Submitted by सतीश देवपूरकर on 27 July, 2012 - 07:04
गझल
जिंदगी माझी जळाली, मात्र झाला धूर नाही!
या उरामधले कुणाला समजले काहूर नाही!!
माझिया राखेमधे मी आजही आहेच जिंदा,
शोध तू येथेच मजला, मी कुणी कापूर नाही!
का मला माझीच गीते वाटती परक्याप्रमाणे?
कोण माझे गीत गाते? त्यात माझा सूर नाही!
का मला पाहून सारे लोक परतू लागले हे?
ओसराया लागलेला मी नदीचा पूर नाही!
छाटण्यासाठी स्वत:ची मान हातांनी स्वत:च्या,
माझिया इतका कुणीही जाहला आतूर नाही!
जन्म घेताना गझल या आतड्यांना पीळ पडले!
काळजामधली तरीही संपली हुरहूर नाही!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
गुलमोहर:
शेअर करा
अतिशय जब्बरस्त -- अफलातून-
अतिशय जब्बरस्त -- अफलातून- गझल आहे सर खुप म्हणजे खुपच आवडली.
जन्म घेताना गझल या आतड्यांना पीळ पडले!
काळजामधली तरीही संपली हुरहूर नाही!! ..... अतिशय छान. कळजाचे शब्द काळजाला भिडणारे. व्वा
हा जिवघेणा आनंद दिल्याबद्दल खुप-खुप धन्यवाद.
...................................आपला स्नेही,
ऑर्फिअस..!
अफाट !!! भयानक सुंदर !!!
अफाट !!!
भयानक सुंदर !!!
एकदम जबरदस्त!!! "माझिया
एकदम जबरदस्त!!!
"माझिया राखेमधे मी आजही आहेच जिंदा,
शोध तू येथेच मजला, मी कुणी कापूर नाही! " हा शेर एकदम भन्नाट आहे.
निवडक दहात नोंद केली आहे...:)
<<माझिया राखेमधे मी आजही आहेच
<<माझिया राखेमधे मी आजही आहेच जिंदा,
शोध तू येथेच मजला, मी कुणी कापूर नाही!<<
या शेराबद्दल सलाम तुम्हाला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सामान्य
सामान्य
खयाल आणी त्यातील प्रामाणिकपणा
खयाल आणी त्यातील प्रामाणिकपणा आवडला.
जिंदगी माझी जळाली, मात्र झाला धूर नाही!
या उरामधले कुणाला समजले काहूर नाही!!
का मला पाहून सारे लोक परतू लागले हे?
ओसराया लागलेला मी नदीचा पूर नाही!
छाटण्यासाठी स्वत:ची मान हातांनी स्वत:च्या,
माझिया इतका कुणीही जाहला आतूर नाही!
जन्म घेताना गझल या आतड्यांना पीळ पडले!
काळजामधली तरीही संपली हुरहूर नाही!!
आवडले.
सर्व सामान्य व असामान्य
सर्व सामान्य व असामान्य प्रतिसादकांचे मनापासून आभार!
..........प्रा.सतीश देवपूरकर
सहिच.....
सहिच.....
मला आवड्ली बुवा ...कशीकाय
मला आवड्ली बुवा ...कशीकाय आवड्ली...नाही माहित पण आवड्ली !!