मला "हि अशी का वागते" या नावाचं एक पुस्तक हवं आहे. जवळजवळ ७ वर्ष झाले मी ते शोधतेय.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्त्री अशी (म्हणजे कुठल्याही विशिष्ठ प्रकारे) का वागते याचं त्यात अतिशय सुरेख वर्णन केलं होत आणि शास्त्रशुद्ध कारणमीमांसा देखील.
पुस्तकाला जांभळ्या (ज्याला आपण "बैंगन कलर" म्हणतो) त्या रंगाचं कव्हर आहे.
मी क्रॉसवर्ड मध्ये आणि इतरही बरेच ठिकाणी शोधलंय.. पण नाही मिळालं..
"बाईवर कोणत्याही नात्याने प्रेम करणारया पुरुषाने वाचलंच पाहिजे असं पुस्तक" असं काहीसं त्याच्या मलपृष्ठावर लिहिलं होत..
शिवाय मला त्यातले काही परिच्छेद अगदी छान आठवताहेत..
उदाहरणार्थ, बाईला मुल झाल्यावर ती अगदी आनंदाने न्हाऊन निघेन असे वाटते. पण तिला खूप आनंद होत नाही. उलट ती गोंधळलेलीच दिसते. असे का??
किंवा आजकालच्या तरुणी इतकं स्वातंत्र्य मिळूनही त्या चीडचीड्या का झाल्या आहेत? (मग त्यांनी त्यात लग्नाचे लांबलेले वय वगैरे कारणमीमांसा केली होती.)
जनरली अश्या विषयांवर लिहिण्यात "मंगला गोडबोले" यांचा हातखंडा आहे. तरीही सदर पुस्तक त्यांनीच लिहिले होते कि नाही हे मला खरंच आठवत नाहीये.
मी खूप अपेक्षा ठेऊन आहे. प्लीज मला मदत करा.
मी नवे, जुने, वापरलेले कसेही पुस्तक घ्यायला तयार आहे.
कोणाकडे एकच प्रत असल्यास मी फोटोकॉपी करून परत करायलाही तयार आहे.
मला "हि अशी का वागते" या नावाचं एक पुस्तक हवं आहे.
Submitted by पियू on 17 July, 2012 - 08:37
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
" काय तुझ्या मनात " हे पुस्तक
" काय तुझ्या मनात " हे पुस्तक म्हणायचय का तुला ? हे बघ :
संपर्कातून ईमेल कर.
मी पुण्यात आहे. हेच पुस्तक शोधत असशील तर ये माझ्या घरी
अवल याच्या मागेपण
अवल याच्या मागेपण (मलपृष्ठावर) मी सांगतेय तसंच लिहिलंय का?? आणि त्यात असच विवेचन आहे का?? कारण नावाविषयी माझा गोंधळ होतोय जरा..
हो हेच ते पुस्तक. खुप छान
हो हेच ते पुस्तक. खुप छान आहे.
मी २००४ मध्ये माझ्या तमाम बहिणी, मैत्रिणींना प्रेमभावे दिलय ते, अगदी आईलाही 

पण आमच्या कोणाच्याच नवर्यांनी नाही वाचलं .... ह्म्म्म्म..... काय काय स्वप्न असतात आपली
पियु, तु वर लिहीलेल वाचुन
पियु, तु वर लिहीलेल वाचुन मलाही अवलने म्हटलय तेच पुस्तक आठवल!
पियु परी, तुम्ही म्हणता ते
पियु परी,
तुम्ही म्हणता ते अवल यांनी सांगितलेलंच पुस्तक असावं.
म. टा.मध्ये या पुस्तकाचं आलेलं हे परीक्षण - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=643001
तुम्हांला हे पुस्तक विकत घ्यायचं असल्यास मायबोलीच्या खरेदी विभागातून घेता येईल.
वाचुनही फारसा उप्योग नसतो
वाचुनही फारसा उप्योग नसतो
त्यामुळे 'इटस ओके अवल!' 
हेच ते पुस्तक याबाबत खात्री
हेच ते पुस्तक याबाबत खात्री होत नसेल तर काय काय वाचलं होतं ते आठवून मेल करा. मी आपल्याला आवडलेल्या शीर्षकासहीत नव्याने पुस्तक लिहून पाठवून देईन. है कै नै कै
वत्सला अगदी खरं गो किरण
वत्सला
अगदी खरं गो 
किरण ____/\_____
खूप खूप आभार... इतके वर्ष
खूप खूप आभार... इतके वर्ष शोधात असलेले पुस्तक मायबोलीवर प्रश्न टाकल्यावर ५ मिनिटांच्या आत मिळावे यासारखा आनंद नाही..
उद्याच हे पुस्तक विकत घेईन.. माझा नवरा ते वाचेन यात मला यत्किंचितही शंका नाही..
(याचे कारण म्हणजे त्याला खूप वेळा "मी अशी का वागते" हा प्रश्न पडतो. आणि मी त्याला अनेकदा सांगते.. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका पुस्तकात आहेत. माझा मुळात नावातच घोळ असल्याने पुस्तक सापडायला इतकी वर्षे लागली. नाहीतर त्यानेही २ महिने पुण्या-मुंबईतली सगळी दुकाने या पुस्तकासाठी पालथी घातली आहेत).
आभार.. अनेक वेळा.. पुन्हा पुन्हा आभार..
(बादवे मी माबो वर नवीन आहे. माबोवर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतात का?)
हेच ते पुस्तक याबाबत खात्री होत नसेल तर काय काय वाचलं होतं ते आठवून मेल करा. मी आपल्याला आवडलेल्या शीर्षकासहीत नव्याने पुस्तक लिहून पाठवून देईन. है कै नै कै>> ____/\_____
मायबोलीवर हे पुस्तक तुम्हांला
मायबोलीवर हे पुस्तक तुम्हांला मूळ किमतीलाच मिळेल. तुम्ही भारतात असाल तर टपालखर्च द्यावा लागणार नाही.
उद्यापर्यंत इथे तुम्हांला खरेदी विभागातल्या या पुस्तकाची लिंक देतो.