१. ओट्स ( एक वाटी )
२. गव्हाचे पीठ ( अर्धी वाटी )
३. बेसन ( पाव वाटी )
४. पीठी साखर ( पाव ते अर्धी वाटी - आवडीनुसार )
५. मेथीचे दाणे ( पाच चमचे - आवडीनुसार कमी जास्त घ्यावेत )
६. तीळ
७. बदाम
८. वेलची पुड
९. तुप
१. प्रथम एका पॅन मध्ये दोन चमचे तुप घालावे व त्यावर ओट्स मंद आचेवर ४-५ मिनिटे भाजुन घ्यावे.
२. नंतर एक चमचा तुप घालुन गव्हाचे पीठ मंद आचेवर खरपुस भाजुन घ्यावे.
३. अर्धा चमचा तुपात बेसन खरपुस भाजुन घ्यावे.
४. आता अर्धा चमचा तुप घालुन त्यात मेथीचे दाणे, बदाम, तीळ पाठोपाठ भाजुन घ्यावे व या तिघांची एकत्र पुड करुन घ्यावी.
५. परातीत भाजलेले ओट्स, गव्हाचे पीठ, बेसन, मेथी-बदाम-तीळ पुड, वेलची पावडर व पीठी साखर एकत्र करुन घ्यावी.
६. यावर गरम तुपाचे थोडे मोहन घालुन पटापट लाडु वळुन घ्यावेत. तुप जास्त नको असेल तर थोडे दुध शिंपडुन देखील लाडु वळता येतात.
लाडु अजुन पौष्टीक करायचे असतील तर यामध्ये तुपात भाजलेले पाव वाटी सोयाबिनचे पीठ, मुगडाळीचे पीठ, दाण्याचे कुट, अक्रोडचा चुरा व साखरेऐवजी किसुन घेतलेला चिकीचा गुळ वापरता येइल
या पाककृतीचे आठवणीने काढलेले
या पाककृतीचे आठवणीने काढलेले फोटो
वा!! सुरेख दिसतात.
वा!! सुरेख दिसतात.
वा मस्त.
वा मस्त.
वॉव! मस्तच!
वॉव! मस्तच!
ओट्स..हेल्दी रेसिपी...पण ह्या
ओट्स..हेल्दी रेसिपी...पण ह्या लाडु मधे ओटस पेक्षा बेसन आनि गव्हाच्या पिठाची जास्त चव येत असेन ना ????
म स्त.....क रुन पहानार ..
म स्त.....क रुन पहानार .. आणि .खाणार पन...
चांगला प्रकार. (मेथीचे दाणे
चांगला प्रकार. (मेथीचे दाणे किती घेतले ते लिहायचे राहिलेय.)
धन्यवाद सर्वांना अनुसया,
धन्यवाद सर्वांना
अनुसया, फक्त ओट्स वापरुन लाडु केले तर ते नीट बांधले जात नाहीत म्हणुन गव्हाचे पीठ घेतले. ओट्सचे प्रमाण थोडे वाढवता येते. बेसन नाही घेतले तरी चालते. पण त्याने अजुन खमंग चव येते.
दिनेशदा मेथीचे दाणे मी प्रत्येकाच्या आवडीनुसार घ्यायला सांगितले आहेत कारण प्रत्येकालाच त्याची कडुसर चव आवडेलच असे नाही. मी ५ चमचे मेथीचे दाणे घेतले. याचे प्रमाण थोडे वाढवले तर लाडवात त्याची कडु चव जाणवते.
मस्त दिसताहेत.
मस्त दिसताहेत.
छान पौष्टीक लाडू..पिठाच्या
छान पौष्टीक लाडू..पिठाच्या दुपटीचे ओट्स भाजुन मिक्सरमधे एकदा फिरवुन घेतले तर जास्त पौष्टीक होतील असे वाटते.
धन्स सावली आणि सुलेखा सुलेखा
धन्स सावली आणि सुलेखा
सुलेखा मी आधी मिक्सरवर फिरवायचाच विचार केला होता पण ओट्स तुपात भाजल्यावर मस्त मउ होतात, नुसत्या हाताने जरी कुस्करले तरी त्याची पावडर बनते त्यामुळे पीठात मिसळताना ते आपोआप एकजीव होतात.
घरात एक मोठ्ठा डबा भरुन
घरात एक मोठ्ठा डबा भरुन मुसेली होते ते कुणीच खात नव्हते. ते एक वाटी वापरुन लाडु करुन पाहीले. मस्तच झालेत. पीठ सोडुन इतर काहीच तुपात भाजले नाही. मध्यम आकाराचे करुनही खुपच कमी लाडु झालेत . मुसेलीमुळे मधेमधे कुरकुरीत लागतात
छान वाटताहेत. ओट्स चे प्रकार
छान वाटताहेत.
