तेल, जिरे, लांब पातळ चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरून टोमेटो, तिखट, धणे पावडर, हळद, मीठ, काजूपेस्ट, चिकन ब्रेस्टचे लांब तुकडे, कसुरी मेथी, गरम मसाला, वेलची पूड, क्रीम, २ अंड्यांचा पांढरा भाग, कोथिंबीर
कढईत ४ चमचे तेल तापवा. त्यात १ चमचा जिरे घाला, ते तडतडल्यावर कांदा घाला, तो ब्राऊन होईतो परता. मग आलं लसूण पेस्ट, २ मोठे चमचे बारीक चिरून टोमेटो घाला. परता. टोमेटो शिजले की तिखट, धणे पावडर, हळद, मीठ घाला. परता. काजूपेस्ट घाला. परता. चिकन ब्रेस्टचे लांब तुकडे घाला. शिजत आलं की कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला, वेलची पूड घाला. क्रीम घाला.
२ अंड्यांचा पांढरा भाग फेस येईपर्यंत फेटा. pan मध्ये तेल घालून त्यावर घाला. दोन्ही बाजूने शिजवून घ्या. चिकनच्या मिश्रणावर टाका (शेफने अख्खं टाकलं होतं. आम्ही सर्व्ह करतेवेळी बनवून तुकडे करून टाकलं. म्हणून वरच्या फोटोत नाहिये). वरून कोथिंबीर घाला.
मस्त आहे... या वीकएडं ला
मस्त आहे... या वीकएडं ला नक्की करुन बघेन.
वॉव!! स्वप्ना , तोंपासु ही
वॉव!! स्वप्ना , तोंपासु ही रेसिपी ही !!
छान वाटत्येय पाकृ अंडे फक्त
छान वाटत्येय पाकृ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंडे फक्त सजावटीकरताच आहे तर...
छान रेसिपी,करुन
छान रेसिपी,करुन पाहणारच.
फोटोत चिकन दिसत नाहीय.
तोष्दा, दिसतय की रे चिकन...
तोष्दा, दिसतय की रे चिकन... नीट बघ बरं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)