Submitted by पुरंदरे शशांक on 4 July, 2012 - 07:12
शाळेत गेलं माऊचं पिल्लू....
माऊचं पिल्लू गोडुलं
शाळेत एकटंच गेलेलं
बॅग, टिफिन काही नाही
मजेत खेळत बसलेलं
टीचर म्हणाली - "हे रे काय ?
अस्से शाळेत चालत नाय
आईला जाऊन सांग नीट
सारं कसं हवं शिस्तीत.."
"आई आई ऐकलंस काय
बॅग, टिफिन, बूट न टाय
हेच नाही तर बरंच काय"
"माहित आहे सगळं मला
उद्या देईन सगळं तुला.."
जामानिमा सगळा करुन
ऐटीत निघाले पिल्लू घरुन
सुट्टीत टिफिन उघडला जेव्हा
वर्गात गोंधळ माजला तेव्हा
उंदीरमामा निघाले त्यातून
पळाले सगळे ईई किंचाळून
शाळेला आता कायमची बुट्टी
पिल्लाची घरातच दंगामस्ती
माऊच्या डोळ्यावर छान सुस्ती
डब्याची संपली कटकट नस्ती....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
वा वा किती गोडुली कविता मीच
वा वा किती गोडुली कविता मीच दोन तीनदा वाचली........
आता आज लेकाला देते प्रिंटआऊट वाचायला......
सो क्यूटी...
सो क्यूटी...
कित्ती गोड ....वाचून दाखवते
कित्ती गोड :हाहा:....वाचून दाखवते आज.
छान
छान
मस्त जमली !
मस्त जमली !
चांगली बालकविता आहे राव
चांगली बालकविता आहे राव ही
(असा एक संग्रह काढता का?)
कस्ली गोड बालकविता...
कस्ली गोड बालकविता...
कसली धम्माल कविता आहे. एकदम
कसली धम्माल कविता आहे. एकदम गोडुली. मी सगळं चित्रं डोळ्यासमोर आणलं, त्यामुळे जास्तच आवडली कविता.
छान, लांब काने ससेभाऊपण
छान, लांब काने ससेभाऊपण चांगली होती.
मस्त कविता, एकदम गोडुली. खरच
मस्त कविता, एकदम गोडुली. खरच काढा बालकवितांच पुस्तक, मोठी मोठी सुंदर चित्र असलेलं. या कवितेची चित्रं तर अगदी नजरे समोर तरळुन गेली...कविता वाचताना
मस्त! मस्त!! मजाच आहे
मस्त! मस्त!!
मजाच आहे पिल्लाची! घरातच दंगामस्ती! कित्ती छान!
आवडलीच
वा खरच खुप मजेदार कविता आहे.
वा खरच खुप मजेदार कविता आहे. उंदराचा डबा मस्तच.
तुम्ही आता एक पुस्तक काढा.
डब्यातून टुण्ण्कन उडी मारून
डब्यातून टुण्ण्कन उडी मारून बाहेर आलेले उंदीरमामा दिसले आणि इतर सगळ्या बालप्राण्यांचे विस्फारलेले डोळे नि त्यांची धावपळही
मस्तच्चे कविता...!
कित्ती गोड!! मस्तंय!
कित्ती गोड!! मस्तंय!
(असा एक संग्रह काढता
(असा एक संग्रह काढता का?)>>+१. आणि भाऊकाकांकडुन व्यंगचित्रे काढुन घ्या मस्त.
सह्हीच, आवडली..!!
सह्हीच, आवडली..!!
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून आभार......
असाच लोभ असू देत......
खुपच गोड बालकविता
खुपच गोड बालकविता
खुपच गोड कविता विनार्च,
खुपच गोड कविता
विनार्च, बागेश्री ++ १
अतिशय निरागस खूप मस्त
अतिशय निरागस
खूप मस्त
कित्ती गोड! शशांक खरंच
कित्ती गोड! शशांक खरंच पुस्तकाचं मनावर घेच!
सुट्टीत टिफिन उघडला
सुट्टीत टिफिन उघडला जेव्हा
वर्गात गोंधळ माजला तेव्हा
उंदीरमामा निघाले त्यातून
पळाले सगळे ईई किंचाळून >>> धमालच आहे..
http://www.divshare.com/downl
http://www.divshare.com/download/18615018-23d
मला अशी प्रतिक्रिया द्याविशी वाटली.
देव काका - चाल खूपच छान -
देव काका - चाल खूपच छान - आवडली अगदी....
या कवितेला भरभरुन दाद देणा-या सर्व जाणकार रसिकांचे मनापासून आभार......
असाच लोभ असू देत......
खुप मस्त कविता! देवकाका,
खुप मस्त कविता!
देवकाका, चालही आवडली. धाकटीने त्यावर नाच करुन घेतला!
वा छान आहे माऊचं पिल्लू , फार
वा छान आहे माऊचं पिल्लू , फार गोड
वॉव! एकदम धम्माल कविता आहे ही
वॉव! एकदम धम्माल कविता आहे ही !!
खरेच आता एक पुस्तक काढाच तुम्ही ...........
मस्त रे!!
मस्त रे!!
धम्माल आहे....
धम्माल आहे....
Pages