काहीतरीच वाटत आहे, काहीतरी काळजातून तुटल्यासारखे!
अमिताभ बच्चनने आयुष्य व्यापून टाकलेल्या काळात कोणा मोठ्या भावंडाने राजेश खन्ना जास्त आवडतो म्हणणे म्हणजे वादावादीलाच सुरुवात! मी आणि माझ्या वयाची भावंडे अमिताभ किती श्रेष्ठ ते सांगून राजेश खन्नाला नावे ठेवायचो.
नंतर समजले की शम्मीचा अस्त होताना आणि देव, दिलीप, राज हे त्रिकूटनिबर वाटू लागलेले असताना या माणसाने त्याकाळच्या भारतीयांसाठी असलेल्या एकमेव मनोरंजनाच्या साधनाला संजीवनी देऊन क्रांती घडवली.
त्याचे स्मितहास्य, मान हालवणे, इनोसन्ट चेहरा, बोलके डोळे, अत्यंत हॅन्डसम व्यक्तीमत्व!
त्यातच किशोर आर डी ची साथ आणि फ्रेश हिरॉईन्स आणि सुंदर लोकेशन्स!
त्याने अनुभवलेले फॅन्सचे प्रेम त्या आधी आणि नंतर आजवर कोणाच्याही वाट्याला आलेले नाही
मेरे सपनोंकी रानी या गाण्यात त्याचे दिसणे शर्मिलाकडे सुर्लक्ष करण्यास भाग पाडत आहे. काय काय लिहावे कळतच नाही. असे कधी होत नाही की कोणी महान व्यक्ती निधन पावल्यावर व्यक्तीगत पातळीवर दु:ख व्हावे. फक्त किशोर कुमार गेला तेव्हा असे झाले होते. नंतर आजच.
मित्रांनो, कृपया उदार मनाने राजेश खन्नाच्या तुम्हाला असतील त्या आठवणी लिहून धागा श्रीमंत करा, त्याचे फोटो टाका.. मला त्या 'दु:खद घटनेचा' धागा खरंच अपुरा वाटतोय राजेश खनासारख्या व्यक्तीसाठी... नाहीतर असा लेख लिहिला नसता.. एक जगजीत सिंग यांच्यासाठी लिहावासा वाटला होता..
=======
जिंदगीको बहोत प्यार हमने दिया
मौतसेभी मुहोब्बत निभायेंगे हम
रोते रोते जमानेमे आये मगर
हसते हसते जमानेसे जायेंगे हम
जायेंगे पर किधर
है किसे ये खबर
कोई समझा नही
कोई जाना नही
जिंदगी का सफर......
समयोचित लेख. बातमी कळल्यावर
समयोचित लेख.
बातमी कळल्यावर अगदी गलबल्यासारखे वाटले.
समीर चव्हाणांच्या या ओळी आठवल्या.
काहीतरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते
काकास आदरांजली.
"आनंद" हरपला. काकास
"आनंद" हरपला. काकास आदरांजली.
काकाचा एक दुर्मिळ फोटो.
काकाचा एक दुर्मिळ फोटो.
राजेश खन्ना यांना आदरांजली
राजेश खन्ना यांना आदरांजली !
लेख छान !
<<काहीतरीच वाटत आहे, काहीतरी
<<काहीतरीच वाटत आहे, काहीतरी काळजातून तुटल्यासारखे!<< +१ अगदी अगदी!
त्यांची ती मान वळवण्याची स्टाईल, आर्जवी प्रेम... खुप वेगळा होता अभिनय.
राजेश खन्ना आणि मुमताज पर्फेक्ट जोडी. . दाग, आराधना, अपना देश हे चित्रपट कधीच विसरणार नाही.
काकांस विनम्र श्रद्धांजली.
Right now I'm totally grief
Right now I'm totally grief stricken , cant think of writing anything!!!
They should declare a three days of National Mourning...
खरेच.. मुलीने फोनवरुन बातमी
खरेच.. मुलीने फोनवरुन बातमी सांगितली आणि एकदम गलबलुन आले.
