Submitted by इस्रो on 22 July, 2012 - 05:52
अत्यावश्यक सेवा म्हणून 'बंद' मधून वगळतात
सगळ्यात आधी माझ्यावर दगडफेक करतात
मी काय असं घोडं मारलंय कुणाचं ?
कोणत्या अपराधासाठी मला जिवंत जाळतात ?
सरकारचा सारा राग लोक माझ्यावर काढतात
'बंद' यशस्वी की अयशस्वी चर्चा करत बसतात
वाट्टेल त्या जाहिराती माझ्या अंगाला चिटकवतात
पोरं-पोरी त्यांची नावं खुशाल माझ्या अंगावर कोरतात
तुम्हाला काय वाटतं ? दु:खं फक्त तुम्हालाच असतात ?
काय करावं मी ? लोक जेव्हा पान खाऊन माझ्यावर थुंकतात
मी बरी, माझं काम बरं ! अध्यात ना कुणाच्या मध्यात
माझ्यासारख्या निष्पापाचा माणसं बळी का घेतात ?
-नाहिद नालबंद
गुलमोहर:
शेअर करा
राजकीय पक्ष बसेस फोडतात. नंतर
राजकीय पक्ष बसेस फोडतात. नंतर त्यांच्या दुरुस्तीची काँट्रॅक्ट्स त्यांच्याच कंपन्याना मिळतात... असे साधे गणित आहे.
जे न देखे रवी..
जे न देखे रवी..