हा तर सोनियाचा मनु.

Submitted by सत्यजित on 7 January, 2008 - 09:15

प्रेरणा : आजी सोनियाचा दिनु

हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

सहाय्य मड्डमकरी
चाले तिच्या हुकमावरी
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे.. हाची सोनियाचा..

मॅडमचे मन मोही
पाठीघाले देशद्रोही
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे

घडता भ्रष्ट उठाठेवी
कानावर हात ठेवी
नाही राहीला रे.. नर नाही राहीला रे.. हाची सोनियाचा

असला षंड सरदारु
आत्मघाती बुच मारु
नाही पाहीला रे... नाही पाहीला रे.. हाची सोनियाचा

कृपा करी भरणाभरु
पाप रक्कमा ठेवी करु
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे .. हाची सोनियाचा

हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

- सत्यजित.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक दुर्देवी सत्य...भल्या चांगल्या माणसांच असा श्वान होतो....विडंबनाव्यतीरिक्त अशच प्रकारचं काही स्वतःच्या स्टाईल मध्ये पाठवा नं...तुम्हाला छान जमेल

आवडले. पण एका हुशार व्यक्तीचे असे व्हावे, याची खंत पण वाटली. निवृत्त झाल्यावर कदाचित आत्मचरित्रातून सत्य बाहेर येईल, पण तोपर्यंत वेळ टळून गेलेली असेल.

छान