पावसाळ्यात वसईकडे उगवणारी भाजी "मोरस".पाने जाड व लांबट आकाराची,देठ जाडसर लाल असते.पान मीठासारखे क्षार-युक्त लागते.गुजराती लोकांत कुमारीका मुली "उमा-महेश"चे ५ दिवसाचे अलुणे-व्रत करतात.म्हणजे मीठ खायचे नाही.तेव्हा या भाजीचे पराठे ,भाजी व भजी "हल्लीच्या मुली "करुन खातात. असे त्या म्हातार्या गुजराती भाजीवालीने सांगितले वरुन आम्ही नाही हो आमच्या वेळी असे काही खाल्ले.आम्ही बिनमिठाच्या भाकरी बरोबर दुध,दही खायचो.पण या हल्लीच्या मुली.......... वगेरे,वगेरे .
"मोरस" पालेभाजी अशी दिसते.जागु ला माझ्यापेक्षा या भाजीविषयी जास्त सांगता येईल.
मोरस भाजी.
बारीक चिरलेला कांदा.
बारीक चिरलेला हिरवी मिरची व लसुण.
१ चमचा मोहोरी-जिरे.
हळद व हिंग.
तेल -फोडणीसाठी.
पालेभाजी चिरुन घ्या.
तेलाची नेहमीसारखी फोडणी करा.
कांदा,मिरची ,लसुण परतुन ,हिंग-हळद घालुन नेहमीसारखी पालेभाजी करा.
हिरव्या मिरचीचाच वापर करायचा आहे.
नेहमीची धनेजिरे पुड,गरम मसाला ,गुळ घालायचे नाही.
त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे नेहमीच्या सवयीनुसार मिठ अजिबात घालायचे नाही.कारण मोरस ची पाने खारट लागतात.
म्हातार्या गुजराती भाजीवालीने सांगितलेल्या स्टोरी मुळे ही भाजी आणली.बाकी औषधी -गुणधर्म वगेरे काही असतील तर जागु सांगेलच.
अशीच एक खरट भाजी आहे..ती
अशीच एक खरट भाजी आहे..ती खाडीजवळ येते म्हणे आणि ती भाजी लुसलुशीत काड्यांसारखी अस्ते. जागू तुला नाव माहीत आहे कां?? वरणात टाकून बनवतात. स्लर्प.....
सुलेखा ही समुद्र भाजी आहे.
सुलेखा ही समुद्र भाजी आहे. आमच्याकडे ह्याला डायला म्हणतात. खाडीच्या कडेवरील जमीनीवर ही भाजी उगवते. समुद्राच्याच पाण्यावर हिचे जीवनमान असल्याने पाने पुर्ण खारट असतात. ह्याच्या वड्याही करतात. तसेच डाळीमध्ये, कोलंबी मध्येही घालतात. काहीजण ह्याचा खारटपणा कमि करण्यासाठी आधी पाण्यातून उकडूनही काढतात व पिळून घेतात. पण त्यापेक्षा मिठच टाकू नये किंवा कमी टाकावे हे चांगले. लहानपणी मला ही नुसती पाने खायला पण आवडायची. माझ्या ऑफिसच्या रस्त्यावर खाडी लागते तिथे खुप उगवलेली असते ही भाजी एकदा मी तिथुनही काढून नेली होती.
ही माझी पाकृ :
http://www.maayboli.com/node/17745