गोभी टकाटक आणि पुदिनावाले आलू गोभी (टर्बन तडका, फूड फूड चॅनेल)

Submitted by स्वप्ना_राज on 19 June, 2012 - 06:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पुदिनावाले आलू गोभी साठी:

तेल, हिंग, जिरे, पांढरे तीळ, आल्याचे लांब तुकडे (ज्युलियन्स), हिरवी मिरची, बटाटे, कॉलीफ्लॉवर, हळद, आमचूर पावडर, १ वाटी (पुदिना + कोथिंबीर) वाटण, ७-८ चेरी टॉमेटोज, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ

गोभी टकाटक साठी:

तेल, जिरे, एक मध्यम कांदा (पातळ लांब चिरून), १ टेस्पून आलं लसूण पेस्ट, एक मध्यम टोमॅटो, हळद, जिरेपावडर,अर्धा कप दही, तेलात तळलेले फ्लॉवरचे तुकडे, १ टीस्पून चिली सॉस, पाव हिरवी ढोबळी मिरची, मीठ

क्रमवार पाककृती: 

मंडळी,

ह्या पाककृती फूड फूड चॅनेलवरील टर्बन तडका ह्या कार्यक्रमात दाखवल्या होत्या. करून पाहिल्या, आवडल्या. पुदिनावाले आलू गोभीची रेसिपी ५-६ माबोकराना पाठवली होती. काही जणांनी करून पाहिली, त्यांना आवडली. त्यांच्या आग्रहावरून इथे कॉपीपेस्ट करत आहे.

पुदिनावाले आलू गोभी:

२ चमचे तेल गरम करा. त्यात हिंग, जिरे, पांढरे तीळ, आल्याचे लांब तुकडे (ज्युलियन्स), उभी चिरलेली हिरवी मिरची घाला. परता. ३ बटाट्याच्या मध्यम फोडी आणि एका फ्लॉवरचे तुकडे घाला. हळद, आमचूर पावडर आणि मीठ घाला. झाकण लावून १५ मिनिटं शिजवा. त्यात १ वाटी (पुदिना + कोथिंबीर) वाटण घाला. ७-८ चेरी टॉमेटोज आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला. गरम सर्व्ह करा.

गोभी टकाटक:

२ चमचे तेल तापवा. त्यात १ टीस्पून जिरे, एक मध्यम कांदा (पातळ लांब चिरून), १ टेस्पून आलं लसूण पेस्ट, एक मध्यम टोमॅटो (बारीक चिरून) घाला. परता. हळद, जिरेपावडर घाला, मिक्स करा, अर्धा कप दही घालून मिक्स करा. तेलात तळलेले फ्लॉवरचे तुकडे घाला. १ टीस्पून चिली सॉस, पाव हिरवी ढोबळी मिरची (बारीक चिरून परतून) घाला. मीठ घाला.

माहितीचा स्रोत: 
फूड फूड चॅनेलवरील टर्बन तडका हा कार्यक्रम
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्साह टिकल्यास बल्लवाचार्य संजीव कपूर ह्यांनी सुचवलेली http://www.sanjeevkapoor.com/keoti-dal-teenpatti-foodfood.aspx करून पहाणे. मला तरी आवडली.
घबाड, पाकृ इथे देण्याचं आधी लक्षात आलं नव्हतं त्यामुळे फोटो नाहीत.

स्वप्ना मी पुदिनावाले आलूगोभी करुन बघितले फक्त चेरी टोमॅटोज घातले नाहीत (उपलब्ध नसल्याने). मस्त झाली होती भाजी. लेकीला डब्यात पण आवडली चक्क.

मी केली. छान झाली. थोडेसे बदल केले. अगदी शिजत आलेली असताना ( मसाला-वाटण घातल्यानंतर_ रवीने पाऊंड केले ( पार गोळा केला नाही) -यामुळे मसाला चांगला घुसला.
पुदिना जास्त, कोथिंबीर कमी असे प्रमाण आणखी चांगले वाटले

>>चेरी टोमॅटो असेच आख्खे आख्खे घालायचे का?

हो अर्पणा

वर्षू नील, मी कॉलीप्लॉवरची फॅन नाही. पण ह्या दोन भाज्या सॉल्लिड आवडतात. ह्यात काय ते समजून घे Happy

स्वप्ना बरे झाले इथे लिहिलेस ते. मी तुला सांगणार होतेच की टाक म्हणुइन. मी पाहिलेला हा एपिसोड. छान दिसत होती भाजी.

वर्षू,
मस्त दिसतय.

स्व्प्ना,
छान वाटतायेत पाकृ. करुन पाहणार. धन्यवाद.

स्वप्ना. आभारी आहे गं. माझ्याबरोबर अजुनही ज्या परेशान आया/बाया आहेत त्यांनाही मिळु दे नविन यम्मी रेसिपीचा फायचा. मागील आठवड्यात आमच्याकडे पुदिनावाले आलु गोबी करुन झाले. जबरी चविष्ट (कि चविष्ठ:)) झाले होते. घरच्यांनी कॉलीफ्लॉवर नावाजुन खाणं म्हणजे अतिच झालं. Happy

यावेळेस चेरी टोमॅटोज आणले आहेत. त्यामुळे माझी भाजी पण वर्षुच्या भाजी सारखी दिसायला हरकत नाही. Happy

स्वप्ना, ती केळ्याच्या भाजीची रेसिपी पण टाक ना. एकदा करुन पहावी म्हणते.

थांकु रैना..
मनीमाऊ.. पुदिना-कोथिंबीर थोडी जास्त घाल.. माझ्या बाईने जरा जास्तच पानी घालून ब्लेन्द केलं..त्यामुळे अक्षरशः गाळून घालावं लागलं Proud
चव आणी फ्लेवर मस्त आले पण रंग नाही तितकासा हिरवा झाला..

हो ना वर्षु, मला वाटलं कि माझी भाजी फारच हिरवी झाली होती. तेच म्हटलं चायनाचा हिरवा रंग फिका का ? Wink

पुदिनावाले आलूगोभी करून पाहिले. मस्त झाली आहे भाजी चवीला. चेरी टोमॅटो न घालताही मस्त आली आहे टेस्ट. फक्त मिरच्या व आल्याचे प्रमाण पुढच्या वेळी कमी घेणार. बटाटा + फ्लॉवर कॉम्बोत पुदिन्याचा स्वाद रिफ्रेशिंग आहे.

Back to top