Submitted by दिनेश. on 23 August, 2012 - 11:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
मीच तो.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा एकदम यम्मी......
दिनेशदा एकदम यम्मी...... हल्ली मी देखील गार्लिक ब्रेड घरी करुन बघते.... मी काय करते थोडया लसुण पाकळ्या खलबत्यात कुटुन घेते मग त्यात तुप घालते किंवा बटर , आणि मग एक एक ब्रेड तव्यावर टाकते व त्याला हे मिश्रण लावते, हलके भाजते, जास्त नाही किंवा कधी कधी आधी थोडा ब्रेड गरम करुन घेते व मग हे मिश्रण त्याला लावते...... चहा बरोबर खायला असे तोंपासु लागतात ना
मला देसी प्रकार आवडला
मला देसी प्रकार आवडला
सगळेच प्रकार मस्त आहेत...
सगळेच प्रकार मस्त आहेत...
रात्री वाचता वाचता तोंडी लावायला मस्त होईल! वर मोठा मगभर कॉफी!
...
खरचं हा धागा ऑफिसात उघडूही नये. लाळ गळतेय ना आता!!
दिनेश, ४) मग पाचावे तूकडे >>>
दिनेश,
४) मग पाचावे तूकडे >>> हे पावाचे करा प्लीज, मी २ से. विचारात पडले हे पाचावे काय म्हणुन
वॉव! सहीच आहे!! आणि सगळे घरात
वॉव! सहीच आहे!! आणि सगळे घरात असणारेच आयटम्स आहेत की.
पहीला प्रकार कढई ऐवजी पसरट फ्राय पॅन मधे केला तर?
आभार स्निग्धा, (क्रोमचे
आभार स्निग्धा, (क्रोमचे प्रताप आहेत हे.)
हे प्रकार लाईट स्नॅक्स म्हणून खरेच मस्त वाटतात. कधी संपले ते कळतही नाही.
आहा..पहीला प्रकार वाचूनच
आहा..पहीला प्रकार वाचूनच तोंडात टाकावासा वाटतोय!!!
इथे गार्लिक ब्रेड असा प्रकार
इथे गार्लिक ब्रेड असा प्रकार तयार मिळतो, पण त्यात फक्त गार्लिक टेस्टच बटर आणि चिझ घातलेल असत,
ते सुद्दा नावाला, हा प्रकार चवीला ओके असतो.
पण दिनेशदांनी सांगितलेले सर्व प्रकार खरच यम्मी होतील.
मस्तच
मस्तच
सगळेच प्रकार यम्मी आहेत. आज
सगळेच प्रकार यम्मी आहेत. आज डिनरला सुपबरोबर (ऑऑमधे) सोपा प्रकार करुन बघितला. एकदम हिट आणि सक्सेसफुल झाला.
दिनेशदा, हेल्दी प्रकारामधे चक्क ऑइलमधे डीप करायचा आहे ब्रेडचा तुकडा.
मस्त आहेत प्रकार..नक्की करून
मस्त आहेत प्रकार..नक्की करून पाहणार
मने, तुकडा फक्त डीप केलास की तेलाची अंघोळ घातलीस
मस्त दिनेशदा, उद्या पाहूणे
मस्त दिनेशदा, उद्या पाहूणे येणार आहेत त्यांना सुप आणि गार्लिक ब्रेड देइन तुमच्या पध्दतीचा
मनिमाऊ, अगदी थोडाचा डिप
मनिमाऊ, अगदी थोडाचा डिप करायचा. (म्हणजे चपातीला मोरंबा लावून खातो तसे !)
या सर्व प्रकारांसाठी गार्लिक प्रेस हे उपकरण वापरले तर छान. आता भारतात मिळत असणार हे. लिंबाचा रस
काढायचे साधन असते तसेच दिसते. यात लसूणपाकळ्या टाकून प्रेस करायचे. लसणाचे तूकडे खाली आणि साले वर राहतात.
दिनेशदा, ब्रेडस्टीक्स विथ
दिनेशदा, ब्रेडस्टीक्स विथ स्पीनाच-चीज डीप हा माझा फेवरिट पदार्थ आहे. यात जशी ब्रेडस्टीक पुरेपुर डीप करुन खाते तशीच कल्पना केली मी. आता कळलं. रेसिपी तर टेम्पटिंग आहे.
वेक्स, नाही गं. काल वरची सोपी पद्धत आहे त्यानेच बनवले होते. शंका दुर झाल्यावर आता आज्-उद्या दुसर्या पद्धतीने करेन.
माझ्या कृतीचा झब्बू देते. ती
माझ्या कृतीचा झब्बू देते. ती माझ्यासारख्या बिगारीतल्यांसाठी एकदम सोप्पी पद्धत आहे आणि तेल कमी लागतं.
आपला नेहमीचा ब्रेड आणावा. शिळा असेल तर बरे.
