गैरसैर शब्द

Submitted by ट्यागो on 19 July, 2012 - 01:53

शब्द
शब्द सापडतो एखादा
किंवा भेटतो
वा ऐकतो
नाहीतर आवडतो
रुचतो
रुततो
ठुसठुसतो
स्फुरतो
फसफसतो
नावडतोही
कसाही
कसलाही
कुठलाही

व्युत्पत्ती
उपपत्ती
च्युत्यापा सोडून मोडून
सांडून झाडून
खळखळतो फेसाळत सर्वांगात
मागोवा घेत राहतो मग
स्पाय मुव्हीजच्या प्रेरणेप्रमाणे
आठवतात न्युट्रॉन, इलेक्ट्रॉन
आकाशगंगेसारखे फिरत राहणारे
सदैव
एकाच चक्रात
एकात एक
तसा तो शब्द
फिरतो

सोबत चिकटतात
तसलेच गैरसैर शब्द
आयुष्याच्या स्लाईड्स
संथ चित्रपट
होतो एक गोळा
ओबडधोबड
सुबक
कसाही

अन् कविता संपते!

मयूरेश चव्हाण, मुंबई.
१८.०७.२०१२, ००.४८

Back to top