मी राजेश खन्नाची फॅन आहे असे म्हणाले की आताच्या पिढीतले लोक मला हसत, त्यांना काय सांगणार राजेश खन्नाने पुर्ण देश कसा भारुन टाकलेला ते.... राजेश खन्नाचे दिवस खुप वेगळे होते, तसा स्टार परत होणे नाही.
माझे बाबा पण मला खुप किस्से
माझे बाबा पण मला खुप किस्से सांगतात ...त्याकाळ्ची पिढी ,,माझ्या बाबासहित राजेश खन्नाला कसे फॉलो करायचे.,...त्याची हेअरस्टाईल्,,कपडे आनि डोळे मिचकावत मान हलव्ण्याची लकब्,,,
अजुन ही रोज रात्री मी,बाबा आनि भाऊ सोनी मिक्स वरची जुनी गाणी पाहात बसतो...त्यात राजेश खन्नाची गाणी लागली असेल तर मी आनि निशांत सेम त्याच्यासारखी अॅक्टींग करत असतो... आज कस एकदम वेगळ वाटेल आम्हांला....
नाचण्यासाठी त्याच "जय जय शिवशंकर "हे आमच फेवरेट गाण..
एक किस्सा तर बाबा नेहमीच सांगतात...त्यांच्याच वयाच्या एका मुलाला राजेश खन्नाचे एवढ वेड लागल होत्,,,की तो स्व्तःला राजेश खन्नाच समजु लागला...ठार वेडा झाला तो बिचारा...अजुन ही त्याची गाणी म्ह्ण्त बड्बड करत हिंडत असतो..
श्रद्धांजली
श्रद्धांजली
आमच्या वडलांचा अत्यंत आवडता
आमच्या वडलांचा अत्यंत आवडता हिरो. त्यांनी मेडिसीनचा अभ्यास बुडवून राजेशखन्नाचे पिच्कर वगैरे पाहिले होते.
आई मेडिकल कॉलेजातल्या आराधनाच्या काळातील आठवणी सांगते.
त्यांना फारच वाईट वाटणार. अलिकडचे त्याचे खप्पड रुप बघवत नसे.
अगदी मनातील विचार मांडले आहेत
अगदी मनातील विचार मांडले आहेत तुम्ही बेफिकीरजी. "दु:खद घटना" या धाग्यावर जरूर सर्वजण राजेश खन्नाच्या निधनानिमित्य त्याना श्रद्धांजली वाहत आहेत, पण अशा एकमेव सुपरस्टारसंदर्भात वेगळ्या स्वतंत्र धाग्याचे प्रयोजन अगत्याचे होते, जे तुम्ही चटदिशी अंमलातही आणले....इतकेच नव्हे तर लेखाला शीर्षकही इतके समर्पक आहे की केवळ त्यामुळेच राजेश खन्ना युग नजरेसमोर उभे राहते.
माझ्या कॉलेजच्या जमान्यात सर्वाना अक्षरशः वेड लावणारा हा अभिनेता होता. एरव्ही अभिनेता म्हटला की तरुणींनी पागल व्हायचे तर अभिनेत्रीसाठी तरुणांनी...असे साधेसरळ अंकगणित असते सर्व काळी. पण राजेश खन्ना या कारणासाठी सणसणीत अपवाद ठरला होता. तरुणी त्याच्यावर फिदा होतात हे पाहताना कुठल्याही तरुणाला राजेश खन्नाविषयी असूया वाटत नव्हती, कारण तेही त्याच्यासाठी तितक्याच तीव्रतेने पागल होते.
प्रत्येक आईला वाटे की आपल्याला राजेशसारखा पुत्र व्हावा, प्रत्येक बहिणीला वाटे की आपल्याला राजेशसारखा भाऊ असावा, प्रत्येक मित्राला वाटे की आपला दोस्त असा राजेशसारखाच असावा. हे पूर्णार्थाने भाग्य अन्य कोणत्याही स्टारच्या नशिबी आले नाही. लहानापासून थोरापर्यंत सार्यांच्या तोंडी त्या दशकात एकच नाव होते
'राजेश खन्ना'.
