अस्वस्थ

Submitted by कावळा on 14 June, 2012 - 11:27

खरंय तुझं...
अशक्य आहे आपलं जमणं.
आपण सोबत आहोत खरं....
पण रेल्वेरुळासारखे.....
समांतर....................
सोबत असूनही एकमेकांना कधीच न भेटणारे..
क्रॉसिंगवर भेटूनही न भेटल्यासारखं करुन थेट पळू लागणारे....

कशाला आणि का भेटायचं याची ओढंच उरली नाही आता...
दुनिया लाख सांगते,
इकडे जा...
तिकडे जा...
इकडे वळ..
तिकडे वळ...
ज्याला जिथे पाहिजे,तिथे वळू दे
आपण का वळा?

- कावळा

अपघात झाला कि होईल भेट तुम्हा दोघांची(म्हणजे दोन रुळांची), आणि मग तुमची गाडी जाऊदे रुळावरून जोरात, डबे वाढवत वाढवत...

गझलेशिवायही तखल्लुस इतका अप्रतीमपणे वापारता येतो याचा साक्षात्कार झाला

वाह कावळेराव वाह

>>>>>>>>>>>>>>>
ज्याला जिथे पाहिजे,तिथे वळू दे
आपण का वळा?

Happy सही

चिखल्या आणि वैभव, मी तुमचा भरपूर आभारी आहे.>>>>काव काव काव काव असे आभार मानायचे कावळ्यानी.
कावळ्याची काव काव म्हणजे चिमनीची गझल्,आवडेश.

ज्याला जिथे पाहिजे,तिथे वळू दे
आपण का वळा?>>>>काय वळवलीत भाव...झक्कास.