२ वाटी किसलेले ओले खोबरे,
पाव वाटी जाडा रवा,
अर्धा वाटी साखर(मी पावच घेते, गोड खूप आवडत नाही),
एकच मोठा चमचा शुद्ध तूप(टेबलस्पून घ्या),
३ टेबलस्पून कणीक(इथे खरे तर मैदा घेतात पण मी केलेला हेल्दी बदल),
१ टीस्पून बेकींग पॉवडर,
२ अंडी,
वेलची वाटून
चवीप्रमाणे मीठ
१) पावूण कप पाणी उकळवायचे , उकळले की त्यात साखर विरघळवायची.
२) साखर पुर्ण वितळली दिसले रे दिसले की मग त्यात खोबरे टाकायचे.
३) मग कच्चा रवा टाकायचा. मीठ टाकायचे.
४) मग तूप टाकून (गॅस एकदम मंद पाहिजे वरील सर्व करताना) मस्त ढवळत ते जरासे आळेल असे वाटले की गॅस बंद करायचा. खूप आळवू नका. मिश्रण तोवरच आळवा की सर्व जवळ आल्यासारखे दिसले पाहिजे.
५) आता हे मिश्रण आंबवा.( मी रात्रभर नाही आंबवत पण ६-८ तास ठेवते. म्हणून सकाळी १०-११ वाजता करून ठेवायचे अवन जरा गरम करून मग बंद करून झाकून ठेवून द्यायचे आणि रात्री १० वाजता बेक करायचे.)
६) ६-८ मिश्रण आंबले की दोन अंडी फोडायची, त्यातील फक्त पिवळे व पांढरे वेगळे करायचे, मग पिवळे वेगळे घेवून , वॅनीला ईसेन्स ३ लहान चमचेटाकूनच फेटून चमच्याने मस्त मिक्स करायचे.
७)आता त्यात कणीक व बेकिंग पॉवडर तीनदा चाळून मिक्स करायची. हे अलगद करायचे.
८) आता उरलेले पांढरे मस्त फेटून घ्या हँड ब्लेंडरने की अगदी हलके दिसले पाहिजे. सुरी नीट उभी राहिली पाहिजे. हे आता फक्त वरील मिश्रणात फोल्ड करा.खूप असे काहि वेळ लागत नाही करताना. गॅस पाशी उभे राहून मिश्रण टाकायचे मग आंबवायचे.
९)अंडे टाकल्यावर पीठ जरा ओलसर व सैल वाटेल, हात लावून करायचे नसेल तर कणीक एका पोळपाटावर पसरवून पीठ चमच्या ने घेवून ते चमच्याने थापायचे व बेकींगच्या आधी साखरेत घोळवा नाहीतर साखर भुरभुरायची. बेक केल्यावर मस्त चमकतात.
१०)२८५ फॅ वर २५ मिनीटे बेक करा. मध्येच बाजू बदला.
पदार्थाची माहिती: हा एक गोव्याचा खास असा कुकीज पदार्थ आहे. दिवाळीला अंड्याशिवाय करते आई. काही फरक असा नाही पडत फक्त चव वेगळी लागते. दोन्ही चवी मस्त असतात. तुलना करु शकत नाही.
बेक करताना साखर व नारळाचे आंबून एक मस्त वास येतो , खोबर्याचा असा वास खूप घमघमाट करतो.
तोंडात एकदम विरघळणारी कूकीज (नानकटाई) होते.
पुर्वी लहानपणी एक कोकोनट क्रंची बिस्किटे मिळत लहानपणी तशी चव पण हि ज्यास्त हलकी,खुसखुशीत होतात. आठवते गाणं, एक नारीयल पेडसे तूटा..... वगैरे.
हि दिवाळी अंकात देणार होते पण वेळच नाही झाला.
हे असे मिश्रण आळवायचे,
मग गोळा बनवून आंबवायचे,
अंडी फेटून, पीठ मिक्स करून साखरेत घोळून बेक करण्यापुर्वी,
फायनल प्रॉडक्ट
बिना अंड्याचे करुन पाहीन.
