'स्पड थाय' - बाप्पासाठी जरा हटके फ्युजन कुकिंग
आवश्यक मुख्य जिन्नस -
बटाटे (सालासकट ) २-३ मध्यम
राईस नुडल्स (फ्लॅट शक्यतो) - १ पॅकेट
सफरचंद - २ मध्यम - एक लाल, एक हिरवे
अन्य ४ जिन्नस -
क्रंची पीनट बटर - ३/४ कप
सोया सॉस - स्वादानुसार
कोकोनट मिल्क - १ कॅन (४००मिलि)
थाय चिली सॉस - चवीनुसार
इतर जिन्नस-
मध / ब्राऊन शुगर
मीठ
तेल (तीळ तेल)
सजावटीसाठी -
आल्याच्या काड्या
कोथिंबीर
टोस्टेड तीळ
स्पड्स (बटाटे)
१. सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवुन घ्या आणि अर्धवट शिजवुन घ्या. थंड होऊ द्या.
२. एक बटाटा चॉपिंग बोर्डवर ठवा आणि धारधार सूरीने त्याच्या खापा करा. खापा करताना सूरी खालपर्यंत पोचु देऊ नका. खाली बटटा अख्खा रहिला पाहिजे.
३. अश्याप्रकारे सर्व बटाटे खापुन घ्या आणि ओव्हन ट्रे मधे ठेवा. त्यावर थोडे तेल शिंपडा.
४. हिरव्या आणि लाल सफरचंदाचे अर्धे भाग करा. एक लाल आणि एक हिरव्या अर्ध्या भागाचे पातळ स्लाईस कापा. हे स्लायसेस बटाट्याच्या खापांधे भरा आणि बाजुनी टूथपिक्स लावा.
५. बटाट्याच्या ट्रेवर अॅल्युअमिनीयम फॉईल लाऊन बेक करायला ठेवा किंवा मावेमधे शिजवुन घ्या.
६. बटाटे शिजतायत तोवर पीनट सॉस** बनवुन घ्या.
-------
पीनट सॉस**:
१. एका बोल मधे पीनट बटर, कोकोनट मिल्क, चिली सॉस एकत्र करुन घ्या.
२. गॅस वर पातेले ठेऊन त्यात वरील मिश्रण ओता आणि गरम करा. मधुन मधुन ढवळत रहा. पीनट बटर वितळले आणि एक उकळी आली की गॅस बंद करा. त्यात आता चवीनुसार सोया सॉस आणि अवश्यक असेल तर मीठ व ब्राऊन शुगर घाला. आणि नीट एकजीव करा.
३. उरलेल्या लाल आणि हिरव्या सफचंदाच्या काड्या कापा. त्यातल्या हिरव्या काड्या सॉस मधे घाला. चव अॅडजेस्ट करा. लाल काड्या बाजुला काढुन ठेवा.
-------
राईस नुडल्स
१. एकीकडे नुडल्स बनवुन घ्या. त्यासाठी पॅकेटवच्या सुचनांनुसार उकळत्या पाण्यात ड्राय राईस नुडल्स घाला आणि काट्याने मोकळ्या करा.
२. नुडल्स शिजल्या की चाळणीत निथळा आणि त्यावर तीळाचे तेल शिंपडा आणि थोडा सोया सॉस घाला आणि नीट मिक्स करुन घ्या.
-------
असेंबली:
१. प्लेटमधे राईस नुडल्स चा बेस बनवा.
२. त्यावर शिजलेला स्पड ठेवा.
टूथपिक्स काढुन टाका.
३. त्यावर गरम पीनट सॉस ओता.
४. वरतुन आल्याच्या काड्या, लाल सफरचंदाच्या काड्या, कोथिंबीर, टोस्टेड तीळ घाला आणि मध व सोया सॉस शिंपडा. गरम गरम गट्टम करा
'स्पड थाय' - फ्युजन कुकिंग : बटाट्यांना इथे स्पड्स म्हणतात. बेक्ड स्पड्स म्हणजे अगदी आवडता पदार्थ. तसेच 'पाड / पड थाय' नावाचा एक राईस न्युडल्स वापरून केलेला पदार्थ असतो. या दोन्हीच्या कॉम्बिनेशन ने 'स्पड थाय' या नावाची कल्पना सुचली
- बटाटे सालासकट आणि अर्धवट उकडुन घेतल्याने नीट कापता येतात.
- बटाटे कापल्यावर आणि त्यात सफरचंदाच्या फोडी खोचल्यावर बाजुने टूथपिक्स लावा म्हणजे बटाट्याच्या खापा नीट रहातिल.
- पीनट सॉस - पीनट बटर आणि कोकोनट मिल्क असल्यामुळे आळतो. अश्यावेळेस त्यात थोडे उकळते पाणी घालुन सारखे करुन घेता येते.
- पीनट बटर न वापरता भाजलेले शेंगदाणे वापरू शकता.
- सॉस मधे स्वीट चिली सॉस किंवा ताज्या लाल मिरच्या वापरु शकता.
- सॉस मधे लसुण, लेमनग्रास वापरता येइल.
- वरतुन कांद्याची पात घालता येइल.
सा. न. मस्तम मस्तम.
सा. न.
मस्तम मस्तम.
शिसान स्विकार लाजो.. तुस्सी
शिसान स्विकार लाजो..
