Submitted by श्यामली on 30 June, 2012 - 07:07

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
केळ्याचे वेफर्स
उकडलेला बटाटा
जिरंपूड
मीठ
तिखट
दही
साखर
खजूर चटणी
बटाटा शेव
क्रमवार पाककृती:
उकडलेला बटाटा कुस्करुन त्यात थोडंस मीठ, जीरंपूड घालून नीट मिसळून घ्यावा.
दही फेटून त्यात थोडी साखर मीठ घालून घ्यावं
आता केळ्याचे वेफर्स एका ताटलीत मांडून घ्यावेत.
त्यावर वर मिक्स करुन घेतलेला बटाटा मावेल एवढा ठेवावा त्यावर सारखं केलेलं दही घालावं त्यावर खजूर चटणी घालावी त्यावर बटाटा शेव घालावी.
दही बटाटा पुरी तयार
वाढणी/प्रमाण:
माणशी ७-८ तरी
अधिक टिपा:
उपासचं गोड खाऊन वैताग आल्यामुळे लेकीनी केलेला उद्योग.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उद्योग आवडला करून
उद्योग आवडला
करून पाहण्यासारखी कृती
धन्यवाद
(खजुर चटणीने आणखीन छाम लागेल हे नक्की)
मस्तच!
मस्तच!
छान! ट्रायला हरकत नाही! चाट
छान! ट्रायला हरकत नाही!
चाट मसाला वापरायला हरकत नसावी
त्यात सगळे उपवासाचेच पदार्थ असतील
आमचूर, जीरपूड इत्यादी
अरे वा! मस्त उद्योग
अरे वा! मस्त उद्योग

पुदिना-कोथिंबीर-मिरचीची तिखट चटणीही चालेल फराळी द.ब.पु. वर... करायला हवी कधीतरी
छान.
छान.
मस्त आहे ही आयडीया. मी उपास
मस्त आहे ही आयडीया. मी उपास करत नाही पण हे करुन बघायला हरकत नाही.
मस्तच ग श्यामली.
मस्तच ग श्यामली.
मस्त आणि सोप्पी कृती आहे.
मस्त आणि सोप्पी कृती आहे. करून बघायला हवी एकदा.
(No subject)
मस्त आहे पाककॄती शामले.
मस्त आहे पाककॄती शामले. असा कधी विचारच नव्हता केला
वेल डन देविका 
श्यामली, पाककृती आवडली. नक्की
श्यामली, पाककृती आवडली. नक्की करुन बघेन.
श्यामली, छानच आहे लेकीचा
श्यामली, छानच आहे लेकीचा प्रयोग. माझी लेकही आता स्वयंपाकघरात उपद्व्याप करत असते. तिला सांगेन ही रेसीपी.
साती - तुमचा प्रतिसाद हार्श वाटला. इथे सर्व प्रकारच्या रेसिपीज येतात, जड, तेलकट, तुपकट, आणि हेल्दी. ही काही हेल्दी रेस्पी म्हणून सांगितली नाहीये. तुमची मतं वेगळा लेख लिहून मांड्लीत तर.
तुमच्या लेखमाला वाचल्यात, तुम्ही अधिकाराने माहितीपूर्ण लिहू शकाल. पण इथला प्रतिसाद विसंगत वाटला.
मनःपूर्वक धन्यवाद लोकहो
मनःपूर्वक धन्यवाद लोकहो
मी दही बटाटा पुरी फॅन आहे.
मी दही बटाटा पुरी फॅन आहे. नक्की करून बघीन. मुलांचे प्रयोग मस्त होतात कधी कधी. माझ्या नणंदेच्या मुलाने
असं काही चिकन बनवले होते ती चव मी इतक्यावर्शात कधी खाल्ली नव्हती. तो आगाऊ रेसीपी पण देत नाही.
श्यामली मस्तच रेसीपी.... एकदम
श्यामली मस्तच रेसीपी.... एकदम सोपी..स्वयंपाक घरात "आई मला दे ना काही तरी बनवायला" म्हणत लुडबुडणार्या छोटुल्यांसाठी तर बेस्ट आहे. तुमच्या लेकीचं कौतुक करा माझ्यातर्फे
खजुर चटणी कशे करतात पण?
खजुर चटणी कशे करतात पण?
श्यामली, देविकाला माझ्याकडुन
श्यामली, देविकाला माझ्याकडुन शाब्बास! रेसिपी छान आहे. मी आले की मलाही बनवुन दे म्हणावं!
भारी आहे! लेकीला धन्यवाद.
भारी आहे! लेकीला धन्यवाद.

