Submitted by pallo on 26 June, 2012 - 02:34
मला इंग्लिश बोलायला शिकायचे आहे.. मला येत पण confidence कमी असल्यमुळे मी इंग्लिश मध्ये बोलत च नाही.. . मी कशी शिकू.. इंग्लिश बोलायला तेच काळत नाही...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुलीशी बोलायला सुरूवात करा.
मुलीशी बोलायला सुरूवात करा. लवकरच तीच तुम्हाला शिकवायला लागेल. इंग्रजी बातम्या ऐकणे, डिस्कवरी, कार्टुन चॅनेल एकत्र बघणे इ. करू शकता. शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट!
_/\_ पल्लवी........ मुलीशी
_/\_ पल्लवी........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुलीशी बोलायला सुरुवात कर, आणि आतापासुनची तीची पुस्तके वाचण्याचा सराव ठेव, यासाठी वाचन कर, कारण शब्दसंपत्ती शिवाय बोलायला कॉन्फीडन्स येणार नाही..........सो जे जे ईंग्रजीमधुन येईल ते वाचायला आणि ईंग्रजी बातम्या तसेच मुलखती लक्षपुर्वक ऐकण्याने आणि त्यातील समजलेले शब्द रोजच्या बोलण्यातुन वापरल्याने बराच फायदा होतो. तसेच घरी टाटा स्काय असेल तर कार्टुन ईंग्रजी भाषेतुन (त्यात भाषा बदलण्याची सोय असते) तीला बघु देत व तुही बघ...... याने नक्कीच फायदा होईल............कारण सम्रुध्द शब्दसंग्रहाशिवाय confidence येत नाही........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला खूप खूप शुभेच्छा........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मराठी माणसाच्या हा फारच
मराठी माणसाच्या हा फारच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, काहीनाकाही कारणाने एक प्रकारचा न्युनगन्ड, आपले काही चुकेल की काय, चुकले तर काय होईल वगैरे मुळे इन्ग्रजी बोलण्याचे टाळले जाते, अन हा न्युनगन्ड बहुधा केवळ इन्ग्रजी पुरताच मर्यादित अस्तो, अन्य भाषान्चेबाबतीत हा प्रश्न तितकासा येत नाही असे मला वाटते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अत्यन्त मर्यादित शब्दसन्ख्या ज्ञात असणे हा दुसरा अडथळा.
अन जे बोलायचे, ते आधी मराठीमधे वाक्याची जुळवाजुळव करुन मग त्याचे इन्ग्रजीत भाषान्तर करण्याचा अन तोन्डातुन वदण्याचा महाभयानक ताण मेन्दुला देऊन अपेक्षित परिणाम मिळेस्तोवर, ज्याकरता जे बोलायचे, ते बोलण्याची वेळच टळून गेलीये असे समजल्याने अधिक गोन्धळायला होते हा माझा पूर्वीचा अनुभव. सबब, मराठी ते इन्ग्रजी हे भाषान्तर टाळण्याचे सुरु करावे, व जो काही विचार करायचा, तो त्या त्या भाषेत सुरु केलात, तर सरावाने सहज वाक्यरचना जमु शकते.
माझ्यापुरता मी एक खास उपाय केला की , आहे ना आपले इन्ग्रजी कच्चे? असुदे, नै ना पाचवी सहावीत अभ्यास केला पुरेसा? नसुदेत, पण आत्ता जरी वाढिव वयाचे झालो तरी काय हरकते तोच अभ्यास पुन्हा करायला? कशाला अन कुणाला लाजायचय? सबब मी लहान मुलान्ची इन्ग्रजीतली चित्रान्सहितची "कॉमिक्स" वाचायला सुरुवात केली. बाजुला डिक्शनरी. अन लहान मुले कशी मोठमोठ्याने गाणीबिणी म्हणतात, तसे खणखणीतपणेच वाचायचे, उगाच मनातल्या मनात तुम्ही जगातली सर्व ग्रन्थसम्पदा वाचलीत, तरी जोवर नरड्याला अन जीभेला उच्चारान्चे वळण लावत नाही, छातीचा भात्या हवेने "बोलण्याच्या कष्टाकरता" भरुन घेत नाही, तोवर मुखाने इन्ग्रजीच काय, पण मातृभाषाही धडपणे बोलली/उच्चारली जाणार नाही हे निश्चित.
