Submitted by प्रार्थना on 13 July, 2012 - 02:21
नमस्कार.
पुण्यात विश्वासार्ह भविष्यवेत्ता कोणास माहिती आहे का? तसे बरेच जण आहेत, अगदी गल्लोगल्ली आढळतील. परंतु तुम्ही स्वतः अनुभव घेतलेले कोणी आहे का ? कौटुंबिक, व्यावसायिक व इतर बाबत योग्य सल्ला देणारे कोणी आहे का ?
कृपया अतिशय निकडिने विचारत आहे. तरी भविष्य बघणे योग्य का अयोग्य, त्यात किती तथ्य यावर चर्चा, वाद न करता योग्य तो सल्ला द्यावा ही कळकळीची विनंती.
धन्यवाद !
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यातल्या साळवींबद्दल
पुण्यातल्या साळवींबद्दल कोणाला माहिती आहे?
मुंबईतील उपाध्ये यांच्या बद्दल काही माहिती, त्यांचा फोन नंबर वगैरे ?
साळवींकडे चुकुनही जाऊ नकोस,
साळवींकडे चुकुनही जाऊ नकोस, लूट आहे फक्त..
धन्यवाद, सरिका. दुसरे कोणी
धन्यवाद, सरिका. दुसरे कोणी सुचवा ना, प्लिज
प्रार्थना, १०० % बिनचूक
प्रार्थना,
१०० % बिनचूक किंवा असेच घडेल असे भविष्य कोणीही सांगू शकत नाही.. त्यातही पारंपारीक आणि कृष्णमुर्ती पद्धती आहेत.
सिद्धेश्वर मारटकरांचे ज्योतिष विषयक एक अंक निघतो 'ज्योतिष ज्ञान' त्यात काही लोकांचे पत्ते दिले आहेत.
भविष्य माहीत आहे , त्याचा खोल
भविष्य माहीत आहे , त्याचा खोल अभ्यास असलेले असे खूपच कमीच असतात. आजकाल जे आहेत , ते बनावटीह्च असतात असे पाहिलेय.
माझे आजोबा खूप वर्षापुर्वी पुण्यात करत ही सेवा. ते हयात नाहीत पण त्यांच्या वहीत काही मिळतेय का बघायला लागेल. नाहीतर तुम्हाला सॉउथ चे चालतील का? एक आहेत, त्यांचा नंबर विचारते व लिहिते.
प्रार्थना, खालच्या दोन लिन्क
प्रार्थना, खालच्या दोन लिन्क बघ -
http://astromnc.blogspot.in/ मिलिंद चितंबर पुण्यात आहेत, आधी मायबोलीवरही होते, हल्ली येत नाहीत. पण त्यांचे अंदाज अचुक असतात.
http://dhondopant.blogspot.com/ - धोंडोपंत मुंबईत आहेत पण ते फोनवरुन कन्सल्टेशन देतात. त्यांचे अंदाजही अचुक असतात.
मिलिंद पत्रिका पाहणे त्यांचा छंद म्हणुन करतात त्यामुळे उत्तरे मिळायला वेळ लागु शकतो. त्यामानाने धोंडोपंत लगेच उत्तर देतात.
मी दोघांनाही ब-याच पत्रिका दाखवल्यात, त्यावरुन सांगते. कोणाला या दोघांचा चांगला अनुभव आला नसेल तर माहित नाही.
कोणताही ज्योतिषी १००% अचुक सांगु शकत नाही. ज्योतिषी स्वतःचे ज्ञान आणि अनुभव वापरुन पत्रिकेतल्या ग्रहस्थितीवरुन भाकिते करतो. जेवढे त्याचे ज्ञान सखोल नी अनुभव व्यापक तितकी त्याची भाकिते सत्याच्या जवळ जाणारी असतात.
http://dhondopant.blogspot.co
http://dhondopant.blogspot.com/ - धोंडोपंत मुंबईत आहेत पण ते फोनवरुन कन्सल्टेशन देतात. त्यांचे अंदाजही अचुक असतात.
अनुमोदन. मला प्रत्यक्ष अनुभव नाही पण परिचितांकडून ऐकले आहे.
आपले लिम्बु भाउही होरा विशारद
आपले लिम्बु भाउही होरा विशारद आहेत.
लिंबू भाउंची इथली सगळी स्वगतं
लिंबू भाउंची इथली सगळी स्वगतं वाचून/सांगून झाली की मगच तुम्हाला भविष्य सांगतील, बोला आहे कबूल? (गंमत करतेय)..
