गिट्स खट्टा ढोकळा १ पाकीट
दही, पाणी, तेल (पाकीटावर सांगीतल्याप्रमाणे) + पाव वाटी पाणी
मुठभर मक्याचे दाणे
चमचाभर आलं-हिरवी मिरची वाटण (ऐच्छीक)
चमचाभर साखर
फोडणीला तेल, मोहरी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग
पाव वाटी पाणी, त्यात चमचाभर साखर विरघळवून
चिरलेली कोथिंबीर
किसलेलं गाजर. चमचाभर.
*पाकीटाच्या कॄतीप्रमाणे पीठ भिजवून घ्यावं. वर आणखी पाव वाटी पाणी घालावं.
*पीठात वाटण, साखर आणि मक्याचे दाणे घालावे.
*तेलाचा हात लावलेल्या ढोकळे पात्रात पीठ घालून वाफवावं. (पहीले ७-८ मिनिटं प्रखर आचेवर आणि नंतरचे १० मिनिटं मंद आचेवर)
*वाफवलेल्या भांड्यातून लागलीच ढोकळे बाहेर काढावे. (पात्रातून नव्हे.)
* ढोकळे-पात्रात ढोकळे थंड झाल्यावर कापून ताटलीत काढावे.
* वरून फोडणी आणि साखरपाणी एकत्र करून ओतावं.
* कोथिंबीर, गाजरकीस घालून सजवावं.
मस्त ढोकळे होतात.
हिरवी चटणी लावून एकावर एक रचले तर सँडविच ढोकळा.
चटणी ऐवजी खिम्याचा थर दिला तर चांगले लागतात.
मक्याचे
मक्याचे दाणे कोरडे की फ्रोझन ?
ह्म्म्म,
ह्म्म्म, बापरे. कधी बघितला/ऐकलेला नाही हा प्रकार. पण करुन बघावासा वाटतोय.खरंतर मी गिटसचं खट्टा ढोकळा असं पॅकेट पाहिल्याचंही आठवत नाहीये मला.
(No subject)
फ्रोझन
फ्रोझन दाणे. साखरेशिवाय आंबटढाण होतो. पाकीटावरच्या कृतीपेक्षा पाणी थोडं जास्त घालते.
मस्त
मस्त दिसतायत. तुझी प्लेट/बोलही छान आहे
छानच
छानच दिसतोय ढोकळा ...:-) नेहमीच्या बेसन ढोकळ्याप्रमाणे स्पाँजी होतो का हा खट्टा ढोकळा?
गिटस्चे
गिटस्चे सगळे ढोकला प्रकार आमचा मित्र मायक्रोवेव चान्गले करतो. मायक्रोवेवेबल पसरट भान्ड्यात मिश्रण ओतायचे आणि ३ मिनटे ठेवायचे.
अरे वा.
अरे वा. मायक्रोवेव मधे कधी करून बघीतला नाही. करून बघेन.
हे गिटस
हे गिटस आरोग्यासाठी चांगलं असतं का?
म्रु!
म्रु! मलाही आवडतो गिट्सचा खट्टा ढोकळा , छान स्पाँजी होतो...
साखर,आल्-मिर्चि पेश्ट मीहि घालते.
गिट्स्चा
गिट्स्चा खमण ढोकळा पण खूप मस्त होतो.
प्रीति, मला तरी त्यातले घटक भयानक वाटले नाहीत. तसंही फार क्वचित खाल्ल्या जातात.
प्रीति,
प्रीति, मला तरी त्यातले घटक भयानक वाटले नाहीत.>> ठिक आहे. मी पण क्वचित खमण ढोकळा करते, घाई असेल तर. एकदा हा पण करुन पाहिन. छान आहे रेसिपी.
एक प्रां.
एक प्रां. प्र. - गिट्स चं रेडी मिक्स वापरुन केलेली कृती लिहिण्यापेक्षा त्यासारखा करण्याचा प्रयत्न करुन केलेली कृती जास्त चांगली वाटणार नाही का ? म्हणजे त्यात मक्याचे दाणे घालणे हे नवीन असेल पण इतर काहीच नावीन्य नाहीये ना ?