ओट्स चे प्रकार असतात त्यातला कोणता घ्यावा व्हीनस?
सावली मी बाउल वापरुन प्रमाण
सावली मी बाउल वापरुन प्रमाण मोजले म्हणुन असेल कदाचित माझे तेवढया सामग्रीमध्ये २२ लाडु बनले.
सुनिधी मी क्वेकरचे इन्स्टंट ओटमील वापरले.
लाडू छान दिसतात, खावासा
लाडू छान दिसतात, खावासा वाटतोय.
आज करून पाहिलेत. काही
आज करून पाहिलेत.
), त्यामुळे शेवटी साखरेचा पाक करून लाडू वळवले. पण त्यामुळे पॉइंट १ चा कडूपणा कमी निघून गेला. पण लाडू तसे कोरडेच म्हणावे लागतील.
काही चुका:
१. मेथी थोडी जास्त घेतली. त्यामुळे थोडे कडू वाटले.
२. तूप खूपच कमी वापरले (माझ्याच्याने तूप हातातून सुटतच नाही काय करू?
३. अंड्याच्या आकाराचे १३ लाडू झाले. मला जास्त अपेक्षित होते. पण बरंय.. घरात लाडूप्रेमी मी एकटीच असल्याने चालून जाईल.
तर ही मी बनवलेल्या लाडवांची प्रचि :

वरच्या ४ लाडवांमध्ये दूध वापरले तूपाऐवजी, म्हणून ते ओलसर दिसत आहेत.
धारा प्रयत्न छान केलास....
धारा प्रयत्न छान केलास.... दूध थोडे जास्त वापरलेस वाटते
व्हीनस, तूप किती लागत ? मी
व्हीनस, तूप किती लागत ? मी मध्ये एकदा मुलांसाठी पोळीचे लाडू करतात त्यात ओट्स घातले, ते खूप कोरडे झाले, तूप घालून वैतागले, शेवटी दुध घालून वळले ( धारा सारखे
) . दुध घातले तर लाडू टिकतील का हि शंका वाटली म्हणून परत ओट्स घातले नाहीत.
मस्त दिसताहेत लाडू.
मस्त दिसताहेत लाडू.
मीमराठी मी देखील दुध वापरुनच
मीमराठी मी देखील दुध वापरुनच लाडु वळते फक्त दिवाळीच्यावेळी करायचे लाडु तुप घालुन वळते कारण ते जास्त दिवस ठेवायचे असतात. मुलांना खाउ म्हणुन करायचे रोजचे लाडु दुध वापरुन वळले तरी चालतात. ते किती दिवस टिकतील याची नीटशी कल्पना नाही कारण मी एका वेळी जास्त लाडु करत नाही. जास्तीत जास्त २५ लाडु करते व ते माझ्या कुटुंबाला आठवडयाभर पुरतात. वरील लाडवात मी ओट्स, पीठ, मेथ्या भाजण्यापुरते तुप वापरले आहे व लाडु वळताना दुधाचा हबका दिला आहे. पण कोणाला पुर्ण तुपातील लाडु आवडत असतील तर पाव ते अर्धा वाटी तुपाचे मोहन लागेल.
धारा प्रयत्न छान केलास....
धारा प्रयत्न छान केलास.... दूध थोडे जास्त वापरलेस वाटते >>>>> हो. जाणून्बुजून जास्त वापरले कारण ते मी लगेच खायला म्हणून ठेवलेत. तूपाचे लाडू मला जास्त आवडत नाहीत.
एक महत्वाचे सांगायचे राहिले. मला लाडूचा हा प्रकार खूप आवडला. ओटस मला एव्हढे आवडत नाहीत, त्यामुळे ते खायचा उत्तम पर्याय. खरंच एकदम पौष्टिक प्रकार! अनेक धन्यवाद.
धन्स धारा..... अग मला देखील
धन्स धारा..... अग मला देखील ओट्स नुसते दुधात शिजवुन खायला आवडत नाहीत पण पोटात तर गेले पाहीजेत ना म्हणुन हा प्रकार करुन बघितला
मी काल केले ....पण मी ओट्स
मी काल केले ....पण मी ओट्स तुपा त भाजुन मिक्सरला लावले ...(ओट्स ,गव्हाचे पीठ, बेसन, पीठी साखर,, तुप ) मस्त झाले आहेत ....
वा! पौष्टीक लाडू....
वा! पौष्टीक लाडू....
धाराने टाकलेला फोटो दिसतोय.
धाराने टाकलेला फोटो दिसतोय. लाडू छान दिसतायत.
श्रुती छान
श्रुती छान
माझे लाडु संपले..... हे फोटो
माझे लाडु संपले..... हे फोटो बघुन पुन्हा करावेसे वाटत आहेत