आई ताप आलाय....

Submitted by सत्यजित on 28 January, 2008 - 06:40

मला जे दिसत
ते तुम्हाला पण दिसत का?
कळोखात न दिसणार भुत
तुम्हाला पण बघुन हसत का?

मी नाही घाबरत त्याला
तेच घाबरत मला
येवढी जर हिम्मत असेल
तर उजेडात ये म्हणाव त्याला

तुम्हाला माहित्ये का?

वर वर ढगात एक
लांब दाढीवाला असतो
गडगडाड आवाज करत
खुप मोठ्यांदा हसतो

"मी नाही घाबरत तुला"
मी त्याच्यावर ओरडतो
मला घाबरुन तो त्याची
चड्डीच ओली करतो...

ए.. पावसात काय भिजताय
तो वरतून सू सू करतोय
ताप आलायनं मला म्हणुन
मी तुम्हाला सावध करतोय

श्शी.. आत्ता जाईल ताप
मग उद्या पुन्हा शाळा
तापाला म्हंटल रहा जरा
तर म्हणतो आलाय कंटाळा

उन्हाळ्याच्या सुट्टीत येतोस
तेंव्हा कसा रे राहतोस?
शाळा असलीकी मात्र
लगेच निघुन जातोस

बघतोच तुला ह्या सट्टी मध्ये
यायलाच देणार नाही
गार पाणी, गोळा, आईसक्रीम
काहीच खाणार नाही...

श्शी.. कित्ती आवाज करतायत मुल
जरा आराम देत नाहीत
शाळेतल्या टिचर ह्यांना
खुप आभ्यास का देत नाहीत?

तस मला बरं वाटतय
पण आई नको म्हणेल
आता खेळायला जातो म्हंटल तर
उद्या शाळेत जा म्हणेल

जाऊंदे ना... तसे पण सगाळे
सुस्सू मध्येच खेळ्तायत
शी.....
सुसू मध्येच उड्या मारतायत
सुसू मध्येच लोळतायत.....

शी अले ए..
ऐकत नाही??
तिकडे पान्यात सापए..
आणि टिव्ही वर स्पाईडरमॅन पण लागला आहे.. मस्त..

-सत्यजित
http://satyajit-m.blogspot.com/

गुलमोहर: 

मस्तच!! Happy

बालपण आठवले. छानच.

अगदी अस्सेच विचार यायचे रे माझ्या मनात, लहानपणी

भिजु नये म्हणून कित्ती कारणं सांगायची ती! Happy
छाने.

किती छाने शगलं...आवल्लं मला पन्.....मी पन छोटी झाली ना एकदम..

किती सुंदर! ही खरी खरी कविता. काहीच्या काही तर नाहीच नाही.

तुम्हा सर्वाच्या प्रतिसादा बद्दल मनपुर्वक आभार...
-सत्यजित.

सांग सांग भोलानाथ
बालपण परत येईल का ?...

सत्यजित, तुमच्या मुळे आमचं बालपण पुन्हा भेटल्या सारखं वाटतं... असेच गोंडुल्या शोनुड्या कविता लिहित रहा..
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ
बिजली की तलवार नही बूँदों के बाण चलाओ

मस्त रे सत्यजित. सगळ्यांचीच फँटसी लिहिलीस!