बिना अंड्याचे करुन पाहीन. फोटु प्लीज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बापरे, एकदम वेगळाच आहे
बापरे, एकदम वेगळाच आहे प्रकार. फोटो टाक ना शक्य असेल तर.
खरेच वेगळा प्रकार आहे. करुन
खरेच वेगळा प्रकार आहे. करुन पाहायला हवा
तु रेसिपी खुप घाईघाईत लिहिलीस असे वाटतेय. जरा परत एकदा वाचुन पाहा का, कुठे काय राहिले की काय ते.
६.७.८ मध्ये आधी अंड्यातले पिवळे फेटुन त्यात कणिक्+बेपा मिक्स करायची , मग ते आंबलेल्या पदार्थात मिक्स करायचे, मग पांढरे अंडे फेटून ते मिश्रणात टाकायचे असे आहे का? बनलेल्या पदार्थाची कंसिस्टन्सी कशी असते? तु चमच्याने थापा म्हटलेस म्हणजे डायरेक्ट बेकिंग शीटवर चमच्याने टाकायचे का? चमच्याने थापावे लागत असेल तर मग साखरेत कसे घोळवणार???
(खुपच प्रश्न आहेत
पण नविन पाकृ करताना मला नेहमी गोंधळायला होते. लेखिकेच्या मनात असलेला पदार्थ आणि माझ्यासमोर भांड्यात बनत असलेला पदार्थ हा एकच असेल याची गॅरँटी नेहमीच देता येईल असे नाही. )
हो घाईत लिहिलिय. लिहिते जरा
हो घाईत लिहिलिय. लिहिते जरा आरामाने.
साधना, आंबलेल्या मिश्रणात
साधना,
आंबलेल्या मिश्रणात अंडी फेटून घालायची मग कणीक मिश्र बेपॉ. हे घातले की पांढरे.
मिश्रण जरासे वड्याच्या पीठासारखे सैल असते म्हणून म्हटले की चमच्याने थापा. त्यात अंडे नुकतेच घातलेले असते. अश्यात हाताने करायचे नसेल तर चमचा घ्या.
मिश्रण ६-८ तासावर नको आंबवूस. तेवढे तास ठिक आहे.
कप किंवा वाटी नेहमी सारखी
कप किंवा वाटी नेहमी सारखी ठेवा सर्व जिन्नस मोजताना जे घ्याल ते. हाच एक बेकींगचा रुल आहे. >> हो हे मी खुप प्रयोग फसल्यावर शिकले. कृती उतरवून घेतल्यावर वाटीचे प्रमाण वेगवेगळ्या वाटीने घ्यायचे. नुसत बेकींग काय पण सगळेच पदार्थ माझे विचीत्रच लागायचे. मैत्रीणींवर, आईवर वगैरेच आरोप करायचे तुमचेच काहीतरी चुकले असणार सांगण्यात. शेवटी एका मैत्रीणीने तिच्यासमोर मला पदार्थ करायला लावल्यावर मग मला कळलं की का चुकतय माझ सगळ. असो, तुझी नानकटाई मस्त दिसतेय. पण मला नानकटाई अज्जीबात आवडत नाही सो बहुतेक हे करणार नाही..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मनु धन्स गं. मी करणार. मला
मनु धन्स गं. मी करणार. मला ते 'एक नारीयल.... ' अजुनही आठवते.. कोकोनट क्रंचीज माझ्या आवडत्या होत्या. आताही मिळतात पण चव तशी लागत नाही.
मनुबाई, मस्त रेसिपी! करून
मनुबाई,
मस्त रेसिपी! करून बघणारच! Wish you a very Happy Diwali.
कल्पू, तुलासुद्धा दिपावली
कल्पू, तुलासुद्धा दिपावली शुभेच्छा!
मनःस्विनी, अंड्याऐवजी काही
मनःस्विनी, अंड्याऐवजी काही टाकावे लागेल कां? मला अंड्याशिवाय करून बघायचीये ही नानकटाई उद्या...
एकदम वेगळी पाकृ वाटत आहे.....
एकदम वेगळी पाकृ वाटत आहे..... ट्राय करुन बघायला हवी..... मलादेखील अंडयाशिवाय करायची आहे.... कशी करता येइल