हो, लिंबुभाऊही होराविशारद
हो, लिंबुभाऊही होराविशारद आहेत पण त्यांचाही बहुतेक छंद असावा. नोकरीमुळे द्यावा तितका वेळ देता येत नाही असे त्यांनी ब-याचदा लिहिलेय. प्रार्थनाला झटपट उत्तर हवेय, त्यामुळे तिच्यासाठी धोंडोपंतांचा पर्याय मला योग्य वाटतोय
साधना+१
साधना+१
धन्यवाद सर्वांना, लगेच मदत
धन्यवाद सर्वांना, लगेच मदत केलीत.
साधनाताई होय हो, जरा अडचणीत आहे. म्हणून जरा घाई.
>कोणताही ज्योतिषी १००% अचुक सांगु शकत नाही < अगदी मान्य, पण अगदीच दिशा दिसत नसली की .... बघू, धोंडोपंतांकडे गार्हाणे मांडते. पुन्हा एकदा धन्यवाद.
झंपी, साऊथचे? म्हणजे काही
झंपी, साऊथचे? म्हणजे काही वेगेळे शास्त्र आहे का हे ? जर आपल्या माहितीचे असतील तर जरूर सांगा. शेवटी मार्ग दाखवणारा असल्याशी कारण . धन्यवाद.
प्रार्थना, व दा भट आणि
प्रार्थना,
व दा भट आणि त्यांचे भाऊ श्रीराम भट फार प्रसिद्ध आहेत पुण्यात.
माझा विश्वास नसल्यामुळे अनुभव अजिबात नाही.
प्रार्थना, आमचे ओळ्खीचे एक
प्रार्थना,
आमचे ओळ्खीचे एक काका आहेत . आम्हि नेहमी त्यांच्या कडे च जातो. आम्हाला तर त्यांचा खुप चांगला अनुभव आहे. आम्हि त्यांच्या कडे ८-९ वर्षा पासुन जातोय. तुम्हा ला त्यांचा हवा असेल तर मी देते तुम्हाला . तुम्हाला नक्कि चांगला अनुभव येइल.
कोणताही ज्योतिषी १००% अचुक सांगु शकत नाही < अगदी मान्य,
पण अगदीच दिशा दिसत सापडत नसेल तर .... ज्योतिष्याचा सल्ला घ्यायला हरकत नाही .
धन्यवाद. निलम्स कृपया द्याल
धन्यवाद.
निलम्स कृपया द्याल का त्यांचे नाव, नंबर ? अन शक्य तर पत्ताही ?
पण अगदीच दिशा दिसत सापडत नसेल
पण अगदीच दिशा दिसत सापडत नसेल तर .... ज्योतिष्याचा सल्ला घ्यायला हरकत नाही
मीही हाच विचार करुन ज्योतिषाचा सल्ला घेते. शेवटी निर्णय काय घ्यायचा ते आपल्यावर असते.
प्रार्थना मागे मला माबोवर
प्रार्थना मागे मला माबोवर पत्ता मिळाल्याने ( जुन्या) मी बुधवार पेठ, जोगेश्वरीसमोरच्या बोळात, रोहिणी प्रकाशन नावाचे एक ज्योतिष्यविषयक कार्यालय आहे, तिथे गेले होते ( ते कार्यालय म्हणजे ऑफिस ग्रहांकीत मासिकाचे चंद्रकांत शेवाळे चालवतात. तिथे भविष्यविषयक फि घेऊन सल्ला देतात. मला तो अनूभव नाही, कारण मी गेले त्याचवेळी काही काम निघाल्याने तातडीने घरी यावे लागले. तू जाऊन बघ.
मी स्वतः ज्योतिष्याचा आता नुकताच अभ्यास करतेय, पण अजून दीडच महिना झालाय त्यामुळे सांगु शकत नाही. मात्र तू धोंडोपंत आपटेंचा मेलवरुन सल्ला घेता आला तर बघ. मला तरी ते निष्णात वाटले. दुसरे असे की ते कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास करुन सल्ला देतात, त्यामुळे उत्तर अचूक येऊ शकते.
मला केपीचा उत्तम अनूभव आलाय. साळवींकडे अज्जीब्बात जाऊ नकोस हा कळकळीचा सल्ला.