सबब, जे करायचय, त्याचाच नेमका सराव करा. पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा तर पळण्यचाच सराव हवा. पोहायचे असेल तर पाण्यातच उतरले पाहिजे, काठावर आडवे झोपुन उपयोग नाही, तसेच, इन्ग्रजी (वा कोणतीही) भाषा बोलायची असेल, तर आधी ती मोठ्याने उच्चारून वाचायला सुरु करा. जीभेला वळण पडूद्यात.
असो.
नेटाने प्रयत्न करा, छोटी छोटी वाक्ये, कविता, धडे, धडाधड्ड मोठ्याने वाचू लागा. सन्वादाचे काल्पनिक प्रसन्ग मनात रन्गवताच इन्ग्रजीमधे रन्गवायला सुरुवात करा म्हणजेच इन्ग्रजीत विचार करा, त्यातिल सन्वाद इन्ग्रजीत ठरवा, इन्ग्रजी बातम्या ऐका, न्युजपेपर मोठ्याने वाचा, अडलेला प्रत्येक शब्द डिक्शनरीत पाहून समजुन घ्या, लक्षात ठेवा, नैमित्तीक गरजान्ची वाक्यरचना/शब्द माहित करुन घ्या. माझ्यामते, इन्ग्रजी इतकी बोलायला सोप्पी भाषा दुसरी नाही.
{अन हे सगळे जरी केले, तरी "घरादाराचे" इन्ग्लण्ड/अमेरिका करु नका.
पोर इन्ग्रजी माध्यमात गेली म्हणजे तिची युरोप/अमेरिकेत पाठवणी करण्याच्याच तयारीप्रमाणे तिला आमुलाग्र इन्ग्रजही बनवु नका
}
नैतर आहेच मग, अजुन पाचपन्चवीस वर्षात, युरोप अमेरिकेतिल नव्हे तर भारतातील, अगदी पुण्यनगरीतीलही "क्वचित" कोणीतरी असेच मायबोलीवर येईल, अन विचारेल, की मला "मराठीत" बोलायला शिकायचे आहे, कसे बोलू?
युरोप अमेरिकेतिल नव्हे तर
युरोप अमेरिकेतिल नव्हे तर भारतातील, अगदी पुण्यनगरीतीलही "क्वचित" कोणीतरी असेच मायबोलीवर येईल, अन विचारेल, की मला "मराठीत" बोलायला शिकायचे आहे, कसे बोलू?<< +११
<< अन लहान मुले कशी
<< अन लहान मुले कशी मोठमोठ्याने गाणीबिणी म्हणतात, तसे खणखणीतपणेच वाचायचे, उगाच मनातल्या मनात तुम्ही जगातली सर्व ग्रन्थसम्पदा वाचलीत, तरी जोवर नरड्याला अन जीभेला उच्चारान्चे वळण लावत नाही, छातीचा भात्या हवेने "बोलण्याच्या कष्टाकरता" भरुन घेत नाही, तोवर मुखाने इन्ग्रजीच काय, पण मातृभाषाही धडपणे बोलली/उच्चारली जाणार नाही हे निश्चित.>>
मस्त ! एकदम पटलं.
बाकी शुभेचछा. वर चांगले उपाय लिहिले गेलेच आहेत.
वावावा! लिंबाजीराव, थोडक्यात
वावावा!
लिंबाजीराव, थोडक्यात अन नेमके मांडलेत.
