Submitted by वैवकु on 14 July, 2012 - 05:47
किती केल्या उलाढाली
मनाची मंडई झाली
धरेचे लग्न सूर्याशी
नभाच्या मांडवाखाली
पदोपदि मरण दाखवते
म्हणवते जिंदगी साली
कसा देशास ह्या माझ्या
नसावा एकही वाली
नव्या गझला कश्या पाडू
खयालांचीच कंगाली
मनाची मंडई झाली..............मनाची मंडई झाली!!
गुलमोहर:
शेअर करा
इतक्या दिवसात एकही प्रतिसाद
इतक्या दिवसात एकही प्रतिसाद नाही हे ओळखून आतापर्यन्त हे असले काव्य अप्रकाशित करायला हवे होतेत
प्रतिसादासाठी
प्रतिसादासाठी धन्यवाद
अभिप्राय पोचला