१९६९ ते १९७२ या चार वर्षात सलग १६ चित्रपट तुफान हिट करून दाखविणे ही करामत आजतागायत कोणत्याही अभिनेत्याला (अगदी बिग बी याना सुद्धा) जमलेली नाही. चित्रपटाचे कथानक काहीही असू दे, आम्ही राजेश खन्नासाठी चित्रपट बघायला जातो असे त्यावेळेचे प्रेक्षक (स्त्री असो पुरुष) म्हणत थिएटरवर गर्दी करीत.
चित्रपट संगीतदिग्दर्शकांसाठी तर राजेश खन्ना पुरणपोळीसारखा कलाकार वाटे. त्याचे चित्रपट भले पडणारे असोत पण असा एकही चित्रपट नसेल की ज्याच्यातील गाणी हिट झाली नाहीत. सर्व संगीतकारांनी त्याच्या चित्रपटांसाठी आपली अगदी ठेवणीतील रचना स्वरबद्ध केल्या आहेत की काय असे वाटे. राजेश खन्नामुळे किशोरकुमारला मोकळे रान मिळाले असा विचार असो वा किशोरमुळे खन्नाच्या लोकप्रियतेत भर पडली असे मत असो, दोन्हीमुळे खन्ना नजरेसमोर तसेच कानीही गुंजत राहिला हेच शेवटी सत्य.
त्याच्या खाजगी जीवनाविषयी एक चाहता म्हणून आपल्याला काही देणेघेणे नाही. प्रत्येकाचा संसार ही त्याची अशी स्वत:चा प्रोटेक्टेड झोन असतो व आपण ट्रेसपासरची भूमिका कधी करू नये. आपले नाते त्याच्या पडद्यावरील इमेजशी संबंधित आणि त्याच नात्याने राजेश खन्ना नावाच्या बहुगुणी अभिनेत्याने भरभरून आम्हाला जो आनंद दिला त्याच्या आनंदातच आम्ही सर्वकाल राहू.
आनंद कधीही मरत नसतो....हा आनंदही कधी आमच्यातून मरण पावणार नाही.
थॅन्क्स बेफिकीर.
अशोक पाटील
आनंदमधले शेवटचे दृश्य
आनंदमधले शेवटचे दृश्य आठवतेय.
जिंदगी और मौत उपरवाले के हाथ है जहांपन्हा, जिसे न आप बदल सकते हैं न मैं
हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिसकी डोर उपरवाले के हाथ बंधी है | कब कौन कैसे उठेगा यह कोई नही जानता!
पंजाबी घरातल्या सगळ्यात लहानग्या मुलाला लाडाने काका म्हणतात. म्हणून 'तो' काका. लाडावलेला, कुणीही त्याला आपलं म्हणावं असा. (आज मराठी वृत्तवाहिन्यांवर 'हिंदी चित्रपटसृष्टीचे काका गेले' आदरार्थी बहुवचनात्मक काका बिरुद त्याच्यासाठी नव्हते.
त्याच्या अभिनयाच्या मर्यादांसकट आवडायचा. प्रसन्न व्यक्तिमत्त्व साकार करणार्या त्याच्या सगळ्या भूमिका आवडलेल्या. अंदाज, आराधना, हाथी मेरे साथी, अमर प्रेम आणि अर्थातच आनंद. स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडलेला (पहिला देव आनंद, दुसरा हा.)
वाईट वाटले. स्टाईलबाज म्हणून
वाईट वाटले. स्टाईलबाज म्हणून जरी तो लोकांना आता आठवत असला, तरी काही चित्रपटात त्याने उत्तम अभिनयही केला होता. जून्या खामोशी साठी तर वहिदाने त्याची शिफारसच केली होती.
एक पर्व संपले.
एक पर्व संपले.
