गझल
गगन ठेंगणे जणू जाहले, हसायचो मी अशा त-हेने!
वाटावे आभाळ फाटले, रडायचो मी अशा त-हेने!!
गुन्हा कुणीही करो, परंतू, मलाच शिक्षा दिली जायची!
गुन्हाच वाटायचा जगाला, चुकायचो मी अशा त-हेने!!
प्रथम पंख अन् नंतर माझे पाय छाटले गेले दोन्ही;
बिनपंखांचा! बिनपायांचा!.....फिरायचो मी अशा त-हेने!!
देहाने मी एक दिशेला, मन माझे दुस-याच दिशेला;
सहकार्यांच्या घोळक्यांमधे असायचो मी अशा त-हेने!
जगणे माझे, सरणावरचे जळणे होते...कुणा न कळले!
धूर न कोठे, आग न कोठे, जळायचो मी अशा त-हेने!!
दोष कुणाला कशास देवू? आयुष्याने मला झुलवले!
भास वाटचालीचा व्हावा, झुलायचो मी अशा त-हेने!!
सशाप्रमाणे कोणी धावे, कासवापरी कोणी चाले;
जीवन जैसी शर्यत आहे, जगायचो मी अशात-हेने!
कुणा वाटले औषध होते! कुणा वाटले वीषच होते!
उक्ती माझी अशीच होती! भिनायचो मी अशा त-हेने!!
प्रकाश वाटत गेलो! नाही, भेदभाव कोठेही केला;
सूर्य ढळावा सूर्यास्ताला, ढळायचो मी अशा त-हेने!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
दोष कुणाला कशास देवू?
दोष कुणाला कशास देवू? आयुष्याने मला झुलवले!
भास वाटचालीचा व्हावा, झुलायचो मी अशा त-हेने!!
कुणा वाटले औषध होते! कुणा वाटले वीषच होते!
उक्ती माझी अशीच होती! भिनायचो मी अशा त-हेने!!>>>
शेर आवडले
काही सानी मिसरे विशेषकरून
काही सानी मिसरे विशेषकरून त्यातल्या कल्पना आवडल्या.
उदा.
भास वाटचालीचा व्हावा, झुलायचो मी अशा त-हेने
गुन्हाच वाटायचा जगाला, चुकायचो मी अशा त-हेने
वगैरे..
काही शेरांत भटसाहेबांचा प्रभाव स्पष्ट जाणवण्याइतका दिसतो.
मला जे म्हणायचय तेच बेफीजी
मला जे म्हणायचय तेच बेफीजी आणि विदिपा आधीच म्हणले आहेत..............
असो
गझल मस्त आहे सर. आवडली.
अनेक शेर अप्रतिम, आवडली गझल
अनेक शेर अप्रतिम, आवडली गझल
बेफिजी व विदिपांना अनुमोदन..
बेफिजी व विदिपांना अनुमोदन..
काही खयाल खुपच आवडले... धन्यवाद...
आवडली गझल.
आवडली गझल.
छान गझल....आवडली
छान गझल....आवडली
अवान्तर : देवसर आपला एखादा
अवान्तर : देवसर आपला एखादा गझल्सन्ग्रह प्रकशित झाला आहे काय?
नसेल तर का नाही अजून ?:राग:.......(:()
(असेल तर मला "सप्रेम भेट" म्हणून मिळेल काय?...म्हणजे फुकटात मिळेल काय ...!!:अओ:)
मी आज सहज तुमचे माबोवरचे "समग्र देवपूरकर"(............:D 'लेखन'.हो...!) वाचत होतो
इतक्या कमी काळात तब्बल ४७-४८ रचना आपण प्रसिद्ध केल्यात तर आपल्या एक गझलकार म्हणून असलेल्या प्रदीर्घ (आपल्या प्रतिसादाप्रमाणेच लाम्बलचक ....;) ) कारकीर्दीत किती गझला तयार झाल्या असतील याचा विचार करून थक्क झालो
थट्टा म्हणून नव्हे तर आपुलकी म्हणून विचारत आहे
उत्तर द्यावे वाटत असेल तर जरूर देणे वाट पाहीन
आपला नम्र
वैवकु
__________
आणि काय हो देवसर ; मला सांगा ....थट्टा केली तरी काय झालं ?आपुलकी वाटते म्हणूनच माणूस थट्टा कारायचं "धाडस" करतो ना ????