------- ऑफिसमध्ये संध्याकाळी बसलो होतो.....
वेळ संपल्यानंतर एक-एक मेंबर गोळा झाले गप्पा मध्ये पावसाळी पिकनिकचा विषय निघाला .......
अचानक बेत ठरला .....माथेरानला जायच ठरल .....कुणालाच काही माहीती नव्हतं......पनवेलवरून जाता येत इतकच माहीती होतं...सुट्टीच्या दिवशी खुप गर्दी असते म्हणून ....रजा टाकून कामाच्या दिवशी जायचं ठरलं....दिवस ठरला शुक्रवार दि.२९.०६.२०१२
पनवेलला एका मित्राच्या घरी जमायचं ठरलं होतं..त्याप्रमाणे सकाळी ८:३० ला जमलो त्याच्या घरी नाष्टा केला...नेरळ पर्यंत गाडी करून जायच होत...तिथून पुढे चालत जायचं ..गाडी ठरवून निघालो. आम्हाला काही माहीती नसल्यामुळे आम्ही त्या ड्रायव्हरवर भरवस्यावर होतो.तिच आमची मोठी चूक ठरली. त्याने आम्हाला अर्ध्या तासाने एका गावात नेऊन सोडले .गावाचे नाव होते "धोदाणी" ....गावात चौकशी केली त्यांनी एक रस्ता दाखवला इकडून तासाभरात पोहचाल असं सांगितलं..सकाळी सगळे जोशात होते निघालो......
प्रचि ०१ --अशी झाली सुरवात.....
प्रचि 02 – वाटेत नदी लागली (ओढा) ..कोरडाच होता...
प्रचि 03 – दहा मिनिटात सगळे दमले..........
प्रचि 05 –फोटोत खाली घरे दिसतात ते ते धोदाणी गाव...तिथून सुरवात केली होती...
प्रचि 06 – हाच तो ग्रुप...(मी सोडून)
प्रचि 14 – मध्येच एक शिवाजी महाराजांचे मंदीर होते....
बाकी पुढील भागात.........
पिकासा लिंक वर बरेच प्रचि
पिकासा लिंक वर बरेच प्रचि आहेत.
लिहिता लिहिता धागा चुकून प्रकाशीत झाला असावा अस वाटत... असो....
धागा पुर्ण झाला की येतो परत प्रतिसाद द्यायला
खुप छान...........
खुप छान...........
मानस, तुम्ही नेरल मार्गे गेला
मानस, तुम्ही नेरल मार्गे गेला असतात तर बरे पडले असते.... धोदाणी मार्गे जाणे म्हणजे हालत खराब होते. पूढे पूढे तर एकदम सरळ चढण आहे...
सुंदर आहेत फोटो. मला
सुंदर आहेत फोटो. मला आवडले.
खास करून फोटो क्र. ४
माथेरानला पोचलात कि नाही ?,
माथेरानला पोचलात कि नाही ?, तो रस्ता पूर्ण झाला नव्हता, त्यावेळी त्या परीसरात भटकलो होतो आम्ही. गाढेश्वराचे देऊळ, गाढी नदीवरचे धरण दिसले का ?
दा.... अडीच तास पायपिट
दा....
अडीच तास पायपिट केल्यावर पोहचलो वरती....पोहचल्यावर खुपच मजा आली....
अगदी अविस्मरणीय.......
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्तच फोटो.
मस्तच फोटो.