Submitted by वैवकु on 1 July, 2012 - 12:48
स्वप्नांच्या दुनियेवरती सत्यांचा खडा पहारा
सौख्यांचा भूलभुलैया दुःखांनो चकरा मारा
यंदाही अमच्याइकडे पाऊस फिरकला नाही
आला अन भेटुन गेला नुसताच मोसमी वारा
मी उदास असतो तेंव्हा मी उगाच हसतो वेडा
वाटते मला -'हसले की... लाभतो मनास उबारा!'
ती मला म्हणाली होती तू गेल्यावर येइन मी
मी अजून जगतो आहे..... श्वासांनो बंद पुकारा
गझलेत असावी जादू जी कळू नये कोणाला
बघणारी नजर म्हणावी वाव्वा रे जादूगारा
. . . . . . . . . . . . . . .
सोमवार ते रविवारी मी मलाच भेटत नाही
माहितीच नव्हते त्याला विठ्ठल आलेला दारा
गुलमोहर:
शेअर करा
मी उदास असतो तेंव्हा मी उगाच
मी उदास असतो तेंव्हा मी उगाच हसतो वेडा
वाटते मला -'हसले की... लाभतो मनास उबारा!'
ती मला म्हणाली होती तू गेल्यावर येइन मी
मी अजून जगतो आहे..... श्वासांनो बंद पुकारा
गझलेत असावी जादू जी कळू नये कोणाला
बघणारी नजर म्हणावी वाव्वा रे जादूगारा
>>>
चांगले व व्यवस्थित शेर
शेवटची ओळ - बघणारी नजर म्हणावी वाव्वा रे जादूगारा - ही ओळ विशेष आवडली
उगाच हासणे , उबारा - मस्तच
बंद पुकारा ही कल्पनाही मस्तच
अभिनंदन व शुभेच्छा
-'बेफिकीर'!
(मतला व दुसरा शेर जरा अधिक बोलके करता यावेत असे वाटते)
यंदाही अमच्याइकडे पाऊस फिरकला
यंदाही अमच्याइकडे पाऊस फिरकला नाही
आला अन भेटुन गेला नुसताच मोसमी वारा.... मला स्वतःला असे शेर फार आवडतात.. वरच्या ओळीत अजून सफाई हवी होती.
फु.स. द्यायला काय जाते
पु.ले.शु!
बेफीजी व शामजी : या गझलेत
बेफीजी व शामजी :
या गझलेत नेमक्या कोणत्या गोष्टी जमून आल्या आहेत कोणत्या नाहीत यावर विचार करतच होतो इतक्यात आपले प्रतिसाद वाचले; त्यामुळे मला पडलेल्या प्रश्नावर नेमक्या दिशेने विचार करून उत्तर शोधायला मला फार मदत होणार आहे
आपले मनःपूर्वक आभार
मतल्यात जमेल तसा बदल केला आहे..............
स्वप्नांच्या दुनियेवरती सत्यांचा खडा पहारा
सौख्यांचा भूलभुलैया दुःखांनो चकरा मारा
दुसर्या शेरात नेमका कुठे बदल करावा हे सुचत नाही आहे तरी प्रयत्न चालू आहेत..........
आपले पुनःश्च आभार
-आपला कृपाभिलाषी
वैवकु.
श्वासांनी बंद पुकारुन ती
श्वासांनी बंद पुकारुन ती आल्यावर काय फायदा ?
गझलकारला जादुगार म्हटल्यवर गझलकार कोणाला जादुगाराला म्हणायचे ?
हातोडा >>> ७ तास ३५
हातोडा >>> ७ तास ३५ मिनिटे.................मा. बो. वर स्वागत
प्रतिसादासाठी धन्यवाद
'गझलेत असावी जादू जी कळू नये
'गझलेत असावी जादू जी कळू नये कोणाला
बघणारी नजर म्हणावी वाव्वा रे जादूगारा'
क्या बात...सुरेख...
'अमच्याइकडे' हे थोडेसे खटकले......कृगैन.
बाकी गझल आवडली..
शुभेच्छा.
मस्त सुंदर गझल...........
मस्त सुंदर गझल...........
वैभव, गझल म्हणावी अशी ही तुझी
वैभव,
गझल म्हणावी अशी ही तुझी पहिलीच गझल आहे. छानच, अजून येऊ द्या.
वैभव ,योगुली धन्यवाद
वैभव ,योगुली धन्यवाद !!
कणखरजी विशेष आभार ...........अनेक दिवसांनी तुमचा प्रतिसाद आलेला पाहून किती बरे वाटते आहे म्हणून सांगू.......!!!
अप्रतिम गझल.. काही किरकोळ
अप्रतिम गझल..
काही किरकोळ गोष्टी खटकल्या. जसं की -
'सत्यांचा', 'सौख्यांचा' >> अनुस्वार अनावश्यक.
अमच्याइकडे >> अमुच्याइकडे केल्यास ??
बट ॲज आय सेड, हे अगदीच किरकोळ ! गझल जाम आवडली. एकदम सफाईदार वाटली.