मंजूडी +१. तिखटाऐवजी ती चटणीही चालेल.
जीवन खाण्यासाठी आहे, उपवासाला उपवासाचे पदार्थ खाऊन दुसर्या दिवशी लंघन करावे.
श्यामली मस्त रेसीपी. तुमची
श्यामली मस्त रेसीपी. तुमची मुलगी कल्पक आहे. अभिनंदन सांगा.
श्यामली, कल्पक आहे लेक फोटो
श्यामली, कल्पक आहे लेक
फोटो टाकायला हवा होता!
तेव्हा चिल !
साती, कमॉन, मला वाटते कायमच डॉक्टरच्या चष्म्यातून बघायला नको . मान्य करू की तळकट पदार्थ जड असतात पचायला इ. .. पण कधीतरी चालते की . वडापाव, पकोडे, पॅटिस, चीजकेक, चिप्स , फ्राइज असले अनहेल्दी पण टेस्टी पदार्थ ( ते झेपतील अशा तरुण वयात तरी?) कध्धीच खायचे नाहीत की काय
श्यामले, लेकीचं माझ्यातर्फेही
श्यामले, लेकीचं माझ्यातर्फेही कौतुक. खरंच इनोवेटिव्ह आहे हे.
जल्ला ! ते सा.खि., दाण्याची आमटी खाण्यापेक्षा हे बरंच बरं. एका प्लेटसाठी ६ केळावेफर्स पोटात जाणार फक्त. बटाटा शेवही भुरभुरवण्याजोगीच. एक मिडियम बटाटा पुरेसा आहे. बाकिच्या घटकांमध्ये हार्मफुल काहीच नाहिये. त्यामुळे एक प्लेट करुन खाण्यात तसं काही अनहेल्दी वाटत नाहिये.
साती, तुझा मुद्दा समजला गं. पण त्या लेकराच्या कल्पकतेला दाद आहे ही
आणि श्यामली तिला जास्त तुपकट, तेलकट खाणं कसं प्रकृतीला वाईट आहे हे सांगत असेलच.
अरे खजुराची चटणी कशी करतात
अरे खजुराची चटणी कशी करतात सांगा ना
मला उद्या ही रेसीपी ट्राय करुन पहायचीये आई साठी
व्वा ... छान आहे पाककृती.
व्वा ... छान आहे पाककृती. उपास नसला तरी करुन खाउ. पाककृतीच्या अभिनवतेकरीता/कल्पकतेकरीता खास अभिनंदन.
रिया इथे
रिया इथे बघ
http://www.maayboli.com/node/3593
मंजु वरची चटणीवाली कृती सार्वजनिक कर गं, सर्चमध्ये सापडत नाही.
रिया, तु आ.पा. ची सभासद नसशील तर धागा दिसणार नाही. असे झाल्यास हे बघ -
खजुराची चटणी :
१ वाटी खजुर
१ वाटी गूळ
पाऊण वाटी चिंच
३ चमचे धने-जिर्याची पावडर
चवीला मीठ, आवश्यकतेनुसार साखर, लाल तिखट
क्रमवार पाककृती:
खजुराची चटणी :
खजुर आणि चिंच १ तास पाण्यात भिजत ठेवावे. भिजत घातल्यामुळे खजुराच्या बिया सहज निघतील. त्यात गूळ मिसळून हातानेच एकत्र कुस्करावे. मग मिक्सरमध्ये थोडे थोडे मिश्रण घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट एका गाळण्यातून गाळून घ्यावी लागेल. कारण मिक्सरमधून वाटून घेतलं तरी चिंचेचे दोरे आणि खजुराची सालं राहतातच. मग गाळलेल्या पेस्टमध्ये धने-जिर्याची पावडर व मीठ घालावे. चवीनुसार हवे असल्यास साखर आणि लाल तिखट घालावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.
मी वरची चटणी एकदा गरम करुन थोडी आटू देते.
उद्या चटणी करुन झाली की निवांतपणे आ. पा. ची सभासद हो.
साधना, उपासाला चिंच चालते
साधना, उपासाला चिंच चालते किंवा चालेल? आणि गूळ? कधी वापरताना बघितल्याचं आठवत नाही.
नाही, मी खजुराची चटणी दिली,
नाही, मी खजुराची चटणी दिली, उपासाची खजुर चटणी नाही
उपासाला गुळ चालायला हरकत नसावी. उपासाचे रताळ्याचे स्विट करतो त्यात साखर असते, मग गु़ळही चालेल की. चिंचेचे डाऊटफुल आहे.. कधी उपासाच्या पदार्थात वापरली नाही.
सायो, आमच्याकडे उपासाला चिंच
सायो, आमच्याकडे उपासाला चिंच आणि गूळ दोन्ही चालते. सुरणाच्या भाजीत / भेंडीची ताकातली उपासाची भाजी करायची असल्यास चिंचच घातली जाते. वरीच्या तांदळाची खिचडी ( ओगले आजींनी दिलेल्या कॄतीने केल्यास ) गूळ घातला जातो. गेले ८० वर्षांची ही परंपरा मला माहित्ये. माझी पणजी सुद्धा वर उल्लेखलेले पदार्थ तसेच करत असे. तिचा जन्म १९०४ सालचा होता. म्हणजे तिने लहानपणापासून तसेच बघितले होते. त्याच्या आधीचे माहित नाही
गूळ चालतो. दाणे आणि गूळ
गूळ चालतो. दाणे आणि गूळ एकत्र मिक्सरला लावून तूपाशिवाय लाडू होतात. दाण्याच्या आमटीत किंवा वरीतांदुळात आमसूल घालतात पण चिंचेचं माहित नाही. पण बहुतेक चालत असावी. काही जण सुरण उपासाला खातात. त्याचा खाजरेपणा जाण्यासाठी चिंच घालत असतीलच.
रीया, आहारशास्त्र आणि पाकृत
रीया, आहारशास्त्र आणि पाकृत मेधा याम्चाही एक विविध चटण्यांचा धागा आहे बघा. जर तुम्ही त्या ग्रूपचे सदस्यत्व घेतले नसेल तर घेऊन सर्च करा.
शब्दखूणामध्येही चटणी हेडिंगखाली दिल्या आहेत या चटण्या!
श्यामली, कल्पकतेबद्दल लेकीला
श्यामली, कल्पकतेबद्दल लेकीला शाब्बासकी
मंजूडी म्हणते तसं कोथिंबीर, मिरचीची तिखट चटणी घालून मस्तच लागेल.
Pages