*** उखाणा

Submitted by अरविंद चौधरी on 17 July, 2012 - 00:40

*
घातला दुःखास गमतीने उखाणा
नाव माझे घेउनी केला ठणाणा

सत्य आळोखे पिळोखे घेत राही
मात्र खोटे,पोचते आधी ठिकाणा

शब्द कवितेचे उसळती या जिभेवर
फक्त गुणगुणतो जरासा मी तराणा

वावगा ना शब्द जावो याचसाठी,
मी मुका आहे असा केला बहाणा

प्रेम असते मूक आणिक आंधळेही
जाणतो हे फक्त प्रेमाचा दिवाणा

ठेच नाही लागली पायांस माझ्या
का तरीही मागचा झाला शहाणा ?

----- अरविंद

गुलमोहर: 

घातला दुःखास गमतीने उखाणा
नाव माझे घेउनी केला ठणाणा...व्व्वा!

सत्य आळोखे पिळोखे घेत राही
मात्र खोटे,पोचते आधी ठिकाणा....सही

प्रेम असते मूक आणिक आंधळेही
जाणतो हे फक्त प्रेमाचा दिवाणा.....ह्म्न!

ठेच नाही लागली पायांस माझ्या
का तरीही मागचा झाला शहाणा ?.....सुरेखच!

आवडली गझल.

अरविंदराव! सुंदर मतला

पूर्ण गझल आवडली!

अभिनंदन!

आपल्या गझललेखनास शुभेच्छा!

.........प्रा.सतीश देवपूरकर

सर्वांचे मनापासून आभार ...

श्री.देवपूरकर सर,

आपल्या अमोल मार्गदर्शनामुळे लिहू शकलो.......