मला राजेश खन्नाबद्दल काहीही
मला राजेश खन्नाबद्दल काहीही जास्ती माहीत नाही. पण त्याचे मोजके सिनेमे आवडतात मला. ते ही कथानक वगैरे साठी नाही फक्त त्याच्यासाठी.
माझ्या मते चित्रपटसृष्टीतली सर्वोतम गाणी ज्या ज्या कलाकारांवर चित्रित झाली त्यापैकी राजेश खन्ना हा एक होता. किशोरचा आवाज म्हणजे त्याच्यासाठीच देवाने बनवलाय असं वाटावं इतका हुबेहुब... आणि चपखल.
त्याच्या इतकं सुपरस्टारपद इतर कोणीही भुषवलं नाही आणि जगलंही नाही.
आराधना आणि कटी पतंग, आनंद यासारख्या चित्रपटात जो तो दिसलाय तसं देखणं दुसरं कोणी दिसलंच नाही.
खूप वाईट वाटल. ते फ़ार छान
खूप वाईट वाटल.
ते फ़ार छान अभिनय करायचे. एक एक स्टाईल डोळ्यासमोर येतेय. प्रत्येक चित्रपटात वेगवेगळा अभिनय. सतत तोचतोच पणा कधीच जाणवत नाही. असा अभिनेता आता होणे नाही.
आत्ता माझ्या साहेबांचा मुलगा वय वर्षे २५. त्याला ही बातमी सांगितली, तर तोही चुट्पुटला. आणि त्याने
’बाबूमोशाय” म्हणून अॅक्शन करून दाखवली. म्हणजे या पिढीतही ते तितकेच प्रिय्य होते.
आता त्यांचीच गाणी ऐकतेय.
राजेश जावेश.. राजेश खन्ना
राजेश जावेश.. राजेश खन्ना चित्रपटात हिट झाल्यानंतर मराठीमधे आवडेश, जावेश, खावेश, भावेश शब्दांची अशी नवी रुपे आली होती. अजूनही हे शब्द आपण वापरतो.
एक युग संपले..... तो माणुस
एक युग संपले.....
तो माणुस म्हणुन कसा होता, पति म्हणुन कसा होता, मित्र म्हणुन कसा होता.... कसाही असो....
त्याच्या बरोबर अनेक गोष्टी चित्रपट स्रुष्टीत सुरु झाल्या.... उदा. "सुपर स्टार " हे बीरुद....
त्याच्या साठी खास गॉसीप कॉलम्स लिहिले जायचे.. त्यानेच पत्रकारांशी मैत्री करायची असते हा पायंडा पाडला... उदा. देवयानी चौबळ... आपलं जीवन खुशाल लोकां समोर मांडलं,
त्याची असंख्य लफडी मग ती देवयानी चौबळ असो, अंजु मेहेन्द्रु असो, टीना मुनीम असो.... सिनेमासिंकां मध्ये खुशाल चघळली गेली... डिंपल बरोबरचं लग्न, मग तिला दिलेला त्रास, त्यांचं वेगळं होण.... प्रत्येक गोष्टीची बातमी झाली...
त्याने घातला..म्हणुन गुरुशर्टाची फॅशन आली... त्याने "आनंद" मध्ये वापरली... म्हणुन खांद्या वरच्या झोळीची फॅशन आली. त्याचे कपडे, केस, मान कलती करायची सवय..... प्रत्येक गोष्टीची फॅशन झाली....
आज हे सगळं संपलं.......
लहान वयात मिळालेलं यश तो पचवु शकला न्हव्हता.... खुप चमचे आजुबाजुला घेवुन फिरायचा.... खुप अहंकारी आहे... एक्स्ट्रॉ नट्यांना पण सोडत नाही....बायकोला त्रास देतो.....
त्याच्या अभिनया पेक्षा इतर गोष्टींचीच चर्चा!!!!!
