Submitted by सुधाकर.. on 9 July, 2012 - 11:25
नाते तुझे नि माझे नाही खरोखरीचे
धर्माचे कर्म वेडे मानू बरोबरीचे.
येणे ही एकट्याचे जाणे ही एकट्याचे
गीतेत ज्ञान आहे सावळ्या श्रीहरीचे
येथे कुणी न बंधू सखा कुणी ना आता
नात्यात वैर झाले सार्या घरोघरीचे.
माझ्या तुझ्यात आता पडली कशास छाया?
कि, अंतर सांगते ती आता दरी दरीचे.
ओळख काय सांगू कसली तुला कुणाची,
काहीच नाव नसते स्वप्नातल्या परीचे.
कसा सोडवू गुंता माझ्या तुझ्या मनाचा?
झाले किती प्रयत्न माझ्या परोपरीचे.
विसरून दु:ख थोडे गझलेत या रमावे
घ्यावे भरुन प्याले माझ्या सुधाकरीचे.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
नाते तुझे नि माझे नाही
नाते तुझे नि माझे नाही खरोखरीचे>>>
माझ्या तुझ्यात आता पडली कशास छाया?>>
काहीच नाव नसते स्वप्नातल्या परीचे.>>>
वा, चांगल्या ओळी
तुम्ही वृत्तात लिहू शकता हे मी मागेच म्हणालेलो होतो, आता गंमत खूप झाली
थँक्स बेफिजी.. मनापसुन
थँक्स बेफिजी.. मनापसुन धन्यवाद.
वाह मस्तच........ छानच
वाह मस्तच........
छानच लिहीता आपण........ _____/\______
छानच लिहीता आपण........
छानच लिहीता आपण........ >>>>>:अओ:
_____/\______ >>>>>>:(
योगुली : ऑर्फीला जमत नाही निदान तुम्हीतरी एक वाचक म्हणून ...जमल्यास गझलेबाबतचे सामान्य ज्ञान वाढवावे ....
विनन्ती /आग्रह नाही .....राग मानू नये .......गैर समज नसावा....धन्यवाद!!
योगुली : ऑर्फीला जमत नाही
योगुली : ऑर्फीला जमत नाही निदान तुम्हीतरी एक वाचक म्हणून ...जमल्यास गझलेबाबतचे सामान्य ज्ञान वाढवावे ....
विनन्ती /आग्रह नाही .....राग मानू नये .......गैर समज नसावा....धन्यवाद!!
.......... हे हे हे हे ....वा रे वैभू वा तुला फक्त 'वैभू' म्हणन्याने तू इतका जळतोस कि, स्वत:च लंगोट जळालेलंही तुला कळत नाही. तुझ्या गझलेत विठ्ठल फक्त नावाला आहे. तशी अवघ्या पंढरीत तुला कुत्र्याची
ही किंमत नाही. हे आज मला कळले.
ऑर्फिअसराव, आता जरा बदल
ऑर्फिअसराव,
आता जरा बदल म्हणून वृत्तबद्ध गझलही येऊ द्या की.
श्री. विदिपा ...धन्यवाद, मी
श्री. विदिपा ...धन्यवाद, मी तसा नक्कीच प्रयत्न करीन. फक्त आपले असे प्रोत्साहन पाटीशी राहू द्या.
फक्त आपले असे प्रोत्साहन
फक्त आपले असे प्रोत्साहन पाटीशी राहू द्या>>>
प्रोत्साहन पाठीशी ठेवतो ऑर्फीअसराव, पाटीशी माझाच काही संबंध नाही
विदिपा आपन विनोदी आहात. मी
विदिपा आपन विनोदी आहात. मी आपल्या विपू मध्ये काही लिहीतो आहे उत्तर द्या?
मला(म्हणजे माझ्या
मला(म्हणजे माझ्या सदस्यत्वाला) विपू नाही... इथेच लिहा
स्वारी विदिपा आपला 'विपु'
स्वारी विदिपा आपला 'विपु' अंडर प्रोटेक्शन आहे. तेंव्हा तुम्ही बेफिकीर यांच्या विपु मधील माझा प्रश्न वाचावा ही विनंती.
धन्यवाद विदिपा. मी तसे
धन्यवाद विदिपा. मी तसे प्रतिसादामध्ये त्यांना लिहीले ही आहे. तरी पण पुढे मागे मायबोलीवरील या कविंना काही प्रोटेक्शन असायला हवे होते असे मला वाटते इतकेच.
.......... हाहा हे हे हे हे
.......... हाहा हे हे हे हे ....वा रे वैभू वा स्मित तुला फक्त 'वैभू' म्हणन्याने तू इतका जळतोस कि, स्वत:च लंगोट जळालेलंही तुला कळत नाही. तुझ्या गझलेत विठ्ठल फक्त नावाला आहे. तशी अवघ्या पंढरीत तुला कुत्र्याची
ही किंमत नाही. हे आज मला कळले.>>>>>>>>>>>>>>>>
ओर्फी : मी उत्तर द्यावे म्हणत होतो पण काय करू रे मला तुझी कीव येते बघ तू फार म्हणजे फार निर्बुद्ध आहेस रे..............!!
असाच रहा .........:)
'वैभू'... मी निर्बुध्द आहे हे
'वैभू'... मी निर्बुध्द आहे हे समजण्यास तुला इतका वेळ लागला यावरूनच तुझं बुध्दीवैभव दिसतं.