सिद्धेश्वर मारटकर, विजय जकातदार, विजय केळ्कर,( पत्ते माहीत नाही ) मात्र मृणाल ठकार ( रहाणार सुंदर गार्डन, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) पैकी मृणाल देखील निष्णात आहेत.
मिलिंद चितांबर आजकाल माबोवर दिसत नाहीत. लिंबुटिंबु ( कुठे आहेत देव जाणे )
केदार श्रीराम भटांचे भविष्य खरे ठरत नाहे हा सकाळ आणी पंचांगातलाच अनूभव आहे. बाकी श्री व दा भट हरकत नाही ( श्रीराम भट हे व दांचे चिरंजीव आहेत बहुतेक )
साधनाने नीट सल्ला दिलाय.
बादवे ग्रहांकीत, ग्रहसंकेत
बादवे ग्रहांकीत, ग्रहसंकेत किंवा भाग्यसंकेत या मासिकांमध्ये वरील लेखकांचे पत्ते मिळतील.
मी स्वतः या भानगडीत पडले नाही
मी स्वतः या भानगडीत पडले नाही ; पण `नाडीपट्टी' भविष्य (ऋषी भविष्य ) चा माझा एक ओळखीचा अगदी खंदा पुरस्कर्ता आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला अचुक उत्तरे मिळाली.
.
.
वर बर्याच जणांनी नावे
वर बर्याच जणांनी नावे सुचविली आहेतच
मी वेगळे काय सान्गणार?
येथिल जाणकार सवडीनुसार जरुर मार्गदर्शन करतील.
फक्त प्रश्न फारसा खाजगी स्वरुपाचा नसेल तर http://www.maayboli.com/node/1705?page=37 इथेही देता येईल
(मात्र "जाणकार" तिकडे फिरकत नाहीत याला काम/वेळेच्या बन्धनाबरोबरच, स्वयंघोषित अन्निसवाल्यान्चे तेथिल शाब्दिक हल्ले हे देखिल कारण माझ्यापुरते तरी ठरते)
मिलिंद चितांबर
मिलिंद चितांबर
>>पण अगदीच दिशा दिसत सापडत
>>पण अगदीच दिशा दिसत सापडत नसेल तर .... ज्योतिष्याचा सल्ला घ्यायला हरकत नाही
>>मीही हाच विचार करुन ज्योतिषाचा सल्ला घेते. शेवटी निर्णय काय घ्यायचा ते आपल्यावर असते.
साधना ला अनुमोदन , शेवटी निर्णय आपल्याला चा घ्यायचा आहे.
प्रार्थाना, वि.पु चेक कर.
मायबोली मला यासाठी आवडते.
मायबोली मला यासाठी आवडते. योग्ध मदत चटकन आणि मनापासुन करतात सर्व.
धन्यवाद सर्वांना.
निलिम्स मनापासुन आभार. जाउन आले की कळवेन.
सिद्धेश्वर मारटकर
सिद्धेश्वर मारटकर (शन्वारवाड्याजवळ)- ९८२२०९२२३४
यांची अनेक राजकीय भाकिते खरी ठरली आहेत म्हणे. आमच्या काही मित्रांनाही बरा अनुभव आला होता. यांच्याकडे बर्यापैकी गर्दी असते, शिवाय भविष्य / ज्योतिष / धार्मिक मासिकांतही नियमितपणे लिहित असतात.
(मी स्वतः कधी अनुभव घेतलेला नाही.)
हो सिद्धेश्वर मारटकरांचे
हो सिद्धेश्वर मारटकरांचे भविष्य खरेच ठरते. काही वर्षापूर्वी त्यांनी शिवसेना फुटेल असे भाकीत केले होते, ते दुर्दैवाने खरे ठरले. त्यांनी स्पष्ट शब्दात लिहीले होते की शिवसेनेत भाऊबंदकी होईल
सातारचे नरेन्द्र दाभोळकर
सातारचे नरेन्द्र दाभोळकर म्हणून निष्णात आहेत. त्यांचा नम्बर साधना साप्ताहिकाच्या हपिसात मिळेल...
सातारचे नरेन्द्र दाभोळकर
सातारचे नरेन्द्र दाभोळकर म्हणून निष्णात आहेत.>>> ऑ????
टुन टुन जी विपु बघाल का
टुन टुन जी विपु बघाल का please..
