१ कप साखर
३ अंडी
१ (१४ oz) कन्डेन्सड मिल्कचा कॅन - sweetened
१ (१२ oz) इव्हॅपोरेटेड मिल्कचा कॅन
१ टीस्पून वॅनिला इसेन्स
१. ओवन ३५० डी. फॅ. ला गरम करुन घेणे.
२. एका नॉनस्टीक भांड्यात मध्यम आचेवर साखर वितळवायला ठेवणे. पाणी अजिबात लागू द्यायचे नाही. लाकडी चमच्याने ढवळत रहायचे. छान सोनेरी रंगाचे कॅरेमल तयार झाल्यावर लगेचच ९" आकाराच्या काचेच्या गोल बेकींग डीश मधे ओतायचे. डीशच्या तळाला सगळीकडे व्यवस्थीत कॅरेमल पसरले पाहीजे.
३. एका मोठ्या बाउलमधे अंडी फेटणे.
४. त्यात कन्डेन्सड मिल्क, इव्हॅपोरेटेड मिल्क आणि वॅनिला इसेन्स टाकणे. सगळे मिश्रण परत एकदा फेटुन नीट एकजीव करणे.
५. आता हे मिश्रण कॅरेमल कोट केलेल्या बेकींग डीश मधे हळूवारपणे ओतणे.
६. अॅल्युमिनिअम फॉइलने कव्हर करून ओवन मधे ६० मिनिटे बेक करणे.
७. बेक झालेला फ्लान पूर्णपणे थंड करुन घ्यावा. मग सुरीने कडेकडे सोडवून घेऊन सर्व्हींग डीश मधे उपडा करुन सर्व्ह करावा.
थोडिशी खरवसासारखी चव येते याला.
आभार
आभार पन्ना. गोड पदार्थ आहे हे माहित नव्हतं. नावावरुन स्नॅक्स असतील असं वाटलं मला.
करुन बघायला हवा. करायला तरी काही कटकट वाटत नाहीये.
आंतरजालाव
आंतरजालावरून फोटो टाकतेय. परवा घाईघाईत फोटो काढायचा राहीला. सगळ्या मैत्रिणी तूटून पडल्या त्या फ्लानवर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पन्ना,
पन्ना, रेसिपी छान वाटतेय. पण कंडेन्स्ड मिल्क तर प्रचंड गोड असतं. तरी वरून साखर घालावी लागतेच का?
कॅरेमल मधे
कॅरेमल मधे साखर जाळतो नं ती खरपुस चव मस्त लागते गं.
मस्त डिश
मस्त डिश आहे ही... आताच ऑफिस मधे झालेल्या पॉटलक मधे बनवून आणलेले एका कलिग ने.
त्याची टिप - ३-५ अंडी वापरावीत. More eggs will yield a thicker, richer custard.
पन्ना - तुम्ही फ्रिज मधे ठेवला होता का सेट करायला?
मस्तच
मस्तच दिसतय गं हे पन्ना! सहीच!
छानच आहे
छानच आहे गं. मी मुर्खासारखी स्पिनॅच फ्लान वाचते आहे कालपासून. जिनसांमधे पहिलेच १ कप साखर वाचून वाटले पालकात एक कप साखर इयुssssssss![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
छान, करुन
छान, करुन बघीन लवकरच.
मी हे
मी हे खाल्लय, पेरुच्या मैत्रीणीने केलेले. मस्त लागते. हे खातांना खरवसची आठवण येते म्हणुन जास्त आवडले होते. पॉटलकसाठी बेष्टच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![MexicanFlan.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u115/MexicanFlan.jpg)
या वीकएन्डला करुन बघीतले. छानच झाले होते. फक्त मध्ये त्या भेगा का पडल्या कळले नाही. अर्थात त्याने चवीत काहीच फरक पडला नाही.
http://vadanikavalgheta.blogs
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/06/caramel-flan.html
मी बिना अंड्याचे करते. बिनादुधाचे म्हणजे सोयामिल्क्चे पण मस्त होते.
इथे मुंबईत
इथे मुंबईत कन्डेन्सड मिल्क भरपुर ब्रँड आहेत पण इव्हॅपोरेटेड मिल्क मिळते का ते माहित नाही.. त्याऐवजी घरचे आटीव दुध घेतले तर साधारण किती घ्यावे लागेल?
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
सुप्रभात,
सुप्रभात, मी फ्रिज मधे ठेवला नव्हता. पण थंड सुध्दा चांगला लागेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंड्यांच्या टिप्स बद्दल थँक्स
अॅशबेबी, आटीव दूध पण ह्याच प्रमाणात घेऊन बघ. बहूतेक करुन इव्हॅपोरेटेड मिल्क सुपरमार्केट मधे मिळायला हरकत नाही.
स्पिनॅच फ्लान
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पन्ना....
पन्ना....
आईला आज तिच्या मैत्रिणींच्या भिशीत किंवा तत्सम पार्टीत एक पदार्थ करून न्यायचा होता.. मी हेच कर म्हणून सांगितलं.. आम्ही ट्राय केलं हे..
झालं होतं छान.. पण बर्यापैकी जास्त गोड झालं होतं.. मे बी मिल्क मेड जरा जास्त घातलं गेलं..
कॅरामल ची चव एकदम जबरी लागत होती !!!
शेवटी ते त्या भिशी पर्यंत पोचलच नाही.. कारण चव बघता बघता आम्ही घरीच संपवलं..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे वा!!!
अरे वा!!! सहीच!!
इव्हॅपोरेटेड मिल्क मिळालं का तिकडे?
पॉला ताईंच्या सल्ल्यानुसार
पॉला ताईंच्या सल्ल्यानुसार ह्या रेसिपीत इव्हॅपोरेटेड मिल्क ऐवजी नारळाचं दुध आणि थोडं खरवडलेलं खोबरं घातलं.. मस्त चव येते त्यानी पण.. कोकोनट फ्लेवर आवडत असेल तर हा प्रकार पण नक्की आवडेल !
पन्ना, पाकृ सार्वजनिक कर. खालच्या सर्चमध्ये येत नाही नाहितर.