Submitted by सुधाकर.. on 29 June, 2012 - 06:30
लेखणीच्या या तलवारीने झुंजायाला शिकलो मी.
नशिबाशी या भांडायाला कधीच नाही थकलो मी.
जगण्याच्या या जुगारात ही किती भेटले छक्के-पंजे
ठगांच्या त्या कुट नितीला कधीच नाही चकलो मी.
आजही पडल्या उघडया येथे तू दिलेल्या जख्मा
आळ येऊनी अपराधाचे कधीच नाही लपलो मी.
एकाकी मज पाहून कधी आली वादळे अंगावरती
तक्त मोडले जिद्दीचे ना कधीच नाही खचलो मी.
एकच होते गुपित माझे आज सांगतो तुला,
जगूण मरणे भोगताना खुल्या दिलाने हसलो मी.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
एकच होते गुपित माझे आज सांगतो
एकच होते गुपित माझे आज सांगतो तुला,
मरणाचे हे भोग भोगता खुल्या दिलाने हसलो मी. >>>> क्या बात है.....
थँक्स शशांकजी.
थँक्स शशांकजी.
मस्त्..........छान
मस्त्..........छान जमलीये........
थँक्स योगुली ...
थँक्स योगुली ...
बरी आहे
बरी आहे
_____________________________
____________________________________________________________
लेखणिच्या या तलवारीने झुंजायाला शिकलो मी.
नशिबाशी या भांडभांडलो कधीच नाही थकलो मी.
जगण्याच्या या जुगारात छक्के-पंजे भेटले किती
फसव्यांच्या त्या कूटनीतिला कधीच नाही चकलो मी.
उघडया पडल्या जखमा बघ सगळ्या आता , ज्या दिल्यास तू
दुःख सोसले हसतमुखाने कधीच नाही लपलो मी.
एकाकी मज पाहून आली कधी वादळे अंगावर
तक्त मोडले जिद्दीचे ना ...कधीच नाही खचलो मी.
एकच होते गुपीत माझे आज सांगतो ऐक तुला,
जगून मरणे भोगत असता खुल्या दिलाने हसलो मी.
____________________________________________________---
फसव्यांच्या: वृत्तासाठी शब्दात बदल केला फक्त.
दुसरा चपखल शब्द घाई घाई मुळे सुचला नाही
ठळक अक्षरातली ओळ अख्खी.बदलली........... मूळ ओळीचा अर्थ काही खास वाटला नाही म्हणून...............
बाकी जागी फक्त मात्रा जमून याव्यात म्हणून बदल केलेत ते जुजबी आहेत
पुढच्या वेळी मदत करणार नाही ..........नाहीतर तुम्हाला सवय लागेल मग तुम्ही स्वतः कधी शिकणार अशानं ...नाही का .??????
वैभवजी - आपलाही पर्यायी
वैभवजी - आपलाही पर्यायी प्रयत्न चांगला आहे. मात्र गझलेच्या ओळी- ओळीतील ठेका ती, नजाकत कुठल्या कुठे हरवली आहे. बाकी मतला तेवढा ठिकठाक केलात. त्यात ही लेखणी चा (णि) चुकला आहे.
धन्यवाद.