Submitted by प्राजु on 12 July, 2012 - 13:17
तुझ्या शब्दांत जादू खास आहे
उभारी वाटते हृदयास आहे
तुझ्यासंगे खुळा एकांत माझा
किती नटतो पहा सर्रास आहे
नको नात्यास बांधू बंधनी तू
म्हणूया फ़क्त तो सहवास आहे..
'मिळाले जे हवेसे जीवनी या!'
न खात्री, फ़क्त हा अदमास आहे
तुला पाहून 'आलेला' सरीतुन
धरेने टाकला निश्वास आहे
पुढे मृत्यूस पाहुन धस्स झाले
समजले फ़क्त तो आभास आहे
-प्राजु
गुलमोहर:
शेअर करा
व्वाह....
व्वाह.... सुरेख्,भावस्पर्शी,तरल गझल.
नको नात्यास बांधू बंधनी
नको नात्यास बांधू बंधनी तू
म्हणूया फ़क्त तो सहवास आहे.. >> आह! क्या बात है!
तुझ्यासंगे खुळा एकांत
तुझ्यासंगे खुळा एकांत माझा
किती नटतो पहा सर्रास आहे
>>>
छान
छान गझल
छान गझल
मस्त गझल, आवडली........
मस्त गझल, आवडली........
झक्कास
झक्कास !!
मस्तच............... मूड फ्रेश गझल!!
अगदी तुझ्याच शब्दात सान्गायचे तर .....
तुझ्या शब्दांत जादू खास आहे
उभारी वाटते हृदयास आहे......!!
तुला पाहून 'आलेला' सरीतुन
धरेने टाकला निश्वास आहे>>>>>>>>>>>.......मला हाशेर बेहद आवडला ....... "क्या बात!! " गुणिले ३.
(उन्हामुळे तापलेल्या धरणीतून पुरेसा पाउस पडून गेल्यावर "वाफसा" निघतो हा निघाल्यावरच पेरणी करता येते वाफसा निघेपर्यंत वाट पहावी लागते
इथे तू निश्वास असे म्हणालीस आणि माझ्या डोळ्यापुढे हे चित्र जसेच्या तसे उमटले बघ !!)
मृत्यूचा शेरही छान ...............
________________________________
तुझ्यासंगे खुळा एकांत माझा
किती नटतो पहा सर्रास आहे
>>>>>>>>>>>
बदल सुचतो आहे ..............अगदी सहजच बरका ..........नेहमीप्रमाणे !!
तुझ्यासंगे खुळा एकांत माझा
असा नटतो जसा मधुमास आहे
धन्यवाद !!
मस्त गझल प्राजु
मस्त गझल प्राजु
मनापासून आभार! व वै कु...
मनापासून आभार!
व वै कु... आपला शेरही (बदल सुचवलेला) आवडला.
व वै कु>>>>>>>>>> अगं प्राजू
व वै कु>>>>>>>>>>:P
अगं प्राजू वै. व. कु. असं आहे गं ते .........................(:राग:)
श्री.'वै' हे श्री'व' यांचे सुपुत्र आहेत............... श्री.'व' हे श्री.'वै' यांचे नव्हेत !!!:हहगलो:
