पारीकरता -
१) १/४ किलो बासमती तांदुळाची पिठी ( साधारण १ मोठे भांडे (शिगेस) भरुन )
२)पीठाएवढेच पाणी
३) १ मोठा चमचा लोणी / तेल
४) चवीपुरते मीठ
सारणाकरता -
१) सफरचंद - १
२) बटाटे - २ (मध्यम)
३) नारळांचा चव (खोबरे) - पाऊण वाटी
४) गुळ - अर्धी ते पाऊण वाटी (गोडाच्या आवडीप्रमाणे कमीजास्त चालेल)
५) आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड
सारण - सफरचंद व बटाट्याची साले काढून किसून घ्यावेत. सफरचंदाचा कीस, बटाटयाचा कीस, खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर ठेवावे व ढवळत राहावे. सारण कोरडे झाले (अंदाजे ५ ते ७ मिनिटे) की आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड घालून खाली उतरावे.
उकड -
तांदूळ स्वच्छ धुऊन चांगले वाळवून पिठी केलेली असावी.
पातेल्यात पाणी तापत ठेवावे. त्यात १ मोठा चमचा लोणी / तेल व चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात पिठी घालून उलथण्याच्या टोकाने चांगले ढवळावे आणि झाकण ठेवावे. १ ते २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
ही उकड गरम असतानाच गार पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्यावी.
प्रत्यक्ष कृती - उकडीचा छोटा गोळा चांगला मळून घ्यावा. हाताला तेल लावून घेऊन गोळ्याला टोपीचा आकार द्यावा. शक्य तेवढी पातळ वाटी करावी.
त्यात १ चमचा सारण भरावे. आता वाटीला चिमटीने जवळ जवळ निऱ्या घालाव्या.
निऱ्या करताना हाताला पाणी लावून घ्यावे. निऱ्या झाल्यानंतर वाटी डाव्या हाताच्या तळव्यावर घ्यावी व उजव्या हाताने एकत्र आणून बंद करवी. हे सगळे अत्यंत हलक्या हाताने करावे.
हा उकडण्या आधी
आणि हा उकडल्यानंतर
या प्रकारे सगळे मोदक करून घ्यावे व मोदकपात्रात उकडावे. मोदकपात्र नसल्यास एका मोठ्या पातेल्यात पाव भाग पाणी उकळत ठेवावे. ह्या पातेल्यावर बसेल अशी चाळण घ्यावी. चाळणीला तेल लावून घ्यावे. मोदक गार पाण्यात बुडवून काढून चाळणीत ठेवावे. चाळण आधण पाण्याच्या पातेल्यावर ठेवावी आणि वर घट्ट झाकण ठेवावे. १५ मिनिटांनी गॅस बंद करावा.
गरम मोदक वाढून त्यावर तुपाची धार सोडावी.
गरम मोदक तयार आहे.
१) हळदीची पाने उपलब्ध असल्यास चाळ्णीत हळदीची पाने घालून त्यावर मोदक ठेवावे. हळदीचा छान वास येतो.
२) मोदक हे बनवायला किचकट असल्यामुळे सुबक आकार, पातळ पारी या गोष्टी खूप सरावानंतरच जमतील.
मोदकाला मुरड ! अप्रतिम !!
मोदकाला मुरड ! अप्रतिम !!
साक्षी नाविन्यपूर्ण प्रकार.
साक्षी नाविन्यपूर्ण प्रकार. अतीशय सुंदर आणी सुबक मुरड.
मोदकाची पारी आणि तयार मोदक
मोदकाची पारी आणि तयार मोदक सुंदर दिसतायत.
मोदकाला मुरड ! अप्रतिम !! +१
मोदकाला मुरड ! अप्रतिम !! +१
वरिल सर्व प्रतिसाद +१११ मोदक
वरिल सर्व प्रतिसाद +१११
मोदक अतिशय देखणे दिसतायेत
मोदकाला मुरड ! अप्रतिम !! >>
मोदकाला मुरड ! अप्रतिम !! >> सुंदर
सुरेखच आणि बाप्पाचा आवडता
सुरेखच आणि बाप्पाचा आवडता पदार्थ.
मोदकाला मुरड ! अप्रतिम !! >>
मोदकाला मुरड ! अप्रतिम !! >> +१
अतिशय पातळ पारी आणि मुरड
अतिशय पातळ पारी आणि मुरड नाजुक...फारच सुंदर.
व्वा!! काय सुबक आणि सुंदर
व्वा!! काय सुबक आणि सुंदर आहेत हे मोदक मस्त!!!
मस्त प्रकार.
मस्त प्रकार.
किती देखणे मोदक! जबरी!
किती देखणे मोदक! जबरी!
खूप दिवसांनी मुरड घातलेले
खूप दिवसांनी मुरड घातलेले मोदक बघितले. खूप सुगरण आहेस तू!! ग्रेट!!
हे मोदकाला मुरड प्रकरण कधी
हे मोदकाला मुरड प्रकरण कधी बघितले नव्हते. कसा वळतात हा प्रकार?
सुंदर दिसत आहेत मोदक साक्षी.
सुंदर दिसत आहेत मोदक साक्षी.
मोदकाला मुरड कधी बघितलीही
मोदकाला मुरड कधी बघितलीही नव्हती. आम्हाला साधे मोदक करण्याचीही मारामार. फार सुरेख दिसतायंत मोदक. सारणही नाविन्यपूर्ण
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
नीधप : हातानेच घालतात ही मुरड! परत मोदक केले की मुरड घालतानाचा फोटो काढून डकवेन. फक्त ते कधी जमेल माहित नाही.
मोदक करते कधीतरी पण फोटो काढून डकवणे होत नाही. केंव्हा पासून पाककृती डोक्यात होती. पण रात्री घरी आल्यावर काही करायला जमत नव्हते. काल सुट्टी असल्याने स्वयंपाक झाल्यावर सारण केलं. घरच्यांकडून त्याची पावती मिळाल्यावर उकड काढली व मोदक केले.
दिनेशदा, जागू, लाजो ई. दिग्गजांची पावती मिळाल्यावर खूप छान वाटले.
आई असती तर तिला खूप आनंद झाला असता. मोदक खूप सुंदर करायची ती! तिनेच मला शिकवले. मुरड घालायला मात्र मी दुसर्यांचं बघून बघून शिकले.
साक्षी.
साक्षी,अतिशय सुरेख ,सुबक
साक्षी,अतिशय सुरेख ,सुबक झालेत मोदक!!!!
सारण ही टेस्टी दिसतंय.. तोंपासु..
खुप सुबक झालेत मोदक आणि करंजी
खुप सुबक झालेत मोदक आणि करंजी
फार सुबक दिसतायेत ! सहीच.
फार सुबक दिसतायेत ! सहीच.
मोदकाला मुरड ! अप्रतिम
मोदकाला मुरड ! अप्रतिम !!>>+१
बेस्ट!!!
मस्त आहेत मोदक..... प्रकार
मस्त आहेत मोदक..... प्रकार आवडला.. नक्की करण्यात येईल
बापरे. काय सुबक का काय ते?
बापरे. काय सुबक का काय ते? कमालीचे सुरेख मोदक हो..:-)
कमालीचे सुरेख मोदक हो.. >>>>
कमालीचे सुरेख मोदक हो.. >>>> + १
काय मस्त दिसत आहेत मोदक...
काय मस्त दिसत आहेत मोदक... अगदी सुंदर ..
सुरेख दिसताहेत अगदी !
सुरेख दिसताहेत अगदी !
मस्त.. मस्त.. मस्त.... ते
मस्त.. मस्त.. मस्त.... ते वरून तुप आल्यावर डोळे बंद करून घ्यावेसे वाटले... नकोच हा त्रास उघड्या डोळ्यांनी बघायला...
मोदक अतिशय देखणे
मोदक अतिशय देखणे दिसतायेत..........अप्रतिम ...........
सर्वांनी केलेल्या
सर्वांनी केलेल्या मतदानाबद्द्ल सर्वांचे आभार.
साक्षी