ऑऑ कढल्यात घ्यायचं थोडं तापवायचं त्यात ओरेगानो, बेसिल वगैरे घालणे. वाळका भुगा किंवा ताजी पाने बारीक चिरून. लसणाच्या पाकळ्या बारीक क्रश करून गरम तेलात सोडणे. गॅस बंद करून ठेवणे.
इकडे सपाट तवा गॅसवर चढवणे. तो तापेतो ब्रेडचे तुकडे करणे. एका चौकिनी स्लाइसातून मध्यात कापून २ आयताकृती तुकडे.
मावतील तेवढे ब्रेडचे तुकडे तव्यावर पसरणे. गॅस लहान ठेवणे. वरून मगाच्या फोडणीचे तेल मालमसाल्यासकट थेंब थेंब एकेका तुकड्यावर लावून चमच्याने पसरणे. तो तेलाचा ब्रश असेल तर अजूनच बेस्ट. सगळ्या तुकड्यांना तेल लावून झाले की पलटणे आणि उलट्या बाजूने तेल लावणे. साधारण खरपूस झाले. विशेषतः लसणीचे कण काळवंडले की तव्यावरून ब्रेडची उचलबांगडी प्लेटमधे आणि तिथून पोटात
दिनेशदा, पहिला प्रकार
दिनेशदा, पहिला प्रकार आवडला.
नी, मी बिगारीतलीच. तू सांगितलेलं करून बघण्यात येईल.
वा! मस्त प्रकार!
वा! मस्त प्रकार!
तोंपासु झाले..... नी तुझी
तोंपासु झाले..... नी तुझी पद्धतही मस्त आहे आयत्या वेळी वापरायला एकदम बेस्ट. आज जाताना घरी ब्रेड घेऊन जाते नी रात्री करते गाब्रे
आमचा प्रयत्न. प्रकार १
आमचा प्रयत्न. प्रकार १ सोपा.
१. चिरलेला लसूण. कोथिंबीर, पिझ्झासोबत आलेली मिरची. लसूण थोडा कमी होता. गावराणी लसणाला फ्लेवर जास्त स्ट्राँग असतो.
२. ब्रेडचे तुकडे. ७-८ स्लाईस आहेत.
३. तेलात गरम केलेला लसूण. तेलात लसणाचा अर्क उतरे पर्यंत गरम करवा.
४. डायरेक्ट ऑलमोस्ट फायनल प्रॉडक्ट. (कढईतून पोटात. पूर्ण तयार झाले त्याचा फटू काढायला जमला नाही. आठवण आली तोवर संपला होता.)
थोडी फ्रेश मिरेपुड अन मीठ भुरभुरले आहे.
५. १० मिन्टात गट्टम होतो. याचा खमंग वास अपलोड करण्याची सोय हवी म्हणजे तुम्हा लोकांना जळवता येईल.
अरे वा, इब्लिस. माझा पहिला
अरे वा, इब्लिस. माझा पहिला प्रकार असाच असतो. फक्त इथे कोथिंबीर मिळत नाही !
दिनेशदा, तुमचाही असाच असतो
दिनेशदा,
तुमचाही असाच असतो म्हटल्याबद्दल धन्यवाद. माझा आपला साधा प्रयत्न होता. तुमची कलाकुसर कुठून येणार त्यात?
दिनेशदा... मी आजच माझ्या
दिनेशदा...
मी आजच माझ्या पध्धतीने केला....
खुपच सोप्पा आणि पटकन होणारा
लोणी थोडं सैल करुन. त्यात थोडे मीठ, ओरीगॅनो, लसुण ( १५ पाकळ्या मिक्सर वर एकदा फिरवुन) सगळं घालुन एकत्र करायचं . मग पावाच्या स्लाइस ला दोन्ही कडुन चोपडायचं . मग तव्यावर मंद आचे वर खरपुस भाजायचं. हे तुम्ही लोण्या ऐवजी ऑलीव्ह ऑइल वापरुन पण करु शकता. मस्त स्वाद येतो. लसुण खरपुस भाजली की मस्त स्वाद येतो.
आपल्याला लसूण तळल्याचा /
आपल्याला लसूण तळल्याचा / भाजल्याचा स्वाद आवडतो, आणि तसाही आपला लसूण जरा जास्त तीव्र वासाचा असतो. पण काही फ्रेंच प्रकारात लोण्यात लसणाची पाकळी गुलाबी करुन काढून टाकतात तर काहि सलादमधे, केवळ डिशला लसणाच्या पाकळीने पॉलिश केल्यासारखे करतात.
अंगोलाचा लसूण, दोन्हीचा मध्यममार्ग साधणारा आहे. ( पोर्तूगीजमधे लसणाला आल्हो म्हणतात, पण आल्याला लसूण म्हणत नाहीत )