सँडवीचमध्ये घालावा.
हो कच्चा
हो कच्चा कांदा छानच लागतो. पण मला सकाळी-सकाळी कच्चा कांदा खायला आवडत नाही
मस्त
मस्त दिस्ताहेत धि. सँ!!! नक्की करून बघते.
कधीमधी तुझ्या कॉलोकेशिया लिफ रोलचं पण सँडविच करंत जा!
मस्त लागतं!
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी
छान आहेत
छान आहेत धिरडी... फोटो एकदम tempting आलाय.. मस्तच
मी ही recipe
मी ही recipe नवती बघितली. orkut वरच photo बघितला. मस्तच दिसतीए.... मी try करेल आणि तुला अभिनंदन .
पाहिले नव्हते इथे. मस्त
पाहिले नव्हते इथे. मस्त वाटतय.. करणार.
मी मिस केली होती हे रेस्पी.
मी मिस केली होती हे रेस्पी. आता नक्की करून पहाणार - डब्यात देण्याजोगा पदार्थ दिसतोय .
मसुराचं पीठ इंग्रोमधे मिळतं का ?
माझा पण तोच प्रश्न होता.
माझा पण तोच प्रश्न होता. मसुराचे पीठ मिळते का?
मिळतं बहुधा.
मिळतं बहुधा.
भारतातुन आणा/मागवा. आमच्या
भारतातुन आणा/मागवा. आमच्या इथे तरी दिसलं नाही कधी.
नाविन्यपूर्ण रेसिपी
नाविन्यपूर्ण रेसिपी आहे..
मसूर सोडून बाकीची पिठं अवेलेबल आहेत.. मस्त टेंप्टिंग आलाय फोटो.. टेंप्टेशन होतंय लगेच करून बघायचं..
मसुराचं पीठ नव्हतं म्हणून
मसुराचं पीठ नव्हतं म्हणून थोडं बाजरीचं पीठ घातलं मी अन पालक नव्हता म्हणून चार्डाची पानं बारीक चिरुन घातली. मस्त हिरवागार रंग आला होता. सँडविच करायच्या अगोदरच धिरडी गट्टम झाली