>>अन जे बोलायचे, ते आधी मराठीमधे वाक्याची जुळवाजुळव करुन मग त्याचे इन्ग्रजीत भाषान्तर करण्याचा अन तोन्डातुन वदण्याचा महाभयानक ताण मेन्दुला देऊन अपेक्षित परिणाम मिळेस्तोवर, ज्याकरता जे बोलायचे, ते बोलण्याची वेळच टळून गेलीये असे समजल्याने अधिक गोन्धळायला होते हा माझा पूर्वीचा अनुभव. सबब, मराठी ते इन्ग्रजी हे भाषान्तर टाळण्याचे सुरु करावे, व जो काही विचार करायचा, तो त्या त्या भाषेत सुरु केलात, तर सरावाने सहज वाक्यरचना जमु शकते.<<
१००% सहमत.
जी भाषा बोलता आहात, तिच्यातच विचार करा, हीच खरी गुरुकिल्ली आहे.
अन मुख्य म्हणजे लाजू नका. इंग्रजी आपली मातृभाषा नाहीच. तिच्यात चुकल्याने कुणीही आपल्याला फासावर लटकवीत नाही.
इंग्लीश शिकणे वाईट नाही, पण
इंग्लीश शिकणे वाईट नाही, पण येत नाही म्हणुन त्याचा न्युनगंड नका बाळगु .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी उपाय वरती दिलेच ....
लिम्बुजीना + १११११ सुरेख उपाय
लिम्बुजीना + १११११
सुरेख उपाय सांगीतले. माझ्या सासुबाई ( वय ६६). नेटाने इंग्लीश शिकल्या. त्या मराठीतुन बी.ए. आणि बी.एड. केलेल्या आहेत. शिक्षिका होत्या. इंग्रजी लिहा वाचायची सवयच न्हवती. मग त्यांनी एका क्लास ला नाव घातले आणि प्रयत्न केले. मी त्यांना रोज एक परिच्छेद डिक्टेशन घालते. आणि मुलगी आणि मी विचारलेल्या प्रश्णांना कटाक्षाने इंग्रजीतच उत्तरे द्यायची अशा तर्हेने आम्ही खुप सराव केला.
आता त्यांना कॉम्पुटर वर टायपिंग शिकवले आहे. त्या मुळे मुलीची पुस्तके वापरुन त्या रोज एक पान लिहितात. तसेच आठवड्यात मी त्यांना ३ टॉपिक देते ज्या वर त्यांनी नीदान ५-७ मिनीटे भाषण करायचे असते. हे गेले ८-९ महिने चालु आहे. पेपर पण वाचतात.
पहिले पहिले सासर्यांनी खुप ...म्हणजे खुपच टिंगल केली. पण नंतर त्यांना फायदा कळु लागला.
तसं पाहिलं तर आता ह्या वयात त्या कोणाशी बोलायला जाणार आहेत इंग्रजी? पण त्यांना स्वतः ला इच्छा होती आणि त्यांच्या स्वतः च्या साठी ते गरजेचं त्यांना वाटलं म्हणुन मी आणि माझ्या ५-६ वीतल्या मुलीने त्यांचा "अभ्यास" घेतला. आता त्या बर्या पैकी इंग्रजी बोलु शकतात. फोन वर तर चांगल्याच बोलतात. थोडा बुजरेपणा आहे , पण ठीक आहे.
लिम्बुजी एकदम सहमत. इंग्रजी
लिम्बुजी एकदम सहमत.
इंग्रजी आपली मातृभाषा नाहीच. तिच्यात चुकल्याने कुणीही आपल्याला फासावर लटकवीत नाही + १००
मोहन कि मीरा - खूप अवडलं. सासुबाईंची जिद्द आणि ती पुर्ण करायला तुमची साथ.
मीरा सहीच !!
मीरा
सहीच !!
>> सबब, जे करायचय, त्याचाच
>> सबब, जे करायचय, त्याचाच नेमका सराव करा. पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा तर पळण्यचाच सराव हवा. पोहायचे असेल तर पाण्यातच उतरले पाहिजे, काठावर आडवे झोपुन उपयोग नाही, तसेच, इन्ग्रजी (वा कोणतीही) भाषा बोलायची असेल, तर आधी ती मोठ्याने उच्चारून वाचायला सुरु करा. जीभेला वळण पडूद्यात. <<
@लिंबू जी
व्वा! व्वा! क्या बात है!
एकूणच योग्य सल्ला दिलात..
व्वा! लिंबाजीराव, थोडक्यात अन
व्वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिंबाजीराव, थोडक्यात अन नेमके मांडलेत.>>>>>>>>>>>+१
मोहन कि मीरा - खूप अवडलं. सासुबाईंची जिद्द आणि ती पुर्ण करायला तुमची साथ.>>>>>>+१
मोकीमी ... भारी आवडलं.
मोकीमी ... भारी आवडलं. तुमच्या साबांचं आणि तुझंही कौतुक!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>> आता त्यांना कॉम्पुटर वर
>>> आता त्यांना कॉम्पुटर वर टायपिंग शिकवले आहे. <<<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोहनकिमीरा, अहो मग आता त्यान्ना मायबोलिची ओळखही करुन द्या
माझ्या उत्तराबद्दल प्रतिसाद दिलेल्या सर्वान्चे आभार
पण त्या उत्तरात "ग्यानबाची मेख" आहे ती अशी की हे असे लिहीण्या/वागण्यापुरते कळण्यास वयाची पन्नाशी गाठावी लागली, तेच जर दहापन्धरा वर्षे वयाचे अस्ताना उमगले अस्ते तर? कुणी सान्गायला भेटले अस्ते तर? दुर्दैवाने, तेव्हा शब्दान्च्या स्पेलिन्गा नि अर्थ पाठ करा या घोकंपट्टीशिवाय अन्यप्रकारे शिकवलेच जात नव्हते, अन व्याकरण शिकवणारे जे असत, ते इतक्या रूक्षपणे शिकवायचे की बस्स! मूळात व्याकरणाचा "कार्यकारणभावच" कधी न उमजल्याने, माझे सर्वच भाषा विषय कच्चेच राहिले
असो.
अरे इंग्रजी उत्तम यायला
अरे इंग्रजी उत्तम यायला पेन्डसे गुरुजी आणि त्यांचे ते 'ब्रम्हास्त्र' म्हनजे शिमटी च हवी ! काय बिशाद इंग्रजी येत नाही. ? पण आम्ही त्या नर्मदेतही कोरडेच राहिलो हो... पेंडसे गुरुजीही नि:प्रभ झाले माझ्यापुढे ! आमचेही इंग्रजी बोम्बललेच हो... गुरुजी म्हणतात 'तू माझे 'वाटर्लू' आहेस"
लिम्बू, दोन्ही पोस्ट आवडल्या
लिम्बू, दोन्ही पोस्ट आवडल्या आणि पटल्या.
मीरा, मस्तच!
रीडर्स डायजेस्ट वाचणे,
रीडर्स डायजेस्ट वाचणे, सिनेमे, बातम्या बघणे, उत्तम इंग्रजी साहित्य वाचणे. हे करता येइल
सगळेच प्रतीसाद उत्तम. माझे
सगळेच प्रतीसाद उत्तम.
माझे काका (वडिलांचे आतेभाउ ) कै. त्र्यंबकराव पाठ़क हे वर्ध्यातील उत्तम इंग्रजी शिक्षक होते. मी १० वी ला येईपर्यंत ते रिटायर झाले होते. ७५-७६ नंतर रिटायर झाल्यावर ते शिकवण घेत . ते वर्गात शिकवताना आठवड्यातुन ४ दिवस टेक्स्टबुक व २ दिवस अवांतर म्हणजे पेपर रिडिंग , डिक्टेशन , बोलायला लावणे असे प्रकार करवुन घ्यायचे. जो काही थोडा फार विश्वास आला तो त्यामुळेच असे वाटते.
सोलापुरला कॉलेजमध्ये मराठी मुलांमध्ये कॉंप्लेक्स जाणवायचा , त्यावेळी त्यांना दाखवुन द्यायचो की सेंट जोसेफ्स ची वर्गातील काही मुले बिनधास्त चुकीचे बोलायचे (म्हणजे चक्क आय ड्रिन्क सिगारेट ) पण जो कॉन्फीडंस असायचा तो मात्र लाजवाब.
आजही , माझा जनरल सेक्रेटरी जेव्हा बोलत असतो त्यावेळी न ऐकलेला एखादा नविन शब्द मी टिपुन घेतो व डिक्शनरी रेफर करतो . त्यावेळी (मीटिंगमध्ये) त्याचा अर्थ लागतो पण ह्या सवयीने तो शब्द लक्षात रहातो .
मराठी माणसे इंग्रजी विनाकारण
मराठी माणसे इंग्रजी विनाकारण फास्ट बोलतात. इतर कोणीही इंग्रजी मातृभाषा असणारे देखील अं... अं....अं.... करीतच बोलतात. अगदी इंग्रजी प्यानेल डिस्कशनमध्ये देखील सावकाश तुटक तुटक .. विचार करत थाम्बत च बोलतात.काहीजण 'यूनो...' चे सदस्य असतात शब्द आठवला नाही की 'धिस थिंग , दॅट थिंग ...' असे बिनधस्त घुसडतात. आपल्याला विनाकारण वाटते असे आपण बोलले की ते फ्लुएन्ट इंग्रजी समजले जाणार नाही. फ्लुएन्ट इंग्रजी असणे उत्तमच पण त्याशिवाय फारसे अडत नाही. अत्र्यांचे भाषेत सांगायचे म्हणजे श्रोते महामूर्ख आहेत असे समजून बोलावे म्हनजे धारिष्ट्य येते.:)
. माझं तर अगदी बारीक लक्ष असतं मग आमच्याकडे अगदी हास्यस्फोट होतो.
दुसरी एक गम्मत अशी की दृक श्राव्य माध्यमातून इंग्रजी चर्चेत कोनताही प्रश्न विचारला की समोरची उत्तर देणारी व्यक्ती ' वेल्....अशी सुरुवात करते भलेही त्याला पुढे ते खोडायचे का असेना.मात्र मराठी चर्चात काही ही प्रश्न विचारला की ' नाही नाही...' 'तसं नाही....' अशी सुरुवात बर्याच्दा केली जाते . तुम्ही अगदी पाळत ठेउन बघा
ते 'फाड फाड' इंग्लिशवाले
ते 'फाड फाड' इंग्लिशवाले महादेव कोकाटे कुठे गेले हो? ३ महिन्यापासून त्यानी फाड फाड इंग्लिश बोलण्याचा पिरिएड १० मिनिटांपर्यन्त आनला होता. ' माय नेम इ़ज बाळू ' असे वाक्य शिकवून ते विद्यार्थ्याकडून वदवून घ्यायचे अन म्हणयचे आलं की नाही तुला १० मिन्टात इंग्लिश बोलता?
पेन्डसे गुरुजी मला म्हणत ' अरे ठोम्ब्या इंग्लंड अमेरिकेतील अशिक्षीत माणसेही इंग्रजी बोलतात आणि एक तू...." आणि मग ते त्यांच्या शिमटीची सर्व्हिसिंग करायला लागत..:)
पेन्डसे गुरुजी मला म्हणत '
पेन्डसे गुरुजी मला म्हणत ' अरे ठोम्ब्या इंग्लंड अमेरिकेतील अशिक्षीत माणसेही इंग्रजी बोलतात आणि एक तू...." <<
बाजो साहेब,
हीच गम्मत आपण लक्षात घेत नाही.
इंग्लंडात झाडूवाला इंग्रजी बोलतो खरे, पण त्याला मराठी, हिंदी, थोडीफार संस्कृत अन बर्याचदा एकादी लोकल बोलीभाषा - कोकणी, वर्हाडी, अहिराणी इ. या ज्या 'एक्ष्ट्रा' भाषा येतात त्या/तश्या अजिब्बात येत नाहीत. सेकंड्/थर्ड्/फोर्थ किंवा फिफ्थ लँग्वेज म्हणून आपण इंग्रजी शिकतो आहोत, तेंव्हा ती बोलताना मला ही पण येते असा अहंगंड हवा. न्यूनगंड नाही.
. तर मला प्रकर्षाने जाणवते कि
. तर मला प्रकर्षाने जाणवते कि मी तिच्या शी पण घरी थो थोड इंग्लिश बोलायला पाहिजे पण सुरुवात कशी करू.>>> केवळ हेच कारण असेल इंग्लिश बोलायला शिकायचे तर काहीच गरज नाही. ती आपोआपच इंग्लिश बोलणार आहे खूप चांगली. उलट तिच्याशी मराठीच बोलत राहा, नाहीतर तिचे मराठीच कच्चे राहील.
इतर कोणत्याही कारणाने शिकायचे असेल तर काहीच प्रश्न नाही, पण मूळ पोस्टवरचे हे वाक्य वाचून हे सांगावेसे वाटले.
फार एन्डाचे म्हणणे मला पटते.
फार एन्डाचे म्हणणे मला पटते. आमची दोन्ही बालके इंग्रजी माध्यमात होती . आम्ही त्यांच्याशी चुकुनही इंग्लिश बोललो /बोलत नाही . (आमचे दिव्य व्हिक्टोरियन इंग्लिश हेही त्याचे कारण आहे ही झाकली मूठ). मात्र गावकडील अस्सल गावरान भाषा त्यांचेशी न चुकता बोलतो. तेही त्यातील 'आगळे वेगळे' शब्द ऐकून उत्सुकतेने त्यांचे अर्थ विचारून घेतात. त्यामुळे गावाकडचे लोक आले तरी त्यांचेशी ते 'डायलॉग' करू शकतात. एरवी त्यांच्या कॅम्पात ते अस्खलित इंग्रजी अथवा हिन्दी बोलतातच...
तसेच पल्लू यानी स्वतःची एनरिचमेन्ट म्हणून इंग्रजी अवश्य शिकावी . पण मुलीचे इंग्रजी सुधारण्यासाठी प्रयोजन नाही असे मलाही वाटते...
सगळ्न्या धन्यवाद . "तर मला
सगळ्न्या धन्यवाद .
"तर मला प्रकर्षाने जाणवते कि मी तिच्या शी पण घरी थो थोड इंग्लिश बोलायला पाहिजे पण सुरुवात कशी करू.>>> केवळ हेच कारण असेल इंग्लिश बोलायला शिकायचे तर काहीच गरज नाही. ती आपोआपच इंग्लिश बोलणार आहे खूप चांगली. उलट तिच्याशी मराठीच बोलत राहा, नाहीतर तिचे मराठीच कच्चे राहील.
इतर कोणत्याही कारणाने शिकायचे असेल तर काहीच प्रश्न नाही, पण मूळ पोस्टवरचे हे वाक्य वाचून हे सांगावेसे वाटले."
मला स्वतःला पण इंग्लिश फारस बोलता येत नाही.. म्हणून पण शिकायचे आहे. त्या सठी मला सोपे मार्ग अजून काही असतील तर नक्की सांगा.
तसेच मामी, योगुली आणि limbutimbu यांना thx तुम्ही सांगितलं आहे त्या प्रमाणे मी आता हळू हळू तशी सवय लावते स्वतःला.
>>> मराठी माणसे इंग्रजी
>>> मराठी माणसे इंग्रजी विनाकारण फास्ट बोलतात. <<< बाजो, या आख्ख्या पोस्टला अनुमोदन, इब्लिसा, तुझ्याही पोस्टला अनुमोदन, दोघान्नाहि गुण दिलेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनुमोदन
फारेण्ड, तू काढलेला मुद्दाही पटतोय
हसुरे सरानी लिहिलेली झटपट
हसुरे सरानी लिहिलेली झटपट वाक्य रचना ( ४० रु) आणि झटपट इंग्लिश स्पीकिंग ( २०० रु) ही पुस्तके घ्या. अतिशय सुरेख आहेत.
पल्लो तुमचं इंग्लीश
पल्लो
तुमचं इंग्लीश माझ्यासारखंच कच्चं असेल तर मुलीशी इंग्लिशमधे बोलल्याने तिचं इंग्लीश बिघडेल असं नाही का वाटत ? तिच्या कानावर जी भाषा पडू द्यायची असेल ती उत्तमच असावी.
तुमचं इंग्लीश शिकणं चालूच ठेवा. मुलीचा अभ्यास घेता येत असेल तर घ्या. त्यासाठी इंग्लीश बोलायची गरज नाही. तुमच्या मिस्टरांना मात्र वेळात वेळ काढून तिच्याशी इंग्लीशमधे बोलायला सांगा. दोघांपैकी कुणालाच इंग्लीश बोलणे जमत नसेल तर मग वेगळे उपाय करून पहा.
शक्य असल्यास तिला ज्या ट्युशनमधे फक्त इंग्लीश बोलले जाते तिथे पाठवावे. हे पण तिच्यावर ताण येत नाही हे पाहून. ट्युशनच्या टीचरना कशासाठी पाठवताय ही कल्पना द्या. खरं तर बाऊ करू नये हेच ठीक राहील. शाळेत तिला येईलच बोलायला...
सांज्संध्या आपल्याला
सांज्संध्या आपल्याला धन्यवाद.
मी माझ्या पोस्ट मध्ये मला इंग्लिश शिकायचं आहे अस लीहील आहे... ते पण मुलीसाठी, त्यामूळे तीच इंग्लिश माझ्या मूळे बिघडेल असा वाटत नाही. आणि ते बिघडू नये याची मी काळजी पण घेईन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"हसुरे सरानी लिहिलेली झटपट वाक्य रचना ( ४० रु) आणि झटपट इंग्लिश स्पीकिंग ( २०० रु) ही पुस्तके घ्या. अतिशय सुरेख आहेत. " हे पुस्तके कुठ मिळतील जरा सांगितलं बर होईल .
शालेय पुस्तके मिळतात अशा
शालेय पुस्तके मिळतात अशा कोणत्याही दुकानात मिळू शकतील.
पुस्तके वाचून किन्वा
पुस्तके वाचून किन्वा क्लासला जाऊन ईग्रजी बोलता येणार नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बोलायला शिकायचे आहे तर बोलायलाच पाहिजे.
कोणीतरी उत्तम ईन्ग्रजी बोलता येणारी मैत्रिण पकडा. आणि तिच्याबरोबर रेग्युलर जमेल तसे ईग्रजी बोलत जा , मुद्दमून वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारा. अगदी कीतीही चुकले तरी. त्याचबरोबर तिला वेळोवेळी तुमच्या चुका दुरुस्त करायला सांगा.
.
.
पल्लो तुम्हाला स्वतःसाठी
पल्लो
तुम्हाला स्वतःसाठी इंग्लीश बोलायला शिकायचे आहे कि मुलीशी बोलण्यासाठी हे ठरवा. मुलगी मोठी असेल तर प्रॉब्लेम नाही...
@ किरण मला स्वतःसाठी इंग्लिश
@ किरण
मला स्वतःसाठी इंग्लिश शिकायचे आहे.
कोणीतरी उत्तम ईन्ग्रजी बोलता
कोणीतरी उत्तम ईन्ग्रजी बोलता येणारी मैत्रिण पकडा >>> अगदी उत्तम सल्ला.
माझी एक अस्सल हिंदीभाषिक मैत्रीण होती. तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात यायचं, की आपलं हिंदी किती कामचलाऊ आणि धेडगुजरी आहे. ७-८ वर्षं आम्ही एकत्र होतो. तेवढ्या कालावधीत माझं हिंदी प्रचंड सुधारलं.
+१ अश्विनिममि,
+१ अश्विनिममि,