Submitted by Kiran.. on 29 July, 2012 - 15:08
आमचे प्रेरणास्थान - वैवकु
( गुरुजी क्षमा असावी )
अर्ध्या जळालेल्या गझलेस माझ्या रंग का नाही
सरण ओले चिता जाळावयला ओंडका नाही
तुझी रद्दी खपत नाही नि करतो शायरी खोटी
कुत्रे जरि चावले तुला , गळ्याला हुंदका नाही
नशेची बाटली फुटली, तिथे घसरायच्या रांगा
तुझ्या या देवळास विट्ठला रे रांग का नाही
कुणाची पायरी कुठली, कसे ठरवायचे सांगा
कुणी विकली कुणी लुटली, लज्जेची नोंद का नाही
गझल ना झिंगते हल्ली, अता प्रत्येक पेगाला
नशील्या किरणदा इथल्या, गल्लीतच व्होडका नाही
- Kiran..
गुलमोहर:
शेअर करा
किरणजी टिंबटिंबजी !!! तुमची
किरणजी टिंबटिंबजी !!!
तुमची ही गझल मला आवडली... असे मी जवळपास म्हणण्याच्या बेतात होतो, पण तितक्यात मला जाणवले आपण असे म्हणणे गझलेच्या परंपरेस धरून होणार नाही. कारण गझल म्हणजे शेवटी कवीला जाणवलेल्या सच्च्या भावनांच्या प्रकटीकरणासाठी ब्लाब्लाब्लाब्ला दोन ओळीत सगळ्या विश्वाचे आर्त सामावणे म्हणजे काही खायचे काम नाही त्यासाठी खूप तीक्ष्ण असा सौंदर्यबोध ब्लाब्लाब्ला गझल हा आकृतिबंधच मुळात असा आहे की, एका गझलेतील विविध शेर हे विविध विषयांवर भाष्य करतात. शिवाय प्रत्येकाची चव, मूड, आशय, अभिव्यक्ती, रुची वेगवेगळी असतात. त्यामुळे कवीला जे काही अव्यक्त पातळीवर जाणवते त्या विचाराचा आपल्या अगाध ज्ञानाने, तरल संवेदनशीलनेने, अणकुचिदार काव्यसौंदर्यबोधाने, दुर्मिळ कल्पनाशक्तीने व अचाट तार्किक बुद्धीने शिवाय अगाध अशा ब्लाब्लाब्लाब्लाने दोन ओळीत बसवायचा प्रयत्न करतो व हे करत असतांना त्याला अनेक तडजोडी कराव्या लागत असतात. अशाच तडजोडी तुम्ही या गझलेत केल्या आहेत हे स्पष्टच दिसते आहे कारण तुम्ही अजून कच्चे लिंबू आहात आणि माझे शेर दिल्याशिवाय तुमच्या या सुमार रचनेला चार चांद लागणार नाहीत म्हणून मायबोलीच्या सर्वरवर पडणारा अतिरिक्त ताण गृहीत धरूनही माझा हा मेगाबयटी प्रतिसाद जाड ठशात दिल्याशिवाय मला राहवणार नाहीच, तेव्हा तुमची ही गझल मी अशी वाचून पाहिली-
पुरत्या जळालेल्या गझलेस माझ्या रंग का नाही
सरण ओले चिता जाळावयला ओंडका नाही
खपत नाही तुझी रद्दी नि करतो शायरी खोटी
श्वान जरी चावले तुला , गळ्याला हुंदका नाही
नशेची रांग बघतांना जरी वाटेत ब्लाब्लाब्ला
तुझ्या या देवळास विट्ठला रे रांग का नाही
कसे ठरवायचे सांगा कुणाची पायरी कुठली,
कुणी लुटली कुणी विकली,,ब्लब्लाब्ला नोंद का नाही
अता प्रत्येक पेगाला गझल ना झिंगते हल्ली,
नशील्या सतीशदा इथल्या, गल्लीतच व्होडका नाही
------------------------------------------------------------------
बोल्ड टाईप राहिलाच
बोल्ड टाईप राहिलाच
ब्लाब्लाब्ला>>>>>>>>>>>>>
ब्लाब्लाब्ला>>>>>>>>>>>>>
विठ्ठला हसून हसून मारायची पाळी आली रे........वाचवरे sss वाचव .(मला नाहीरे देव्पूर्कराना !!!;) )
किरणजी टिंटिंबटिंबजी(दोन वेळा टिंब ?आधी तीम वेळा होतं ना ?)
धन्यवाद
आपका ये नजराणा हम एकदम कुबूल फर्माते है !!
ज्ञानेश
ज्ञानेश
ज्ञानेशजी राहिलं राव
ज्ञानेशजी राहिलं राव चुकून.............. हसण्याच्या नादा॑त विसरलो ....सॉरी!!
______________/\__________________ !!!