मला त्याचा खुप आवडलेला सीनेमा म्हणजे "बावर्ची" आणि दुसरा " सफर" ह्यात आपल्याला स्टाइलबाज राजेश दिसत नाही, तर खरा राजेश दिसतो. त्याची स्टाइल त्याला गवसायच्या आधी तो खुप साधा वाटायचा... आठवा "आजापिया तोहे प्यार दुं" गाणं ....
नंतर नंतर तो बहकला.... वट्टेलते रोल करायला लागला.... पण तरीही त्याने सगळ्या हीरॉइन्स बरोबर कामे केली. अगदी वहिदा, आशा, नंदा, पासुन ते पुनम धिल्लन पर्यंत.... त्याने समांतर सिनेमात कामे नाही केली, पण त्यातल्या शबाना आणि स्मिता बरोबर खुप कामे केली. कोणा बरोबर ही काम करताना तो घाबरला नाही. किंवा ही नटी आपल्याला वरचढ होइल असे ही त्याला वाटले नाही.....
चांगले रोल, चांगली गाणी, चांगल्या नट्या, चांगला चेहेरा..... तो नशीबवान तर खराच.....
अशा एका हिरोस माझी आदरांजली......
जवळ जवळ रोज त्याचे एक तरी
जवळ जवळ रोज त्याचे एक तरी गाणे पाहिले जाते ( बी४यू, मस्ती, जलवा वगैरे वाहीन्यांच्या कृपेने).
शम्मी गेला, देव आनंद हरपला आणि आता राजेश खन्ना...
खूप हळहळ वाटते आहे..
एका महान अभिनेत्यास आदरांजली
एका महान अभिनेत्यास आदरांजली !
राजेश खन्नांचे मी जास्त
राजेश खन्नांचे मी जास्त चित्रपट पाहिलेले नाहीत पण आनंद, बावर्ची हे चित्रपट मी खुप वेळा पाहिलेत. आनंदमधील शेवटचा सीन तर (रेकॉर्ड वरील डायलॉग आणि रेकॉर्ड तुटते) अप्रतिमच. डोळे भरुन येतातच.
मोहन की मीरा, अप्रतिम
मोहन की मीरा,
अप्रतिम पोष्ट... खूप आवडली.. थोडक्यात पण खूप सुंदर आढावा..
आराधना आणि कटी पतंग, आनंद
आराधना आणि कटी पतंग, आनंद यासारख्या चित्रपटात जो तो दिसलाय तसं देखणं दुसरं कोणी दिसलंच नाही. >>> त्या ही आधी 'इत्तेफाक' या रहस्यपटात तो कसला हँडसम दिसलाय !!
मीरा, छान पोस्ट
बेफिकिर, समयोचित लेखाबद्दल
बेफिकिर, समयोचित लेखाबद्दल धन्यवाद.
मोकीमि, तुमचा प्रतिसाद खूप आवडला.
वाईट वाटले. वर सगळ्यांनी
वाईट वाटले.
वर सगळ्यांनी लिहिले आहे, त्यापेक्षा वेगळे काय लिहू?
'आनंद' हा मला सगळ्यात जास्त आवडलेला राजेश खन्ना-पट. त्यानंतर सफर, बावर्ची, आराधना वगैरे. राजेश खन्नाच्या स्टारडमचे खूप किस्से ऐकले आहेत. दुर्दैवाने आमच्या पिढीने त्याची ती लोकप्रियता अनुभवलेली नाही. थिल्लर स्टँड्-अप कॉमेडिअन्सनी गेली अनेक वर्षे त्याला विनोदाचा विषय करून टाकले आहे. त्याचे ती शेवटची हॅवल्स फॅनची जाहिरात ("मेरे फॅन मुझसे कोई नही छीन सकता") अगदीच केविलवाणी वाटली.
श्रद्धांजली !
बाबू
बाबू मौशाय.............
विनम्र आदरांजली!
>>मित्रांनो, कृपया उदार मनाने राजेश खन्नाच्या तुम्हाला असतील त्या आठवणी लिहून धागा श्रीमंत करा, त्याचे फोटो टाका.. मला त्या 'दु:खद घटनेचा' धागा खरंच अपुरा वाटतोय राजेश खनासारख्या व्यक्तीसाठी... नाहीतर असा लेख लिहिला नसता..
