आज बाप्पा घरी जाणार.. म्हटलं, आवडता प्रसादच का नाही?
हो ना बाप्पा? बरोबर ना?
तळणं नको व उकडणं नको. ह्याला काटछाट म्हणून बटाट्याची पारी वापरून " बटाटा-काजू मोदक" सादर करतेय. बरेच दिवस विचार केला की काय करु शकतो. पण वेळे अभावी न्हवते जमत. आज जमले.
मुख्य घटकः
२ टेबलस्पून तांदूळ पीठ,
१ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा
१ खिसलेलं सफरचंद
इतर ४ घटकः
१ टेबलस्पून काजूची अतिशय बारीक वाटलेली पूड,
१ टेबलस्पून पिस्ता पूड,
अर्धा टेबलस्पून साखर
२ चमचे बेदाण्याचा गर (बेदाणे वाटून)
इतरः
वेलची पूड,
१ लहान चमचा आलं खिसलेलं,
लवंग, दालचीनी व चिमटीभर जायफळ पूड,
साजूक तूप लागेल तसे
मीठ
दूध भरपूर केशर टाकून उकळून थंड करून,
पाव चमचालिंबू रस
१) तांदूळाचं पीठ कोरडंच हलक्या रंगावर भाजून घ्यावं.
२)मंद आचेवर एका भांड्यात, उकडलेल्या बटाट्यात १ चमचा साजूक तूप, पाव चमचा साखर व केशर मिश्रीत दूध घालून घोटवून घ्यायचे. गोळा व्हायला लागले की तांदूळ पीठी व काजू पूड घालून ढवळावे. चिमटी भर मीठ घालून आच बंद करून झाकून ठेवावे. मळून एकदम एकजीव झाले पाहिजे नाही तर पारी फाटते. केशराने रंग हलकासा पिवळा येतो.
३) दुसर्या टोपात, खिसलेलं सफरचंदात, लिंबूरस, आलं, लवंग-दालचीनी-जायफळ पूड,उरलेली साखर(बेदाण असल्याने साखर कमी घ्यावी), बेदाणा गर घालून मंद आचेवर ढवळत रहावे. गोळा होत आला की पिस्ता पूड, चिमटीभर मीठ, वेलची घालून बंद करावे.
४) पोळपाटावर पारी लाटून घ्यावी जरासे दूध लावून. मग नेहमीप्रमाणे वरील मिश्रण घालून मोदक करावे.
५) बाप्पाला नैवेद्या दाखवून सर्व जणांना सुख लाभो ही प्रार्थना करून गट्टम केले.
आलं व सफरचंद मस्त लागलं चवीला.
उकडीच्या मोदकाला पर्याय आहे. बटाटा असल्याने पारी फुटत नाही, उकडण्याची कटकट नाही.
चवीला अप्रतिम लागले.
१. सफरचंद मऊ असणारे नाही तर करकरीत घेतले तर उत्तम
२. बेदाणा असल्याने साखर बेताची घाला त्यामुळे खूप गोड नाही होत व चव छान लागते.
मस्त कल्पना!मोदकही खूप सुबक
मस्त कल्पना!मोदकही खूप सुबक झाले आहेत.स्पर्धा जाहीर झाल्यापासूनच उत्सूकता होती कोणते पदार्थ असतील ह्याची!
भारी कल्पना !
भारी कल्पना !
छान लागेल चवीला कधी तरी करून
छान लागेल चवीला
कधी तरी करून पाहिन
देवीका, धाग्याचं शीर्षक
देवीका,
धाग्याचं शीर्षक कृपया, नियमात लिहिल्याप्रमाणे बदलणार का?
http://www.maayboli.com/node/37440
देविका फार छान पदार्थ आहे हा.
देविका फार छान पदार्थ आहे हा. कल्पक, सोपा, उपयुक्त!! साधारणपणे गृहीत धरले जाते की आपली रेसिपी वाचणारी व्यक्ती ही ३०-३५ वर्षीय गृहिणी आहे (म्हणजे स्वैपाक कौशल्य मध्यम तरी असेलच), शिवाय ती आपण ज्या भौगोलिक भागात राहतो तिथेच असेल. पण तुम्ही लिहिलेली पाककृती अगदी एका १०-१२ वर्षाच्या व्यक्तीला समजेल आणि जमेल अशी आहे (१२ वर्षाची व्यक्ती कदाचित करंजी करेल). ६०-७० वर्षाचे वृद्ध लोक ज्यांना फार उटारेटा जमत नाही त्यांना ही जमेल अशी आहे. (बरेच घटक विकत ही मिळतात). तुमचे मनापासून अभिनंदन!! ही लास्ट एन्द बेस्ट ठरो ...
चवीला खरेच कसे लागतात? मी
चवीला खरेच कसे लागतात? मी काहीतरी वेगळं करायच्या शोधात आहे, तेव्हा हि पाकृ दिसलीय.
पण बुळबुळीत नाही लागत ते आवरण?
फोटो दिसत नाही
फोटो दिसत नाही