मृ, हे फक्त तुझ्यासाठी नाही, पण बरेच दिवस विचारायचं होतं, ते तू मुहुर्त लावलास.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिलिंदा,
मिलिंदा, तुझी शंका रास्त आहे. जुन्या मायबोलीत मी 'स्वतःच्या रेसिपी पोस्ट कराव्यात' असं वाचल्याचं आठवतंय. ह्या नवीन मायबोलीत आपण नेटवर वगैरे मिळालेल्या रेसिपीजही पोस्ट करतोय.जे पूर्वी चालायचं नाही खरंतर.
का लिहीली
का लिहीली ते सांगते. माझे गिट्स्च्या कृतीप्रमाणे केलेले ढोकळे गच्च गोळा आणि आंबट व्हायचे. त्यात मी साखर घातली. पाणी घातलं. मक्याचे दाणे टाकले. वरून आखरेचं पाणी ओतलं. (कित्ती हुश्शार!! :P) मग चांगले जमायला लागले. म्हणून जेव्हा अश्विनी आणि पूनमने विचारलं ढोकळ्याबद्दल तेव्हा कृती दिली.
इतके कडक नियम आहेत हे माहीती नव्हतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरं बरं,
बरं बरं, म्हणजे गिट्स वाल्यांनी जे जे करा लिहिलं आहे ते सोडून सगळं केलंस म्हण की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मृ, मी वर
मृ, मी वर म्हटलेलं तुलाच नाही तर आपल्यापैकी बर्याच जणींना लागू होतं. एखादी रेसिपी आपण कुठून शोधली तरी खूपदा आपल्या आवडीप्रमाणे जिन्नस वर-खाली, घालायचे,न घालायचे हे बदल करतोच की.म्हणजे ५०-५० असते आपली रेसिपी.
जुन्या मायबोलीत तरी मी वर म्हटलेलं वाचलेलं आठवतंय मला पण इथे तसा काही नियम दिसला नाही. सो, तू टाकत रहा.
'स्वतःच्या
'स्वतःच्या रेसिपी पोस्ट कराव्यात' असा काही नियम नव्हता/नाही. तसे असेल तर फारच मर्यादा येतील.
(शक्यतो)स्वतः करुन पाहिलेल्या असाव्यात म्हणजे टिप्स लिहिता येतात. पुस्तकातून किंवा एखाद्या साईटवरुन घेतली असेल तर नाव/लिन्क द्यावी. म्हणजे स्त्रोत लिहावा एवढी अपेक्षा आहे.
गिटसचा खट्टा ढोकळा करताना अमूक न करता तमूक करा असे एक दोन वाक्यात लिहिता आले असते. बाकीची कृती फारशी वेगळी नाही. 'फूड प्रॉडक्ट्स' बद्दल माहिती, टिप्स असा धागा उघडला तर हे लिहिता येईल.
बरं झालं
बरं झालं तुम्ही स्पष्ट केलंत ते. माहितीचा स्त्रोत तर सगळेजणंच देतात.
फूड प्रॉडक्ट्स बद्दल माहिती किंवा माझे स्वैपाकाचे प्रयोग मध्येही आपण मूळ रेसिपीत केलेल्या सुधारणांची माहिती देता येईल.
>>> गिटसचा
>>> गिटसचा खट्टा ढोकळा करताना अमूक न करता तमूक करा असे एक दोन वाक्यात लिहिता आले असते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मेलं वेळात वेळ काढून पाककृती लिहावी तर म. स. शालजोडीतले हाणते.
बरं, नवा धागा उघडला की टिपा तिकडे सरकवून इकडे ढोकळे उडवते.
म. स.
म. स. शालजोडीतले हाणते. >>>>> म.स. चे सदस्य कोण कोण आहेत माहित्ये ना???
धर जाऊन त्यांना... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म. स.
म. स. शालजोडीतले हाणते<<<![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे, मदत समिती मधे 'त्या' गावचे लोक आहेत की काय ?
मिक्रोवेव
मिक्रोवेव मध्ये धोकला कसा करतात्???कुनि नीत सान्गू शकाल का?