अगदी!
(या कलाकारावर कितीही पाने लिहीली तरी अपुरी पडतील...... पण सवड मिळाली तर नक्कीच लिहीन. तूर्तास फक्त तो "नसण्याचा" अनुभव घ्यायचा आहे.. रक्ताचं नातं नाही त्याच्याशी तरी बेफी म्हणले तसं आत काहितरी खोल तुटल्याचा भयानक अनुभव आहे नक्की!)
राजेश खन्नांना
राजेश खन्नांना श्रद्धांजली.
<< मला राजेश खन्नाबद्दल काहीही जास्ती माहीत नाही. पण त्याचे मोजके सिनेमे आवडतात मला. ते ही कथानक वगैरे साठी नाही फक्त त्याच्यासाठी.
माझ्या मते चित्रपटसृष्टीतली सर्वोतम गाणी ज्या ज्या कलाकारांवर चित्रित झाली त्यापैकी राजेश खन्ना हा एक होता. किशोरचा आवाज म्हणजे त्याच्यासाठीच देवाने बनवलाय असं वाटावं इतका हुबेहुब... आणि चपखल >>
माझंही असंच झालंय.
राजेश खन्ना क्या चिकना दिखता
राजेश खन्ना क्या चिकना दिखता है यार.... एक फेमस डायलॉग
आमच्या पिढीचा पहिला हिरो. आराधना पासुन मला सिनेमाचे वेड लागले.
राजेश खन्ना - किशोरकुमार जोडी इथुनच फेमस झाली. त्याकाळी पुरुषांच्या दोन हेअर स्टाईल्स प्रसिद्ध होत्या. एक देवानंदचा कोंबडा आणि दुसरी राजेशखन्ना.. चिकना हिरो अशीच त्याची ओळख होती. त्याचे बहुतेक सगळेच सिनेमे मी पाहीले आहेत.
नक्कीच काळजात आत खोलवर काहीतरी तुटल.
आनंद!! राजेश खन्नाचा माझा
आनंद!! राजेश खन्नाचा माझा सर्वात आवडता चित्रपट...
जेव्हा जेव्हा राजेश खन्ना हे नाव आठवेल.. तेव्हा तेव्हा -
"बाबूमोशाय .....ज़िन्दगी और मौत ऊपरवाले के हाथ है जहांपनाह, उसे ना आप बदल सकते हैं और ना मैं | हम सब रंग मंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपरवाले की उंगलियों मे बन्धी है, कब कौन कैसे उठेगा...कोई नही बता सकता."
हे आठवेल...
आणि
"आनंद मरा नही... आनंद मरते नही"
हेही...
खार दांड्याचा पावसाळी समुद्र
खार दांड्याचा पावसाळी समुद्र क्षणकाल स्तब्ध झाला का
ओस ओसाड आशिर्वाद मधून तुझा आवाज गुंजला का?
मायानगरीचे वाहते रस्ते तसेच वहाताहेत वरवरून
खोटी स्मिते,खोट्या प्रशंसा एकमेकांवर उधळत भरभरून..
तुझी सद्दी संपली होती तशी पूर्वीच ,की कधीच नाही?
'I hate tears..' असे म्हणालास की स्मरणातून जात नाही.
तुझे दिसणे तुझे हसणे तुझ्या लकबी तुझे असणे
तुझ्यासारखा तूच राजा तुलाच जमले प्रेम करणे
जादूच्या कथा धुक्याच्या व्यथा मधाच्या नायिका गाण्यांचे गारुड
महानायक तुझ्यासारखा..बदलले सारे..बदलले बॉलिवूड.
बदलतेच सारे,हवे-नको तेही. बदलांपलिकडे पण काही उरले
शाश्वत सुंदर अमर प्रेम व्यक्त केलेस जे ,जिव्हारी राहिले
Pages