तुस्सी ग्रेट हो..
सही!! काय कल्पनाशक्ती आहे
सही!! काय कल्पनाशक्ती आहे तुझी! ग्रेट! फोटोपण झकास आले आहेत. >> +१. लाजो तुला सा न
लाजो दार उघड.... मी आलेच
लाजो दार उघड.... मी आलेच खायला..... जर मला शिल्लक असेल तर

मस्त केलेस लाजो
कल्पक आहे, फोटो ही छान आहेत.
कल्पक आहे, फोटो ही छान आहेत. थाई चिली सोस मध्ये श्रीम्प आणि लसूण दोन्ही असत. तुम्ही नियमांची बरीच खात्री करून मग ही पाककृती दिली आहे त्यामुळे हे ठीक असावे. पण....
धन्यवाद मंडळी सिमन्तिनी, मी
धन्यवाद मंडळी
सिमन्तिनी, मी स्वतः पूर्ण शाकाहारी आहे त्यामुळे कुठलाही एशियन सॉस विकत घेताना चेक केल्या शिवाय कधीही घेत नाही. मी जो सॉस वापरला आहे तो स्वीट चिली सॉस आहे त्यात श्रिंप पेस्ट आणि लसूण नाही आलं आहे.
खात्री केल्याशिवाय रेसिपी देणार नाही याची खात्री असावी
श्रीम्प शिवाय सोस मी पहिले
श्रीम्प शिवाय सोस मी पहिले आहेत ($३.९९ ला अगदी छोटी बाटली मिळते, २ वेळा पुरते). पण त्यात ही लसूण असतेच. वर कांदा म्हणजे शालोट असतो. शालोट - लसूण शिवाय मी पाहिले नाहीयेत. जर तुम्ही ब्रांड लिहिलात तर परीक्षकांना असल्या शंका उरणार नाहीत. तुमची पाककृती उत्तम आहे, तुमचे बक्षिसाचे चान्स वाढतील.
मस्त कल्पक रेसिपी !
मस्त कल्पक रेसिपी !
लाजो कसली ग्रेट आहेस गं..अफाट
लाजो कसली ग्रेट आहेस गं..अफाट कल्पनाशक्ती
बापरे! काय कल्पना आहे!! महान
बापरे! काय कल्पना आहे!! महान आहेस. कसं काय सुचतं तुला?
हे असलं सुचायला मला सात जन्म घ्यावे लागतील गं बयो! >> +१
ज ब र द स्त. फो टो प ण झ का स
ज ब र द स्त. फो टो प ण झ का स
निव्वळ महान
निव्वळ महान
_/\_ दंडवतच
_/\_ दंडवतच
व्वा , मज्जा आहे बाप्पा
व्वा , मज्जा आहे बाप्पा तुमची

काय छान छान रेसिपी मिळताहेत तुम्हाला
______/\______ दुसरं काही
______/\______
दुसरं काही सांगायला शब्द नाहीत गं बायो ! सुचतं कसं ???
(प्लीज प्लीज मला शेजारीण बनवून घे ना... :फिदी:)
झक्कास रेसिपी!! तो २ आणि ३
झक्कास रेसिपी!!
तो २ आणि ३ नंबरचा फोटो कसला मस्त दिसतो आहे.
लाजबाब लाजो.. दिस्तय तस
लाजबाब लाजो.. दिस्तय तस मस्तच लागत असणार ते. ग्रेट.. कुर्निसात तुला
नाही आवडलं........ हे असे
नाही आवडलं........ हे असे नुसते फोटोतूनच बघायचे आणि मनाचे समाधान करायचे नाही आवडलं.. सर्वात जास्त राग याचा आला की हे मी माझ्या बायकोला दाखवले तरी तिला जमणार नाही..
मस्त रेसिपी ....अफाट
मस्त रेसिपी ....अफाट कल्पनाशक्ती.....................................^.....................
आली आली आली! लाजोची रेसिपी
आली आली आली! लाजोची रेसिपी आली!
आता बाप्पा तृप्त झाले!
मस्तच गं लाजो! आवडली रेसिपी हे सांगायला नकोच!
काय सही प्रकार केलाय! दंडवत
काय सही प्रकार केलाय! दंडवत गं बाई!
लाजो .............. जबरदस्त
लाजो ..............
जबरदस्त फ्यूजन आणि अप्रतीम पदार्थ!
अहाहा.. मस्त दिसतय..
अहाहा.. मस्त दिसतय..
काय अफाट डोक...... मस्त
काय अफाट डोक...... मस्त
रीया +१००
रीया +१००
फारच छान! मस्त कल्पना आणि
फारच छान! मस्त कल्पना आणि सुरेख प्रेझेंटेशन!
एक नंबर....
एक नंबर....
लाजो नेहमी प्रमाणेच हटके
लाजो नेहमी प्रमाणेच हटके प्रकार आहे. मस्तच.
जबरी...वेगळच एकदम्...एवढा
जबरी...वेगळच एकदम्...एवढा स्वच्छ-सुंदर बटाटा ईथे मिळणं कठीणच.
बाकी पाक्रु, कल्पना, सजावट सगळच टॉप क्लास!!!!!!
मस्तच.. अफाट कल्पनाशक्ती तर
मस्तच.. अफाट कल्पनाशक्ती तर आहेच.. पण कौशल्यही आहे.
Pages