फरमायिश - आता एक मुरद्दफ गझल हवी आहे. (रदीफ असलेली 'मुरद्दफ'च ना?)
सुपर्ब!! मोसमी वारा... मस्त!
सुपर्ब!!
मोसमी वारा... मस्त!
रणजित , प्राजु ...धन्स अ
रणजित , प्राजु ...धन्स अ लॉट!!!
_____________________________________________
रणजितराव :एक मुरद्दफ गझल बर्याच दिवसापासून करून ठेवली आहे पण ती कधी प्रकाशित करायची हा निर्णय आधीच घेतला आहे .अजून ती वेळ आली नाहीय.............. .
एखादी नवी गझल सुचलीच तर लगेचच इथे प्रकाशित करीनच
तुमच्या शुभेच्छा अशाच माझ्या पाठीशी असू द्यात
वैभवजी, गजल अथ पसून इति
वैभवजी,
गजल अथ पसून इति पर्यंत अप्रतीम. सुरेख खयाल. मजा आली.
आवडली
आवडली
निशिकान्त काका ,मयेकर
निशिकान्त काका ,मयेकर साहेब....धन्यवाद !!
>>गझलेत असावी जादू जी कळू नये
>>गझलेत असावी जादू जी कळू नये कोणाला
बघणारी नजर म्हणावी वाव्वा रे जादूगारा<<
या शेरातील "वाव्वा रे जादूगारा" हे उच्चारायला छान वाटते.
वैभवजी मस्त गझल.
प्र.का.टा.आ.
प्र.का.टा.आ.
" ती मला म्हणाली होती तू
" ती मला म्हणाली होती तू गेल्यावर येइन मी
मी अजून जगतो आहे..... श्वासांनो बंद पुकारा " क्या बात है!!!
स्वप्नांच्या दुनियेवरती
स्वप्नांच्या दुनियेवरती सत्यांचा खडा पहारा
सौख्यांचा भूलभुलैया दुःखांनो चकरा मारा
छानच वैभव..रचना आवडली.दुसर्या ओळीत काहीच खटकले नाही.
वेताळ २५ ,गणेश जी, भारती ताई
वेताळ २५ ,गणेश जी, भारती ताई धन्यवाद
______________
भारती ताई :आता दिसते ती दुसरी ओळ पहिलेवाली नाही आहे . पहिली दुसरी ओळ वेगळी होती .
बेफीजीनी बदल करायला सुचवले म्हणून बदलली आहे. ती पहिले अशी होती ............ (ती पहिली दुसरी ओळ पहिल्या ओळीसोबत लिहितो आहे )...........
स्वप्नांच्या दुनियेवरती सत्यांचा खडा पहारा
सौख्यांच्या आशेवरही दुःखांचा बसतो सारा
सारा = टॅक्स
आताच एक नवीन शेर सुचला आहे
आताच एक नवीन शेर सुचला आहे .संपादित करत आहे
सोमवार ते रविवारी मी मलाच भेटत नाही
माहितीच नव्हते त्याला विठ्ठल आलेला दारा
(नेहमी प्रमाणे हाही विठ्ठलावर आहे . मला माहीत आहे कित्येक जणांना मी सारखेसारखे विठ्ठलाचे शेर करतो ते आवडत नाही .........पण मला कंट्रोल करणे जमत नाही आहे
..........तरी प्लीज माझी व्यथा समजून घेणे ही कळकळीची विनंती .
आपला कृपाभिलाषी
-वैवकु )
त्याला म्हणजे कोणाला नीट कळले
त्याला म्हणजे कोणाला नीट कळले नाही..तुम्ही?पुंडलीक? आणि विठ्ठल उर्मीत ओशाळण्यासारखे काय?
(खरच) आवडली पुलेशु
(खरच) आवडली
पुलेशु
नानुभौ :(खरच)धन्यवाद
नानुभौ :(खरच)धन्यवाद
_____________
भारतीताई :धन्यवाद
त्याला म्हणजे विठ्ठलाला माहीत नव्हते.... असे !
पुंडलीकाला/मला म्हटल्यावर नेमका अर्थ लागत नाही आहे.
सोमवार ते रविवारी मी मलासुद्धा भेटत नाही(.........मी खूप बिझी असतो ना म्हणून :)!!) मग त्याला कुठून भेटणार ?.... विठ्ठलाला हे माहीत नव्हते तो माझ्या दरी आलेला मला भेटायला .......पण मी त्याला परत पाठवले (...मोकळ्या हाती!!)
म्हणून म्हटले आहे.............
सोमवार ते रविवारी मी मलाच भेटत नाही
माहितीच नव्हते त्याला विठ्ठल आलेला दारा
विठ्ठल उर्मीत ओशाळण्यासारखे काय ?>>>>>>>>>>>>>.
-याचा अर्थ नाही समजला ताई मला. क्षमस्व .
सुंदर गझल....
सुंदर गझल....
अरविंदजी धन्यवाद
अरविंदजी धन्यवाद