भाज्या : फ्लॉवर, गाजर, मटार, फरसबी, उकडलेले बटाटे
पास्ता : आवडीप्रमाणे कोणताही पास्ता नेहमीप्रमाणे शिजवून
व्हाईट सॉस : बटर, कणिक (किंवा मैदा), दूध, मीठ, मीरपूड
इतर : क्रीम चीज, फ्रेश क्रीम, ग्रेटेड चीज, हिंग, मीठ, मीरपूड, बटर
खाताना वरून घालण्याकरता : (आवडीनुसार) टोमॅटो केचप, चिली सॉस, हर्ब्ज (ओरेगानो, बेसिल, चाईव्ह किंवा जे आवडतात ते), चिली फ्लेक्स, मस्टार्ड सॉस इ.
खास उपकरणी : आवन (इलेक्ट्रिक किंवा मायक्रोवेव), आवनप्रुफ काचेचे पसरट भांडे (मी बोरोसीलचं वापरलं आहे. फोटो बघा.)
सर्व भाज्या स्वच्छ धुऊन कापून घ्या. गाजराचे क्युब्ज करा. फरसबीचे धागे काढून टाकून त्याचे पेराएवढे तुकडे करा. फ्लॉवरचे साधारण मध्यम आकाराचे तुरे ठेवा. बटाटे सोलून त्याचे मध्यम चौकोनी तुकडे करा.
गॅसवर एका कढईत चमचाभर अमुल बटर टाकून त्यात थोडा हिंग टाकून मग चिरलेल्या भाज्या (बटाटे वगळून) घालाव्यात. थोड्या परतून वरून मीठ घालून झाकण ठेवावे आणि एक वाफ आणावी. भाज्या अर्धकच्च्या रहायला हव्या कारण त्या पुढे बेक करायच्या आहेत.
भाज्या शिजेपर्यंत एकीकडे गॅसवर दुसर्या एका भांड्यात चमचाभर बटर घालून त्यात आपल्याला हवी तितकी कणिक(साधारण चार-पाच टेबलस्पून. पण भाज्यांच्या प्रमाणात कमी-जास्त करून) २-३ मिनिटे बारीक आचेवर चांगली परतून घ्यावी. भांडे खाली उतरवून त्यात थंड दूध घालावे. घोटाळत रहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दाटसर पेस्ट झाली पाहीजे. यात चवीपुरते मीठ आणि मीरपुड घालून ठेवावे.
भाज्या अर्धकच्च्या शिजल्यावर कढई गॅसवरून खाली काढावी आणि त्यात हा व्हाईट सॉस घालून चांगले एकत्र करावे. यातच आता उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि शिजवलेला पास्ता घालावा. फ्रेश क्रीम, चीज क्रीम घालावे.
आवन आधीच गरम करून घ्यावा. मध्यम टेंपरेचर ठेवावे. (प्लीज कोणी मला टेंपरेचरबद्दल अधिक शंका विचारू नका.) आता आवनमध्ये बेक करण्याकरता जे भांडे वापरणार असाल त्यात हे मिश्रण घालावे. वरून किसलेले चीज भुरभुरावे. आणि गरम आवनमध्ये बेक करायला ठेवावे.
वरचं चीज विरघळून जरा जरा लाल होत आलं की झालं समजा आणि काढून गरमगरम सर्व्ह करा. शिजेपर्यंत धीर धरवतो पण निवेपर्यंत धरवत नाही हे खरं असलं तरी थोडा धीर धरा. कारण गरम चीज ही काय चीज असते ते तुम्ही गरम चीज खाईपर्यंत कळणार नाही.
बघता बघता फस्त झालं की...
१. याच पदार्थात सॉसेजेस, चिकनचे उकडलेले तुकडे, मीटबॉल्स इ पदार्थ घालून सामिष जेवणाचा आनंद घेता येईल.
२. पास्ता घातला नाही तरी चालेल.
३. व्हाईट सॉस कमी किंवा जास्त झाला तर चालतो.
४. आवडत असल्यास अननसाचे तुकडेही घालू शकता.
भारीच रेस्पी आणि
भारीच रेस्पी आणि फोटु!
कुणाकुणाकडे खाल्ला आहे पण त्यातलं बटर/चीजच प्रमाण बघता घरी करायची हिंमत झाली नाहीये! पण आता एकदा करतेच!
माझी ऑल टाइम फेवरिट डिश.
माझी ऑल टाइम फेवरिट डिश. करायला हवी लवकरच. फोटो झकास मामी!
मस्त...
मस्त...
फोटोज मस्त आहेत, मामी! रेसिपी
फोटोज मस्त आहेत, मामी! रेसिपी करून बघितली तरी घरी, मी सोडून, कोण खाईल हा प्रश्नच आहे! उगा त्या फालतू भाज्या खाण्यात आयुष्य वाया घालवू नये या मताची मंडळी घरात!
श्रीलंकेत पहिल्यांदा खाल्लं
श्रीलंकेत पहिल्यांदा खाल्लं होतं हे. सगळ्या सामिष पदार्थांमधून हुडकून हुडकून आमच्या पदरात हे पडल्यामुळे लईच आवडलं होतं. (मला एकटीलाच आवडलं)
घरी कधी करीन माहीत नाही.
रायगड, त्या मंडळींना माझ्या
रायगड, त्या मंडळींना माझ्या घरी महिनाभर आणून ठेव. ब्येश भाज्या खायला घालते की नाही बघ!
वा !!! मस्त आहे पाककृती,
वा !!! मस्त आहे पाककृती, फोटोही छान आलेत. मी फक्त ब्रेड ,बटाटा, ब्रोकोली घालुन करते. कधीतरी अशा भाज्या घालुनही करुन पाहीन.
मामी आज केलं होतं हे घरी...
मामी आज केलं होतं हे घरी... अप्रतिम झालं होतं
खूप खूप धन्स या रेसिपीबद्दल
कालच केलं होतं. यात फरसबी
कालच केलं होतं. यात फरसबी नव्हती पण ब्रोकली घातली होती. पास्ताही नव्हता घातला :
टेंपरेचर जरा जास्त ठेवायला हवं होतं. मी आधी २० मिनिटं १५० वर ठेवलं होतं आणि मग २०० केलं. त्यामुळे जरा सुकं झालं.
आवनमध्ये ठेवण्याआधी
बेक झाल्यावर
अरे वा! छान आहे की कम्फर्ट
अरे वा! छान आहे की कम्फर्ट फूड
Pages