नर्सरी र्‍हाइम्स - मराठी

Submitted by एम.कर्णिक on 28 April, 2009 - 03:38

काही परिचयाच्या नर्सरी र्‍हाइम्स् चे हे स्वैर मराठीकरण मुलांना आणि तुम्हालाही आवडेल असे वाटते

१ (Jack and Jill)
श्याम आणि सुधा टेकडीवर गेली
पाण्यासाठी बादली नवीकोरी नेली
श्याम पडला घसरून पाय मुरगळुन
सुधा त्याच्यापाठोपाठ गडगडत आली

२ (Little Miss Muffet)
छोटयाश्या बनूताई
सतरंजी अंथरतात नि
चमचावाटी हातात घेऊन
दही खात बसतात

होते काय गंमत,
येते छतावरनं सूत
सुताच्या टोकावर असते
एक कोळयाचे भूत

कोळीदादाना येताना
बनूताई बघतात, मग
उडते त्यांची घाबरगुंडी
वाटी टाकून पळतात

३ (Yankee Doodle)
बंकी धाण्डे चालले गावी तट्टाणीवर बसून
सापडलेले मोराचे एक पीस टोपीत खोचून
चाबुक म्हणून हातामध्ये घेतली होती दोरी
पण तोंड होते शेपटीकडे हंसली पोरे सारी

४ (Simple Simon)
साधाभोळा वामन चालला होता धारावीस
ताज्या पावाच्या वासाने झाला कासावीस

बेकरीमध्ये जाउन म्हटला, "दाखवा नमुना"
मुन्ना बेकरीवाला बोलला, "पैसा दिखाना"

वामन म्हटला, "पैसा कैसा नमुन्यासाठी?"
मुन्नाभाईने उगारली मग ही ऽऽ मोठ्ठी काठी

गुलमोहर: 

दुसरी आणि चौथी आवडली. मस्त.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

खूप मस्त आहेत. लहान मुलांना खरेच आवडेल. बनूताई अजून मोठी करा ना!

Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

छान आहेत्,खरच मुलाना आपल्या वाटतील.

हाहाहा किती छान अनुवाद आहे .. मी माझ्या लेकिमुळे सध्या रोज ह्या nursary rymes ऐकत आहे..पण मराठी मधेय ऐकतांना खुप गोड वाट्ते ..

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" मराठीकरण भावले! "

Happy प्रिंट काढुन ठेवते लेकी साठी

------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind