Submitted by पुरंदरे शशांक on 4 July, 2012 - 07:12
शाळेत गेलं माऊचं पिल्लू....
माऊचं पिल्लू गोडुलं
शाळेत एकटंच गेलेलं
बॅग, टिफिन काही नाही
मजेत खेळत बसलेलं
टीचर म्हणाली - "हे रे काय ?
अस्से शाळेत चालत नाय
आईला जाऊन सांग नीट
सारं कसं हवं शिस्तीत.."
"आई आई ऐकलंस काय
बॅग, टिफिन, बूट न टाय
हेच नाही तर बरंच काय"
"माहित आहे सगळं मला
उद्या देईन सगळं तुला.."
जामानिमा सगळा करुन
ऐटीत निघाले पिल्लू घरुन
सुट्टीत टिफिन उघडला जेव्हा
वर्गात गोंधळ माजला तेव्हा
उंदीरमामा निघाले त्यातून
पळाले सगळे ईई किंचाळून
शाळेला आता कायमची बुट्टी
पिल्लाची घरातच दंगामस्ती
माऊच्या डोळ्यावर छान सुस्ती
डब्याची संपली कटकट नस्ती....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खूप छान............ डोळ्या
खूप छान............ डोळ्या समोर आल 'माऊचं गोडुल पिल्लू' आणि सुस्ती आलेली मनी माउ देखिल समोरच झोपाळलेली दिसली.......
khupch chan aahe ... mi roj
khupch chan aahe ... mi roj vacun khush hote....
ekdam Ved kokaru kavitechi athavan hote....
मस्तच
मस्तच
Pages