Submitted by सुधाकर.. on 8 July, 2012 - 11:16
आज तरी कुणी जरा इकडे लक्ष देईल काय?
शकूनीच रक्त पुन्हा विमल करता येईल काय?
जिथे तिथे उभेच हे, मही- रावण- दुर्योधन
राम कॄष्ण बुध्दाला इथे जगता येईल काय?
अहिल्याच्या शिळेला आज देखिल वाटते भिती
साधुवानी रावण, रुप राघवी घेईल काय?
तुटलेली ही नाती आणि फाटलेली ही मनं
दुभंगल्या आकाशी आत्मा तरी जाईल काय?
प्रश्नांचीच पिशाच्च नाचतात माझ्या भोवती
कोणी मला त्यांची चोख उत्तरे देईल काय?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खयाल मस्त आहेत रे
खयाल मस्त आहेत रे ऑर्फी,
अभिनन्दन .........
मनापासून धन्यवाद वैभवजी.
मनापासून धन्यवाद वैभवजी.
वैभवजी.>>>>>>???? अरे दचकलो
वैभवजी.>>>>>>????
अरे दचकलो ना मी..........!!
तू मला नेहमीप्रमाणे 'वैभू'..च म्हण
धन्यवाद 'वैभू'.
धन्यवाद 'वैभू'.