(साळवींकडे चुकुनही जाऊ नकोस,
(साळवींकडे चुकुनही जाऊ नकोस, लूट आहे फक्त)..+१
धन्यवाद सर्वांना. निलम्स
धन्यवाद सर्वांना. निलम्स मनापासून आभार.
विजय पत्वर्धन सर्वोत्तम.
विजय पत्वर्धन सर्वोत्तम.
नमस्कार. ज्योतिष्याचा सल्ला
नमस्कार.
ज्योतिष्याचा सल्ला घेण्यासाठी ओळ्खीचा विश्वासार्ह भविष्यवेत्ता कोणास माहिती आहे का?
स्वतः अनुभव घेतलेले कोणी आहे का ? कौटुंबिक, व्यावसायिक व इतर बाबत योग्य सल्ला
देणारे कोणी आहे का ? कृपया अतिशय निकडिने विचारत आहे. योग्य तो सल्ला / माहिती
द्यावी ही कळकळीची नम्र विनंती. (मुंबईतील धोंडोपंताचा रेफ्ररन्स दिल्यास उत्तम)
धन्यवाद !
दिपकमु, धोंडोपंत- Blog-
दिपकमु,
धोंडोपंत-
Blog- http://dhondopant.blogspot.in/
दिपकमु, मला श्री माळी यांचा
दिपकमु, मला श्री माळी यांचा मला स्वतःला खुप चांगला अनुभव आला.
निलम्स यांनी सुचवले होते. जरूर भेटा
Mr. Sunil Mali
20/1, Near Maharaja Lodge, Somwar Peth, Pune, maharashtra - 411011
Contact
N/A
Phone
020 - 26125866
Mobile
9011728991
मोबाईल वर संपर्क साधायचा असेल तर सकळी ८ ते ९ फोन कर,काका भेटतील आणी वेळ सांगतील.
संदिप एस | आणी प्रार्थना -
संदिप एस | आणी प्रार्थना - सप्रेम नमस्कार,
धन्यवाद सर्वांना, लगेच मदत केलीत. मला मायबोली आवडते.
चटकन मदत आणि मनापासुन करतात सर्व. मनपूर्वक आभार.
पुन्हा एकदा धन्यवाद.
आपला कृपाभिलाषी.
ता क - पंताशी बोलताना आपले नाव रेफरन्स म्हणून सांगितलेले चालेले का?
भविष्यवेत्त्याविषयी अर्थात
भविष्यवेत्त्याविषयी अर्थात ज्योतिषी या व्यक्तीबाबत जी चिकित्सा आपण दाखवत आहात तीच ज्योतिष विषया बद्दलही दाखवा! बाकी शुभेच्छा!
अरविंद पंचाक्षरी आहेत (बहुदा
अरविंद पंचाक्षरी आहेत (बहुदा नाशिक).
अतिशय चांगला अभ्यास दिसून येतो.
तसेच नाशिक मध्येच जकातदार सर आहेत ते ही अतिशय नावाजलेले आहेत.
अत्यंत महागडा परंतु जेव्हा
अत्यंत महागडा परंतु जेव्हा जन्म वेळेबाबत नेमकेपणा माहित नाही अश्यावेळी नाडी ज्योतिष अनुभवाला येते. डांगे चौकात यांचे ऑफिस आहे.
माझी जन्म तारीख वेळ बरोबर असुन मी स्वतः ज्योतीषाचा अभ्यासक असुन नाडीचा अनुभव घेतलाय. " नोकरीमे रुकावट आकर दुर होगी " हे कॅसेट मध्ये २००६ साली रेकॉर्डेड शब्द जे २०१३ सालासाठी होते ते अनुभवास आले आहेत.
चालेल, कालच बोलणं झालय
चालेल, कालच बोलणं झालय त्यांच्याशी...
पुण्यात कोथरुड भागात ज्योतिषी
पुण्यात कोथरुड भागात ज्योतिषी विजय केळकर आहेत.
पण प्रत्यक्ष अनुभव नाही.
कुणाला अनुभव असेल तर त्यांनी माहिती द्यावी.
मिलिंद चितांबर ह्यांचा फोन
मिलिंद चितांबर ह्यांचा फोन नंबर किंवा मेल आयडी मिळेल का?
खुप अर्जंट आहे.प्लीज माहित असेल तर सांगा.
<<मिलिंद चितांबर ह्यांचा फोन
<<मिलिंद चितांबर ह्यांचा फोन नंबर किंवा मेल आयडी मिळेल का?>>
http://www.astromnc.com/ वर एका प्रतिक्रियेत दिला आहे की जरा वाचा कि?
आचरट अन अंधश्रद्धा वाड।विणारा
आचरट अन अंधश्रद्धा वाड।विणारा धागा. शिकलेल्या लोकांचि पण कमाल आहे!
>>>> आचरट अन अंधश्रद्धा
>>>> आचरट अन अंधश्रद्धा वाड।विणारा धागा. शिकलेल्या लोकांचि पण कमाल आहे! <<<

ठीके, मग असे धागे काढूयात का?
१ पुण्यातील विश्वासार्ह डॉक्टर
२ पुण्यातील विश्वासार्ह बिल्डर
३ पुण्यातील विश्वासार्ह वकील
४ पुण्यातील विश्वासार्ह दूधवाला
५ पुण्यातील विश्वासार्ह भाजीवाला
६ पुण्यातील विश्वासार्ह मिठाईवाला
७ पुण्यातील विश्वासार्ह मेडिकलवाला
८ पुण्यातील विश्वासार्ह पोलिसचौक्या
९ पुण्यातील विश्वासार्ह आरटीओ ऑफिसेस/एजन्टस
१० पुण्यातील विश्वासार्ह रेशन दुकान/ रेशन कार्ड कार्यालय
११ पुण्यातील विश्वासार्ह सरकारी ऑफिस
१२ पुण्यातील विश्वासार्ह सहकारी ब्यान्क/पतपेढी
१३ पुण्यातील विश्वासार्ह राजकारणी / नगरसेवक वगैरे
१४ पुण्यातील विश्वासार्ह मॉन्टॅसरी/बालवाडी/शाळा/हायस्कूल/कॉलेज
इत्यादी इत्यादी
अन हे नै पुरले तर शेवटी पुन्हा आहेच शोध......
१५ पुण्यातील विश्वासार्हरित्या नवसाला पावणारा देव अन त्याचे मन्दीर
आचरट अन अंधश्रद्धा वाड।विणारा
आचरट अन अंधश्रद्धा वाड।विणारा धागा. शिकलेल्या लोकांचि पण कमाल आहे!
यात शिक्षणाचा संबंध कुठे आला??
शिकलेले लोकसुद्धा हुंड्यासाठी सुनांना जाळून मारतात
शिकलेले लोकसुद्धा मुलगा मुलगी फरक करतात
शिकलेले लोकसुद्धा मुलगाच हवा म्हणुन गर्भात असतानाच मुलीला मारुन टाकतात
शिकलेले लोकसुद्धा बुवाबाजीवर विश्वास ठेवतात
शिकलेले लोकसुद्धा बाबांच्या नादी लागुन त्यांचे चरणमृत घेतात आणि वर पेपरात असे करतानाचे फोटो छापवुन आणुन आपल्या नादाची जाहिरात करतात....
यातलेच काही शिकलेले लोक ज्योतिषाच्याही नादी लागतात.
>>> यात शिक्षणाचा संबंध कुठे
>>> यात शिक्षणाचा संबंध कुठे आला?? <<<<

अहो, बहुधा त्यान्ना "शिकलेले" म्हणजे तुमच्याआमच्यासारखे मायबोलीवर इथे येऊन टाईपकरुन लिहू शकणारे लोक असे म्हणायचे असेल
मुंबईत कोणी विश्वासार्ह
मुंबईत कोणी विश्वासार्ह ज्योतिषी आहेत का?
धोंडोपंत तर आहेच. पण इतरही कोणांची नावे दिली तर बरे होईल.
गमभन खात्रीनेच सांगते की
गमभन खात्रीनेच सांगते की धोंडोपंत आपटे निष्णात आहेत. वर साधनाने तिचा अनुभव दिला आहेच. पण तुम्हाला मुंबईतच हवे असतील तर डोंबिवलीमध्ये व . दा. भट आहेत. ठाण्यात विजय हजारी आणी सुनिल गोंधळेकर आहेत. हजारी आणी गोंधळेकर तर धोंडोपंतांएवढेच निष्णात आहेत. त्यांची बरीच पुस्तके पण छापुन झालेली आहेत. हजारी धोंडोपंतांचे मित्र आहेत हे त्यांच्या ब्लॉगवर वाचले.
अहो लिंबुजी तुम्ही पण पत्रिका वगैरे बघता का?
Pages